Sarvnaam-सर्वनाम: भाषेचा महत्वपूर्ण घटक

जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात .नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम Sarvnaam असे म्हणतात.

खर तर सर्वनामांच्या शब्दांना स्वत:चा अर्थ नसतो , ते ज्या नामाबद्दल उपयोगात येतात त्यांना त्या नामाचा अर्थ प्राप्त होतो. वाक्यात सर्वनामाचा उपयोग करण्याआधी तो ज्या नामासाठी उपयोगात येणार आहे त्या नामाचा उल्लेख करणे आवश्क असते .

वचनानुसार सर्वनामामध्ये -Sarvnaam बदल घडत असतो , जसे तो – तुम्ही ,मी – आम्ही

उदाहरण –

मी ,हा ,तू ,कोण, काय इत्यादी.

सर्वनामाचे प्रकार-types of sarvnaam

  • १) पुरुषवाचक सर्वनाम
  • २) दर्शक सर्वनाम
  • ३) संबंधी सर्वनाम
  • ४) प्रश्नार्थक सर्वनाम
  • ५) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
  • ६) आत्मवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन  उपप्रकार पडतात.  कारण साधारणता संभाषण किंवा लिखाण हे तीन घटकात होते ,एक स्वत:विषयी बोलणारे,दोन ज्याच्याशी बोलतो ते आणि तीन ज्यांच्या विषयी बोलतो ते. हे तिन्ही वर्ग पुरुष गटात येतात म्हणून या तिन्ही सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.

आपण स्वतः विषयी बोलतो किंवा लिहितो.

आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो .

आपण तिसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम:

बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो, ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते.

उदाहरणार्थ – मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी.

आम्ही आज एकत्र खेळलो .

मी आज वाचायला शिकलो.

द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम:

ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ,ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते.

उदाहरणार्थ – तुम्ही ,आपण, स्वतः इत्यादी.

तु कोठे चालला ?

तुम्ही आमच्यासोबत खेळाल ?

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम:

तिसऱ्या व्यक्ती विषयी बोलताना म्हणजेच बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून आपण जे सर्वनाम वापरतो, ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते.

उदाहरणार्थ – तो ,ती ,ते ,त्या इत्यादी.

तो खूप मस्ती करतो .

त्यांना खेळायला बोलव.

दर्शक सर्वनाम:

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे  सर्वनाम आपण वापरतो, त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ – हा, ही, हे, तो, ती, ते इत्यादी.

हा राम आहे.

तो गात आहे.

ही वही आहे.

तो पेन आहे.

हे पुस्तक आहे.

संबंधी सर्वनाम

वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. या सर्वनामाचा उपयोग मिश्र वाक्यात होतो.

उदाहरण –

जो अभ्यास करील तो पास होईल.

जी अभ्यास करेल ती पास होईल.

जे अभ्यास करील ते पास होईल .

जे असेल ते मिळेल.

वरील उदाहरणांमध्ये जो, जी, जे, तो, ती, ते हे संबंधित सर्वनामाची उदाहरणे आहेत.

प्रश्नार्थक सर्वनाम

ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो , सर्वनामाला त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण –

कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या इत्यादी

केळी कोण खाणार आहे?

तुला काय पाहिजे आहे?

कोणाला चेंडू हवा आहे?

वरील उदाहरणांमध्ये कोण, काय, कोणाला हे प्रश्नार्थक सर्वनामाचे उदाहरणे आहेत.

सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम

वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे निश्चित सांगता येत नाही, त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदाहरणार्थ – कोणी, काय इ.

कोणी कोणास बोलू नये.

आत्मवाचक सर्वनाम

ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो, त्याला सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही.

उदाहरणार्थ – आपण, स्वतः इत्यादी.

स्वत: सर्व कामे करावीत .

पुढे हे हि वाचा

Leave a comment