Satara Jilha सातारा जिल्हा हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो.
मुख्यालय – सातारा
क्षेत्रफळ – 10480 चौकिमी.
स्थान व विस्तार – पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस व आग्नेयेस सांगली, पश्चिमेय रत्नागिरी, वायव्येस रायगड, उत्तरेस पुणे जिल्हा.
तालुके(11) – सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर.
पिके – ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, द्राक्षे, कांदा.
नद्या – कृष्णा ही प्रमुख नदी आहे, कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळा या कृष्णेच्या उपनद्या याशिवाय निरा, बाणगंगा या नद्या.
संगमस्थळ – कराड प्रीतीसंगम(कृष्णा,कोयना), माहुली (कृष्णा,वेण्णा)
धरणे – पाटण तालुक्यात कोयना धरण (शिवाजीसागर जलाशय) हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. अन्य धरणे आंधळी, उरमोडी, कण्हेर, धोम, बलकवडी.
औद्योगिक – वनकुसडे येथे “महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा” पवन विद्युतनिर्मिती करणारा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. महाबळेश्वर पाचगणी येथे मधुमक्षिका पालन आहे.
प्रमुख ठिकाणे – कासपठारावर फुलणारी फुले हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
धबधबे – चायनामॅन धबधबा, धोबी फॉल्स, लिंगमळा धबधबा, ठोसेघर धबधबा, उरमोडी नदीवर भांबवली वजराई धबधबा, पाटण येथे ओझर्डे धबधबा व वाल्मीक पठार.
- महाबळेश्वर येथे वेण्णा तलाव आहे.
- सातारा येथे महाराणी ताराबाई ची राजधानी, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगडावरील समर्थ रामदासांची समाधी आहे.
- म्हसवड (ता.माण) येथील सिद्धनाथ मंदिराचा रथोत्सव प्रसिद्ध आहे.
- मायनी (ता.खटाव) येथे पक्षी अभयारण्य आहे.
- बावधन (ता.वाई) येथे होळी पौर्णिमेच्या वेळेस भैरवनाथाच्या यात्रेतील “बगाड मिरवणूक” प्रसिद्ध आहे.
- श्रीक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथे “रामनवमी उत्सव” प्रसिद्ध आहे. 1648 साली समर्थ रामदासांनी हा उत्सव सुरू केला.
- महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन व Queen Of Hill Stations आहे.
- मांढरदेवी येथील देवी काळुबाईचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व पांचगणी हे थंड हवेची ठिकाणे आहेत.
- वाई येथे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे.
- मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे.
- शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे.
- पाली येथे खंडोबा देवस्थान व लोणंद येथे कांद्याची बाजारपेठ आहे.
- महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे मधाचे गाव आहे.
- महाबळेश्वर तालुक्यात भिलार हे पुस्तकाचे गाव आहे.
- सातारा जिल्हा कृषिप्रधान असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात.
- महाबळेश्वर येथे एकूण 5 नद्या उगम पावतात (कृष्णा,कोयना,वेण्णा,सावित्री,गायत्री).
- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात “रयत शिक्षण” संस्थेची स्थापना केली. 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.
- सातारा जिल्ह्यात छत्रपती शाहुंचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला.
- सातारा जिल्हा हा ऐतिहासिक शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभले आहे.