Shabdanchya jati-शब्दांच्या जाती

शब्द

शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे.

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल ,तर त्याला शब्द असे म्हणतात.Shabdanchya jati

उदाहरणार्थ

ब+द+क=बदक

ब, द, क ही अक्षरे क्रमाने आली आहेत त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणून बदक हा अर्थपूर्ण शब्द आहे.

शब्दांच्या जाती:

शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्य असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात.

१)विकारी शब्द

२)अविकारी शब्द

विकारी शब्द:

वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात .थोडक्यात विकारी म्हणजेच बदल घडणारे.

विकारी शब्दांच्या जाती

अविकारी शब्द:

वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन ,विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात अविकारी म्हणजेच बदल न घडणारे.

अविकारी शब्दांच्या जाती

१)क्रियाविशेषण अव्यय

२)शब्दयोगी अव्यय

३)उभयान्वयी अव्यय

४)केवलप्रयोगी अव्यय

शब्दांच्या जाती:

१)नाम

२)सर्वनाम

३)विशेषण

४)क्रियापद

५)क्रियाविशेषण अव्यय

६)शब्दयोगी अव्यय

७)उभयान्वयी अव्यय

८)केवलप्रयोगी अव्यय

Post Comment

You May Have Missed