१.जे माहित नाही ते – अज्ञात (Shabdsamuha)
२.अन्न देणारा – अन्नदाता
३.ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
४.पायात काहीही न घालणारा – अनवाणी
५.एखाद्याचे मागून येणे – अनुगमन
६.माहिती नसलेला – अज्ञानी
७.राखून काम करणारा – अंगचोर
८.शिल्लक राहिलेले – उर्वरित
९.वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
१०.दुसऱ्यावर जिवंत राहणारा – उपजीवी
११.सूर्योदयापूर्वीची वेळ – उषःकाल
१२.नदीची सुरुवात होते ते ठिकाण – उगम
१३.कविता करणारा – कवी
१४.कविता करणारी – कवयत्री
१५.कादंबरी लिहिणारा – कादंबरीकार
१६.सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
१७.दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
१८.कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
१९.सतत कष्ट करणारा – कष्टाळू
20.कार्य करण्याची जागा – कर्मभूमी
२१.देवालयाचे शिखराचे टोक – कळस
२२.सहसा न घडणारे – क्वचित
२३.केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
२४.केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा – कृतघ्न
२५.आकाशात गमन करणारा – खग
२६.नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश – खोरे
२७.दोन डोंगरामधील चिंचोली वाट – खिंड
२८.एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणारा आवाज – गलका
२९.भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे – गहिवर
३०.देवळाच्या आतील भाग -गाभारा
३१.नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
३२.ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधारी
३३.नक्षत्रासारखी सुंदर स्त्री – चटकचांदणी
३४.गावच्या कामकाजाची जागा – चावडी
३५.चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण – चौक
३६.चित्रे काढणारा – चित्रकार
३७.जगाचा स्वामी – जगन्नाथ
३८.जेथे जन्म झाला आहे तो देश – जन्मभूमी
३९.पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
४०.पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी – जलज
४१.जाणून घेण्याची इच्छा – जिज्ञासा
४२.जीवाला जीव देणारा मित्र – जिवलग
४३.खूप जोरात किंवा एक सारख्या टाळ्या वाजवणे – टाळ्यांचा कडकडाट
४४.झाडांचा दाट समूह – झाडी
४५.सतत पडणारा पाऊस – झडी
४६.कधीही मृत्यू न येणारा – अमर
४७.मिळून मिसळून वागणारा – मनमिळावू
४८.गुप्त बातम्या काढणारा – गुप्तहेर
४९.आई-वडील नसणारा – अनाथ
५०.विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वस्तीग्रह
५१.संख्या मोजता न येणारा – असंख्य
५२.कोणतीही तक्रार न करणारा – विनातक्रार
५३.देवावर विश्वास ठेवणारा – आस्तिक
५४.महिन्यातून प्रसिद्ध होणारे – मासिक
५५.मन आकर्षण करणारे – मनमोहक
५६.दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी
५७.दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक
५८.सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही
५९.कधीही न जिंकला जाणारा – अजिंक्य
६०.कायमचे लक्षात राहणारे – अविस्मरणीय
६१.लोकांचे नेतृत्व करणारा – नेता
६२.लोकांची वस्ती नसलेला भाग – निर्जन
६३.श्रम करून जगणारा – श्रमजीवी
६४.भले हो अशी मंगल कामना – आशीर्वाद
६५.अग्नीची पूजा करणारा – अग्निपूजक
६६.दान करणारा – दानशूर
६७.देशासाठी लढणारा – देशभक्त
६८.दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
६९.ईश्वराच अस्तित्व न मानणारा – नास्तिक
७0.थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
७१,.एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
७२.सेवा करणारा – सेवक
७३.शंभर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
७४.स्वतःचे काम स्वतः करणारा – स्वावलंबी
७५.स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
७६.श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
७७.जमिनीचे दान – भूदान
७८.वाट दाखवणारा – वाटाड्या
७९.देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
८०.क्षमा करणारी व्यक्ती – क्षमाशील
८१.दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
८२.अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
८३.गावच्या न्याय निवाड्याची जागा – चावडी
८४.ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
८५.वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
८६.किल्ल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
८७.धान्य साठवण्याची जागा – कोठार
८८.कोणत्याही क्षेत्रात एकाकी घडून येणारा मोठा बदल – क्रांती
८९.कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
९०.पाणी मिळण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
९१.लोकांना आवडणारा – लोकप्रिय
९२.वर्षाने प्रसिद्ध होणारे – वार्षिक
९३.आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू – स्वदेशी
९४.मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व – सूत्र
९५.क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
९६.केवळ स्वतःचा फायदा करून पाहणारा – स्वार्थी
९७.कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
९८.शरण आलेला – शरणागत
९९.लाज नाही असा -निर्लज्ज
१००.वाद्य वाजवणारा – वादक
१०१.वाडवलांनी मिळवलेली संपत्ती – वडीलोपार्जित
१०२.शोध लावणारा – संशोधक
१०३.ऐकायला येत नाही असा – बहिरा
१०४.ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधिर
१०५.कथा सांगणारा – कथेकार
१०६.कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
१०७.कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
१०८.खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
१०९.खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
११०.गुरे राखणारा – गुराखी
१११.घरापुढे मोकळी जागा – अंगण
११२.घरे बांधणारा – गवंडी
११३.जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगर
११४.जिथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
११५.जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
११६.लाकूड काम करणारा – सुतार
११७.अनेक फळांचा समूह – घोस
११८.झाडांची निगा राखणारा – माळी
११९.उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
१२०.दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
१२१.आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
१२२.दारावरील पहारेकरी – द्वारपाल
१२३.दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
१२४.देवा पुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
१२५.पायी चालणारा – पादचारी
१२६.बस गाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
१२७.भाषण करणारा – वक्ता
१२८.रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
१२९.सोन्या चांदीचे दागिने करणारा – सोनार
१३०.हाताच्या बोटात घालायचा दागिना – अंगठी
१३१.अनेक केळ्यांचा समूह – घड
१३२.विमान चालवणारा – वैमानिक
१३३.शत्रूला सामील झालेला – फितूर
१३४.शेती करणारा – शेतकरी
१३५.माकडाचा खेळ करणारा – मदारी
१३६.लेखन करणारा – लेखक
१३७.चांगला विचार – सुविचार
१३८.दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
१३९.जंगलात लागलेली आग – बनवा
१४०.दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा – संगम
१४१.सदा सुख देणारा – सुखदाता
१४२.पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षीचा – चातक
१४३.कर्जाच्या खाली दबलेला – कर्जबाजारी
१४४.शंभर वर्ष आयुष्य जगणारा – शतायुषी
१४५.शेजाऱ्याशी वागण्याची पद्धत – शेजारधर्म
१४६.अग्नि विज्ल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी – राख
१४७.अनेक चांगला गुणांनी युक्त असणारा – अष्टपैलू
१४८.स्वतःविषयीचे चरित्र – आत्मचरित्र
१४९.स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा – उदार
१५०.आवरता येणार नाही असे – अनावर
१५१.आईचे मुलांविषयी प्रेम – वात्सल्य
१५२.आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र – सवंगडी
१५३.आपापसात हळूच बोलणे – कुजबुज
१५४.हाताचे दोन पंजे जवळ आणून केलेला हाताचा पसा – ओंजळ
१५५.एखादी गोष्ट नाही अशी स्थिती – अभाव
१५६.एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी
१५७.ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
१५८.एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
१५९.दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखे वागणे – अनुकरण
१६०.सतत कष्ट करणारा – कष्टाळू
१६१.वयाने व अधिकाराने कमी – कनिष्ठ
१६२.कसलेही व्यसन नसणारा – निर्व्यसनी
१६३.कमी बुद्धी असलेला – मतिमंद
१६४.खूप विस्तार असलेले – विस्तीर्ण
१६५.खेळाडूंच्या संघाचा प्रमुख – कर्णधार
१६६.मनास आकर्षण घेणारे – मनमोहक
१६७.गुरे बांधण्याची जागा – गोठा
१६८.घोडे बांधण्याची जागा – पागा
१६९.गाई सांभाळणारा – गोपाळ
१७०.जे होणे शक्य नाही असे – असंभव
१७१.सर्व काही जपणारा – सर्वज्ञ
१७२.आरण्याचा राजा – वनराज
१७३.जुन्या मतांना चिकटून राहणारा – सनातनी, पुराणमतवादी
१७४.धान्य साठवण्याची जागा – कोठार
१७५.ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष – विधुर
१७६.जिचा पती मरण पावला आहे अशी महिला – विधवा
१७७.सूर्य मावळण्याची घटना – सूर्यास्त
१७८.हाताच्या बोटात घालायचा दागिना – अंगठी
१७९.नाव चालवणारा – नावाडी
१८०.ज्याला तळ लागत नाही असा – अथांग
१८१.भाषण ऐकणारे – श्रोते
१८२.जिचा उपयोग होत नाही अशी वस्तू – निरुपयोगी
१८३.बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण – अबालवृद्ध
१८४.जेवण झाल्यावर शंभर पावले फिरणे – शतपावली
१८५.ढगांनी न भरलेले – निरभ्र
१८७.तीन कोण असलेली आकृती – त्रिकोण
१८८.तीन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण – त्रिवेणी
१८९.थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
१९०.दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
१९१.दुसऱ्याला ठार मारण्यासाठी पाठवलेला माणूस – मारेकरी
१९२.नाटक लिहिणारा – नाटककार
१९३.नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट, अभिनेता
१९४.धनुष्य धारण करणारा – धनुरधारी
१९५.रिकामा हिंडनारा – टवाळखोर
१९६.नृत्य करणारा पुरुष – नर्तक
१९७.प्रेरणा देणारा – प्रेरक
१९८.नवऱ्या मुलीचे वडील – वरपिता
१९९.नशिबाने आलेली अवस्था – देवदशा
२००.मासे पकडणारा – कोळी
२०१.चंद्रापासून येणारा प्रकाश – चांदणे
२०२.जीवाला जीव देणारा – जिवलग
२०३.मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
२०४.प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ – शिदोरी
२०५.माशासारखे डोळे असलेली स्त्री – मीनाक्षी
२०६.ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा – अजानबाहू
२०७.मिठाई तयार करणारा – हलवाई
२०८.ज्याला खंड नाही असा – अखंड
२०९.अंग राखून काम करणारा – अंगचोर
२१०.मोजता येणार नाही असे – अगणित
२११.यज्ञातील आहुती – बळी
२१२.योग करण्याची जागा – योगशाळा
२१३.राजाचे बसायचे आसन – सिंहासन
२१४.हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा किंवा बैठक – अंबारी
२१५.ज्याला मरण नाही असा – अमर
२१६.लाकडाच्या वस्तू बनवणारा – सुतार
२१७.दोनदा जन्मलेला – द्विज
२१८.लोखंडाच्या वस्तू बनवणारा – लोहार
२१९.मोठ्यांनी लहानांना दिलेली सदिच्छा – आशीर्वाद
२२०.वनस्पतीच्या मुळाशी पाणी घालण्यासाठी केलेला खोलगट भाग – आळे
२२१.वाट दाखवणारा – वाटाड्या
२२२.आजार कमी करण्यासाठी घेतलेल्या गोळ्या किंवा दवा – औषधी
२२३.शरीरात जीव असलेला – सजीव
२२४ .शिक्षा करण्याचे यमपुरीतील स्थान – नरक
२२५.नेत्याची अनुकरण करणारे – अनुयायी
२२६.जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था – जिल्हापरिषद
२२७.जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री – सुवासिनी
२२८.खूप मोठा विस्तार असलेले – विस्तीर्ण
२२९.डोंगरात कोरलेले मंदिर – लेणी
२३०.अनेकांमधून निवडलेले – निवडक
२३१.तप करण्याची जागा – तपोभूमी
२३२.चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुक्लपक्ष
२३३.तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख – तामृलेख
२३४.दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
२३५.दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
२३६.दारोदारी भिक्षा मागणारा – भिक्षाार्थी
२३७.दागिने नसलेली गरीब स्त्री – लंकेची पार्वती
२३८.तोंडावर हात मारत काढलेला आवाज – बोंब
२३९.तोफ असलेला गाडा – रणगाडा
२४०.ढगांनी भरलेले – ढगाळलेले
२४१.दुसऱ्या देशात जाणे – परदेशगमन
२४२.कष्ट करून जगणारे – कष्टकरी
२४३.करण्याची लाकडी परात – काठवत
२४४.नावाचा एक सारखा उच्चार – घोष
२४५.देवास अर्पण करावयाचा पदार्थ – नैवेद्य
२४६.चंद्राप्रमाणे मुख असणारी – चंद्रमुखी
२४७.नृत्य करणारी स्त्री – नर्तकी
२४८.निरपेक्ष बुद्धीने व स्वच्छने केलेल्या कामाबद्दल दिले जाणारे धन – मानधन
२४९.योजना आखणारा – आयोजक
२५०.पहाटेची वेळ – उषःकाल
२५१.रक्षा करणारा – रक्षक
२५२.लग्नासाठी जमलेले लोक – वराडी
२५३.प्राणी एकत्र ठेवण्याची जागा – प्राणीसंग्रहालय
२५४.जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
२५५.पाहण्यायोग्य वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन
२५६.पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ- पेय
२५७.लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
२५८.लोकांच्या मदतीने चाललेले राज्य – प्रजासत्ताक
२५९.पीक न उगवणारी जमीन – नापीक
२६०.पुन्हा मिळालेला जन्म – पुनर्जन्म
२६१.शोध लावणारा – संशोधक
२६२.पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
२६३.शहाणपणा अर्थात मूर्ख – दीडशहाणा
२६४.लोकांचे पुढारी पण करणारा – पुढारी
२६५.बर्फाने आछाडलेले – बर्फाच्छादित
२६६.समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
२६७.बरोबर की चूक योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धा – अंधश्रद्धा
२६८.संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
२६९.बारकाईने चौकशी करणारा – चिकित्सक
२७०.भविष्य सांगणारा – ज्योतिषी
२७१.स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
२७२.मनाला वाटेल तसे – मनसोक्त
२७३.लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर – माहेर
२७४.मिठाई तयार करणारा – हलवाई
२७५.मालाच्या देव घेवाण च्या व्यवहारात मिळणारा मोबदला – अडत
२७६.ज्याला खंड नाही असा – अखंड
२७७.सुंदर असलेले – निसर्गसुंदर
२७८.मोजकाच आहार घेणारा – मिताहारी
२७९.मोजकेच बोलणारा – मितभाषी
२८०.ज्याची किंमत होऊ शकत नाही असा – अनमोल
२८१.देव लोकातील स्त्रिया – अप्सरा
२८२.रक्त गोळा करून ठेवण्याचे ठिकाण – रक्तपेढी
२८३.पूर्वी कधीही पडले नाही असे – अपूर्व
२८४.राष्ट्राला पित्याप्रमाणे असणारा – राष्ट्रपिता
२८५.जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे -आभास
२८६.लहानपणी मिळालेले वळण किंवा शिक्षण – बाळकडू
२८७.लहान मुलांना समजेल असे – बालबोध
२८८.मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
२८९.लोकांच्या सत्तेखाली त्यांच्या संमतीने त्यांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धत – लोकशाही
२९०.व्यवस्थित आखलेले – रेखीव
२९१.वर्तमानपत्र चालवणारा – संपादक
२९२.वनात राहणारे लोक – वनवासी
२९३.वनस्पतीच्या मुळाशी पाणी साठण्यासाठी केलेला खोलगट भाग – आळे
२९४.वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा – कंजूस
२९५.वारस नसलेला – बेवारशी
२९६.मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर – उपनगर
२९७.वाईट मार्गाने जाणारा – अधोगामी
२९८.विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा – महत्त्वकांक्षा
२९९.विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ट
३००.विवाह समय नवरा नवरी मध्ये धरायची वस्त्र – अंतरपाट
३०१.कमळासारखे डोळे आहेत अशी-कमलनयना
३०२.कामात तत्पर असलेला – कार्यतत्पर
३०३.खूप आयुष्य असलेला – दीर्घायुषी
३०४.कविता गाऊन दाखवणारे – काव्यगायिका
३०५.दुसऱ्या मध्ये न मिसळणारा – एकलकोंडा
३०६.गावाभोवताचा तट – गावकूस
३०७.थोरपुरुष, समाजसेवक, साधू ,संत यांच्या जन्मतिथीचा दिवस – जयंती
३०८.ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रधर