Tsunami : लाटांचे मुख्य कारण वारा हे आहे, पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाटा निर्माण होतात.
सागरतळावर जेव्हा तीव्र भूकंप होतात, तेव्हा 50 ते 75 मीटर उंचीच्या महाकाय सागरी लाटा हजारो किलोमीटर प्रवास करून किनार्यावर येऊन पडतात व अपरिमित हानी करतात. या विध्वंसक लाटांना जपानी भाषेत “त्सुनामी” असे म्हणतात.
बहुतेक त्सुनामी भूकंपामुळे निर्माण होतात. ज्वालामुखीचा उद्रेक, पाण्याखालील स्फोट, भूस्खलन आणि उल्कापिंडाचे परिणाम ही त्सुनामीची इतर काही कारणे आहेत.
जपानी भाषेत त्सुनामी म्हणजे “बंदर लाटा” (त्सु म्हणजे बंदर व नामी म्हणजे लाट).
या लाटा इतक्या भयंकर असतात की त्यात किनाऱ्यावरची गावीच्या गावी पाण्याखाली बुडवतात. या अत्यंत विध्वंसक असतात. तसेच उथळ किनारी भागात या लाटांची उंची प्रचंड असते. ताशी 600 ते 700 km इतका यांचा संहारक वेग असतो.
त्सुनामी लाटामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. त्सुनामीचा धोका निर्माण झाला असता किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचावर जाणे उपयुक्त ठरते.
त्सुनामी ही सर्वात भयंकर, शक्तिशाली व विनाशकारी नैसर्गिक आपत्तीपैकी एक आहे.
लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरात सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होतात.
समुद्रकिनारालगचा रेतीने व्यापलेला भाग म्हणजेच पुळण(beach) होय. पुळणाच्या विस्तृत विभागाला चौपाटी म्हणतात.
त्सुनामीचे तीन प्रकार आहेत:
- स्थानिक त्सुनामी – या प्रकारच्या त्सुनामींचा त्सुनामी निर्माण होण्याच्या घटनेपासून (भूकंप इ.) 100 किलोमीटरच्या आत असलेल्या ठिकाणी प्रभाव पडतो. अशा त्सुनामी लोकांना सुटण्यासाठी पुरेसा वेळ देत नाहीत.
- प्रादेशिक त्सुनामी – या प्रकारच्या त्सुनामींचा प्रभाव 100km ते 1,000km मधील ठिकाणांवर होतो. ते लोकांना स्थानिक त्सुनामीपेक्षा तयारीसाठी थोडा जास्त वेळ देतात.
- दूरच्या त्सुनामी – या प्रकारच्या सुनामींचा प्रभाव 1,000 किमी पेक्षा जास्त क्षेत्रावर होतो. ते सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अधिक वेळ देते कारण किनाऱ्यावर जाण्यासाठी वेळ लागतो.
26 डिसेंबर 2004 – सुमित्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या.
भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आज वरचा हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे.
या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, थायलंड, अंदमान व निकोबार सह 14 देशातील 2.3 लाख लोक मृत्युमुखी पडले.
जगामधील सर्वात प्रलयकारी नैसर्गिक संकटामध्ये या भूकंपाचा समावेश होतो.
26 ऑक्टोबर २०१० – इंडोनेशियात शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामी चा उद्रेक.
11 मार्च 2011 – होन्शु बेटावर 8.9 रिश्चर तीव्रतेच्या भूकंपामुळे संपूर्ण जपानमध्ये त्सुनामी.
28 सप्टेंबर 2018 – इंडोनेशियात सुलावेसी बेटावर 7.5 रिश्चर तीव्रतेचा भूकंप व त्सुनामी.
22 डिसेंबर 2018 – इंडोनेशियात जावा बेटावर “चाइल्ड ऑफ क्रेकाटोआ” ज्वालामुखीचा स्फोट. त्यामुळे सुंदा समुद्रधुनीत त्सुनामी. 440 बळी.
५ नोव्हेंबर 2016 रोजी पहिला “जागतिक त्सुनामी जागरुक्ता दिन” संपन्न.