Saptshungi Devi : सप्तशृंगी देवी वणी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ म्हणजे अर्धे शक्तिपीठ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या नंदुरी गावाजवळ गडावर Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे

असे म्हणतात की, देवी सप्तशृंगी ने जगाला त्रास देणाऱ्या दैत्त्य राजा महिषासुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गेचे रूप धारण केले व महिषासुराचा वध म्हशीच्या रूपाने झाला. या देवीने महिषासुर राक्षसाचा पराभव केला म्हणून या देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते. गडाच्या पायथ्याशी दगडी म्हशीचे डोके आहे. तिथेच महिषासुराचा वध झाला असे मानले जाते. तिथूनच भक्त मंदिरात जाण्यासाठी चढू लागतात.

मंदिरात देवीची मूर्ती उच्चासनावर उभी असून नऊ फूट उंच आहे. तिला 18 हात आहेत. ती पाषाणमूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तीनही दरवाजातून देवीचे दर्शन होते. ही मूर्ती शेंदुराने लीपली आहे. देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ, कमरपट्टा, तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठले आहे. पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. पाणीदार डोळे, सरळ पण किंचित कललेली मान, 18 हातात 18 विविध आयुधे असा देवीचा थाट आहे. या गडावर चढून मंदिरात जाण्यासाठी जवळपास 500 पायऱ्या चढून जावे लागते

देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूल तीर्थ आहे या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीन पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला होता त्यामुळे पाणी लालसर झाल अशी, तर काजल तीर्थ या कुंडात देवीने काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं आहे अशी आख्यायिका आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे.

गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्र उत्सव, कोजागिरी उत्सव, लक्ष्मीपूजन, महाशिवरात्र इत्यादी उत्सव या गडावर साजरे केले जातात

देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे. सप्तशृंगी गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडले जाते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो.

Leave a comment