Sandhi v Sandhiche prakar-संधी शब्दाचा अर्थ साधने किंवा जोडणे असा होतो. मराठी व्याकरणांमध्ये संधी या संकल्पनेला जास्त महत्त्व आहे कारण संधी साधल्याशिवाय शब्द निर्मिती होत नाही. संधी प्रकारांमध्ये स्वराचा स्वराशी तसेच स्वराचा व्यंजनाशी आणि व्यंजनांचा व्यंजनाशी सतत संबंध येत असतो. ज्या भाषेमध्ये शब्द निर्मिती आणि शब्द जोडणीचे संधी आणि समासासारखे प्रकार आहेत ती समृद्ध भाषा ठरते.
एका पाठोपाठ आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. संधी मध्ये स्वर व व्यंजन यांना खूप महत्त्व आहे.
संधी आणि संधीचे मुख्य तीन प्रकार पडतात
1)स्वरसंधी
2)व्यंजन संधी
3)विसर्ग संधी
1)स्वर संधी:
जेव्हा एका पाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र येतात, तेव्हा त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात.
स्वर +स्वर
देव+आलय=देवालय
उप+आहार=उपाहार
वरील उदाहरणांमध्ये उप मधील अ आणि आ या दोन्ही स्वरांची मिळून संधी झालेली आहे म्हणून त्याला स्वरसंधी असे म्हणतात.
स्वर संधीचे प्रकार
१.सजातीय स्वरसंधी
ज्या संधी मध्ये एकमेकांसमोर येणारे स्वर हे त्याच रहस्व किंवा दीर्घ स्वरूपातील असतील तर त्याला सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात.
उदाहरण
अ+आ=आ
इ+ई=ई
उ+ऊ=ऊ
स्वर रहस्व किंवा दीर्घ स्वरासमोर तोच रहस्य किंवा दीर्घ स्वर आल्यास दीर्घ स्वर घ्यायचा असतो.
उदाहरण
मुख्य+आलय =मुख्यालय
वरील उदाहरणामध्ये अ+आ हे दोन स्वर एकत्र आले आहेत.
गिरी+ईश =गिरीश इ+ई=ई
गुरु+उपदेश=गुरुपदेश ई+ई=ई
२.गुणादेश स्वरसंधी
आ/ अ पुढे इ/ई आलास त्याचा ए होतो.
आ/अ पुढे उ/ऊ आल्यास त्याचा ओ होतो.
आ/अ पुढे ऋ आल्यास त्याचा अर होतो
उदाहरण
ईश्वर+इच्छा=ईश्वरेच्छा अ+इ=ए
रमा+ईश=रमेश आ+ई=ए
वरील उदाहरणात अ+इ=ए अशी संधी साधली आहे समोर समोरासमोर दोन्ही स्वर आहेत आणि ते वेगळे आहेत म्हणजे सजातीय नाहीत म्हणून ही गुणादेश संधी आहे.
३.वृद्यादेश स्वरसंधी
आ किंवा अ पुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा ऐ होतो.
आ किंवा अ पुढे ओ किंवा औ आल्यास त्याचा औ होतो.
उदाहरण
अ+ऐ=ऐ
एक+ऐक=एकेक
सदा+एव+सदैव आ+ऐ=ऐ
४.यणादेश स्वर संधी
इ,इ,उ,ऊ यांच्यासमोर विजातीय स्वर आल्यास
इ,ई चा य होतो.
उ,ऊ चा व होतो. आणि त्यात पुढील स्वर मिळतो.
उदाहरण
प्रति+अंतर=प्रत्यंतर इ+अ=य्+अ=य
स्थिती+अंतर= स्थित्यंतर ई+अ=य्+अ=य
५.उर्वरित स्वर संधी
ए,ऐ,ओ,औ यापुढे कोणताही स्वर आला तर ए ऐवजी अय ,ऐ ऐवजी आय ,ओ ऐवजी अवी, औ ऐवजी अवि येतात आणि त्यामध्ये पुढील स्वर मिळतो.
उदाहरण
नौ+इक= नाविक औ+इ=आव्+इ=आवि
2)व्यंजन संधी
जेव्हा एकापाठोपाठ येणारे पहिला व्यंजन व दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजन असतील तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात.
उदाहरण-
व्यंजन+ स्वर, व्यंजन+ व्यंजन
व्यंजन संधीचे प्रकार
- प्रथम व्यंजन संधी
- तृतीय व्यंजन संधी
- अनुनासिक संधी
- द व्यंजन संधी
- म ची संधी
प्रथम व्यंजन संधी:
दोन शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब (मृदू व्यंजन) यांच्यापैकी आल्यास संधी होत असताना त्याच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.
उदाहरण-
विपद+ काल =द+ क =त +क= विपत्काल
मृदू व्यंजन असून यासमोर क हे पहिल्या वर्गातील व्यंजन आले आहे अशावेळी पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच ओळीतील प्रथम व्यंजन झाले असल्यास ती प्रथम व्यंजन संधी असते.
तृतीय व्यंजन संधी:
दोन शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क,च,ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असताना त्या वर्णाच्या जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.
उदाहरण
वाक्+ ईश्वरी= क +इ=ग+ ई= वागीश्वरी
सत् + आचार =त् + आ = द् + ा = दा सदाचार
अप+ज =प् + ज् = ब् +ज् = ब्ज =अब्ज
अनुनासिक संधी:
पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजना पुढे अनुनासिक असल्यास त्याच वर्गातील अनुनासिकशी व्यंजन संधी होते त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.
उदाहरण-
जगत +नाथ =जग्गनाथ
वाक् + निश्चय =क् + न् = ङ् + न्=वाङनिश्चय
त व्यंजन संधी:
त व्यंजन संधी मध्ये,
च किंवा छ आल्यास त बद्दल च येते.
त किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येते.
ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येते.
ल आल्यास त बद्दल ल येते.
श आल्यास त बद्दल च होते व पुढील श बद्दल छ येते.
उदाहरण
सत+शिष्या=सच्छिष्य
सत् + जन= त् + जं = ज् + ज्= सज्जन
उत् + लंघन= त् + ल् = ल् + ल्= उल्लंघन
म ची संधी:
म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो आणि जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो
उदाहरण
संचय =सम्+ चय
संताप= सम्+ताप
संगती =सम्+गती
समाचार= सम्+ आचार
३)विसर्ग संधी
विसर्ग हे स्वरादी आहेत. विसर्ग कोणत्या तरी स्वरानंतर येतात. विसर्गसंधीमध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.
विसर्ग संधीचे खालील प्रकार पडतात
विसर्ग उकार संधी
विसर्गाच्या पुढे पाच गटांपैकी कोणतेही मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो, याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.
उदाहरण
मनोरथ= मन:+ रथ
यशोधन=यश+धन
तेजोनिधी=तेज:+निधी
मनोराज्य= मन:+राज्य
अधोमुख=अध:+मुख
विसर्ग र संधी:
विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते ,त्याला विसर्ग र संधी असे म्हणतात.
उदाहरण-
निरंतर = नि:+अंतर
दुर्जन = दु:+जन
बहिरंग = बहि:+अंग
बहिद्वार = बहि:+द्वार
विसर्ग र संधी
विसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दुसरा वर्ण र असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो.
उदाहरण-
नि: + रस = निः + र् + रस = नीरस
निः + रव = निः + र् + रख = नीरव
येथे मागील नियमाप्रमाणे विसर्गाचा र् झाला पण अशा र् च्या पुढे र हा वर्ण आल्यामुळे यातील र् चा लोप होऊन त्याचा नि दीर्घ झाला आहे.
विसर्ग संधीचे नियम :
*विसर्गापुढे च, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होतो.
उदाहरण-
दुश्चिन्ह = दु:+चिन्ह
शनैश्वर = शनै:+चर
निश्चय = नि:+चय
दुष्टीका = दु:+टीका
निस्तेज = नि:+तेज
मनस्ताप = मन:+ताप
निष्फळ = नि:+फळ
निष्काम = नि:+काम
चक्षु: = चक्षु:+तेज
अधस्तल = अध:+तल
*विसर्गापूर्वी अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.
उदाहरण-
रज:कण = रज:+कण
अध:पात = अध:+पात
अंत:पटल = अंत:+पटल
तेज:पुंज = तेज:+पुंज
* शब्दाच्या शेवटी र येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र चा विसर्ग होतो.
उदाहरण-
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुःसूत्री
* शब्दाच्या शेवटी स येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स् चा विसर्ग होतो.
उदाहरण-
मनस् + पटल = मनःपटल
तेजस् + कण = तेजःकण
* विसर्गाच्या ऐवजी येणा-या र् च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र् तसाच राहून संधी होते.
उदाहरण-
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर् + आत्मा अंतरात्मा
*विसर्गाच्या पुढे श्, स् आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो. किंवा लोप पावतो.
उदाहरण-
दु: + शासन = दुःशासन (दुश्शासन)
नि: + संदेह = नि:संदेह (निस्संदेह)
चतु: + शृंगी = चतुःशृंगी (चतुशृंगी)
पुरः + सर = पुरःसर (पुरस्सर)
*विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो.
उदाहरण-
निः + कारण = निष्कारण
नि: + पाप = निष्पाप
दु: + परिणाम = दुष्परिणाम
दु: + कृत्य = दुष्कृत्य
(दु:ख आणि नि:पक्ष हे अपवाद आहेत)
* विसर्गाच्या पुढे च्, छ, आल्यास विसर्गाचा श् होतो आणि त्, थ् आल्यास विसर्गाचा स होतो.
उदाहरण-
नि: + चल = निश्चल
दु: + चिन्ह = दुश्चिन्ह
मनः + ताप = मनस्ताप
नि: + तेज = निस्तेज
*विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क्, ख्, प् फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदाहरण-
प्रातः + काल = प्रातःकाल
तेज: + पुंज = तेज:पुंज
इतः + उत्तर = इतउत्तर