Sangali Jilha : सांगली जिल्हा

दक्षिण महाराष्ट्रातील Sangali Jilha सांगली हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो.

मुख्यालय – Sangali सांगली

क्षेत्रफळ – 8578 चौकिमी

स्थान व विस्तार – सांगलीच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, दक्षिणेस व  नैऋत्येस कोल्हापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस व वायव्येस सातारा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर.

तालुके(10) – मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा (32 शिराळा), वाळवा, पलूस, कडेगाव.

महानगरपालिका(1) – सांगली-मिरज-कुपवाडा (1988)

नद्या – कृष्णा ही प्रमुख नदी आहे. याव्यतिरिक्त वारणा, येरळा, बोर, माणगंगा.

धरणे – वारणा नदीवरील चांदोली धरण.

पिके – गहू, ज्वारी, ऊस, हळद, तंबाखू, हरभरा.

संगमस्थळ – ब्र्ह्मनाल(येरला,कृष्णा), हरिपूर(कृष्णा,वारणा).

धबधबा – कंधार (वारणा नदीवर)

खनिज – शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते.

लेणी – हरिपूर, करगणी

तलाव – आटपाडी, लांडगेवाडी, वायाफले, अंजनिपेठ, भोसे, संख, खंडेराजुरी, कोसारी.

मृदा – पिवळसर, तांबूस, तपकिरी व काळी मृदा.

किल्ले – मच्छिंद्रगड , प्रचीतगड, रामदुर्ग, बागणी भुईकोट किल्ला.

  • चांदोली राष्ट्रीय उद्यान (२००४) सातारा, सांगली कोल्हापूर, रात्नागरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
  • सांगलीचा हळदीचा वायदे बाजार प्रसिद्ध आहे.
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ( चांदोली राष्ट्रीय उद्यान) शिराळा तालुक्यात आहे.
  • सागरेश्वर(यशवंतराव चव्हाण) अभयारण्य (1985)कडेगाव तालुक्यात आहे.
  • सदाहरित व शुष्क पानझडी वने सांगली जिल्ह्यात आढळतात.
  • सांगली येथे कृष्णेच्या काठावर गणेश दुर्ग हा किल्ला आहे. येथील आकाशवाणी केंद्र विशेष लोकप्रिय आहे.
  • मिरज हे प्रमुख जंक्शन आहे.
  • वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली येथे आहे.
  • औदुंबर येथे दत्तात्रेय मंदिर आहे.
  • मिरज येथील मिरासाहेब अवलिया दर्गा येथील ऊरुस प्रसिद्ध आहे. या उरसास 640 वर्षाची परंपरा आहे.
  • 32 शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे. जिवंत नागांची मिरवणूक काढण्याच्या प्रथेस पर्यावरणवाद्याच्या विरोधामुळे 2002 पासून बंदी  आहे. येथे गोरखानाथ व मारुती मंदिर आहे.
  • तासगाव येथे उजव्या सोंडेचा गणपती आहे.
  • कडेगाव येथील मोहरम प्रसिद्ध आहे.
  • देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे.
  • खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ बाबाची चैत्री यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेतील जातिवंत माणदेशी खिलार बैलांचा बाजार प्रसिद्ध आहे.
  • सांगलीला महाराष्ट्राची “नाट्य पंढरी” असे म्हणतात.
  • सांगलीला हळदीचा जिल्हा असे म्हणतो.
  • दक्षिण महाराष्ट्रातील अतिपूर ग्रस्त जिल्हा सांगली जिल्हा आहे.
  • सांगलीमध्ये दिग्रस या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे.
  • मिरज येथे तंतुवाद्य निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.
  • बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस )यांचा जन्म सांगली जिल्ह्यात नागठाणे या ठिकाणी झाला होता.

Leave a comment