Sindhudurg Jilha : सिंधुदुर्ग जिल्हा

महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडील Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे. Sindhudurg Jilha सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

मुख्यालय –  ओरोस बुद्रुक (सिंधुदुर्ग नगरी)

क्षेत्रफळ – 5207 चौकिमी

स्थान व विस्तार – दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्य, पश्चिमेस आरबी समुद्र, उत्तरेस रत्नागिरी, पूर्वेस सह्याद्री व त्यालगत कोल्हापूर.

समुद्रकिनारा – सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे.

तालुके(8) – कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, दोडामार्ग.

नद्या – अरुणा, आचरा, कर्ली, खांडरा ,गड, जाणवली , तेरेखोल, देवगड, पियाळी, शुक, भंगसाळ, सरंबळ.

धरणे – अरुणा, शिवडाव, नाधवडे, धामापूर, देवधर, कोर्ले संतेडी(देवगड).

पिके – भात, वारी, नाचणी, रागी.

धबधबे – आंबोली प्रसिद्ध धबधबा (सावंतवाडी ),नागरतास, सैतवडे(देवगड), व्याघरेश्वर,

किल्ले – सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे सागरी किल्ले आहेत. महादेवगड, देवगड, रामगड, पदमगड, मुरुड-जंजिरा, भरतगड मनोहरगड.

  • सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटांवर (ता.मालवण) आहे.
  • सरासरी सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा आहे.
  • साग, साल, शिसव, खैर, सोनचाफा हि वृक्ष आढळतात,
  • वेंगुर्ला तालुक्यात रेडी येथे लोहखनिज आहे.
  • सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरवान मेंढे या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
  • सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती समुद्राचे खारे पाणी व किल्ल्याच्या आत दूधबाव, दहिबाव व साखरबाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. 2010 मध्ये या किल्ल्यास “राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा” दर्जा देण्यात आला.
  • तारकर्ली(ता.मालवण) येथे पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कुबा ड्रायव्हिंगची सुविधा आहे.
  • तारकर्ली(ता.मालवण) येथे पर्यटकांना समुद्रतळ व तेथील जीवसृष्टी पाहता येते.
  • कणकवली येथे “सावडाव” धबधबा आहे.
  • देवगड तालुक्यातील  कुणकेश्वर येथे शिव मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी असे म्हणतात.
  • जामसंडे (ता. देवगड) येथे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे.
  • सप्टेंबर 2016 मध्ये सिंधुदुर्ग हा “पर्यटन जिल्हा” म्हणून घोषित करण्यात आला.
  • महाराष्ट्राचा पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा सिंधुदुर्ग आहे.

Leave a comment