सिद्धिविनायक हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून 48 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक हे मंदिर अष्टविनायकापैकी दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे.
अष्टविनायक गणपती पैकी हे एकमेव असे मंदिर आहे जिथे, गणपतीची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणपतीचे नाव Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक असे ठेवले आहे. सिद्धी म्हणजे सिद्धी देणारा. सिद्धी, यश, अलौकिक शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणून जागृत क्षेत्र मानले जाते. Siddhivinayk Mandir सिद्धिविनायक गणपती हे उजव्या सोंडेचे असल्याकारणामुळे हे खूप शक्तिशाली आहेत असे सांगण्यात येते. पण त्यांना प्रसन्न करणे ही खूप कठीण आहे. पूर्वी सिद्धिविनायक गणपतीचं टेकडीवर छोटंसं मंदिर होतं. तिथे जाण्यासाठी पण रस्ता नव्हता. पेशवे काळात सरदार हरीपंत फडके यांनी तिथे रस्ता बांधला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मोठे मंदिर बांधले होते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. . हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभाऱ्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी बसलेले आहेत. गाभाऱ्यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या आहेत.
गणेशाला सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध भात व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो.
गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की, सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे जवळपास एक किलोमीटर चालावे लागते. विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशी भीमा नदी वाहते.
पुढे वाचा –
Rivers and Cities : भारतातील नद्या व नदीकाठची शहरे | https://mpsc.pro/rivers-and-cities/ |
Irrigation projects : भारतातील जलसिंचन प्रकल्प | https://mpsc.pro/irrigation-projects/ |
Bara Jyotirling : बारा ज्योतिर्लिंग देवस्थाने | https://mpsc.pro/bara-jyotirling/ |
Police Bharti २०२४ : पोलीस भरती-त्वरा करा | https://mpsc.pro/police-bharti-2024/ |
या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते. सोमवती अमावस्या सुद्धा साजरी केली जाते. विजयादशमीला येथे जत्रा भरते.