क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया कधी घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला काळ असे म्हणतात.Types of Tense in marathi
काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात.Types of Tense in marathi
१) वर्तमानकाळ(Future tense)
२) भूतकाळ(Past tense)
३) भविष्यकाळ(Present tense)
१) वर्तमान काळ: (Future tense)
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे, असे जेव्हा वाटते तेव्हा तो वर्तमान काळ असतो.
वर्तमान काळाचे एकूण चार प्रकार पडतात
- साधा वर्तमान काळ
- अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ
- पूर्ण वर्तमान काळ
- रिती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ
साधा वर्तमान काळ:
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही वर्तमान काळात घडत आहे असा बोध होतो ,तेव्हा त्यास साधा वर्तमान काळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पितो.
नेहा गाणी गाते.
लखन खो-खो खेळतो.
वरील उदाहरणांमध्ये अधोरेखित केलेले शब्द पितो , गाते , खेळतो हे क्रिया दर्शक आहेत या क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो.
अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ:
जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण आहे असा क्रियापदावरून बोध होतो, तेव्हा त्या वर्तमानकाळास अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पीत आहे.
नेहा गाणी गात आहे .
लखन खो-खो खेळत आहे.
वरील उदाहरणांमध्ये पीत आहे , गात आहे , खेळत आहे या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सध्या चालू आहे किंवा क्रिया अपूर्ण आहे ,असा आपणास बोध होतो.
पुढे हे सुद्धा वाचा
पूर्ण वर्तमान काळ:Types of Tense in marathi
जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असा क्रियापदावरून बोध होतो, तेव्हा त्यास पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात.
उदा.
रोहनने पाणी पिले आहे.
नेहाने गाणे गायले आहे.
लखन खो-खो खेळला आहे.
वरील उदाहरणांमध्ये पिले आहे , गायले आहे, खेळला आहे या क्रियापदावरून आपणास क्रिया ही नुकतीच पूर्ण झाली आहे असा बोध होतो.
रिती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ:
जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात सतत घडत आहे अशी रीत किंवा पद्धत दर्शवली जाते, तेव्हा त्यास रिती अथवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात.
उदा.
रोहन नेहमी पाणी पीत असतो.
स्वरा रोज गाणी गात असते.
लखन दररोज खो-खो खेळत असतो.
वरील तीनही उदाहरणांमध्ये क्रियापद हे एक रीत किंवा पद्धत दर्शवत आहेत. क्रिया ही सतत घडत आहे अशी रीत दर्शवण्याचे कार्य क्रियापद करीत आहेत.
२)भूतकाळ: (Past tense)
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दाखवलेली क्रिया घडून गेली आहे, असा आपणास बोध होतो तेव्हा त्यास भूतकाळ असे म्हणतात.
उदा.
गणेश पेरू खात होता.
मी अभ्यास केला होता.
नेहाने आंबा खाल्ला होता.
भूतकाळाचे एकूण चार प्रकार पडतात
- साधा भूतकाळ
- अपूर्ण किंवा चालू भूतकाळ
- पूर्ण भूतकाळ
- रिती किंवा चालू पूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ:
एखादी क्रिया ही आधी घडून गेलेली असते व त्या क्रियेविषयी आता बोलले जाते, तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पिला.
नेहाने गाणे गायले.
लखन खो-खो खेळला.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पिला, गायले, खेळला हि क्रियापदे भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली आहे ,असे दाखवतात आणि आता त्याबद्दल बोललं जात आहे असे दर्शवतात म्हणजे ते साध्या भूतकाळाची उदाहरणे आहेत.
अपूर्ण किंवा चालू भूतकाळ:
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजे त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पीत होता.
नेहा गाणे गात होती.
लखन खो-खो खेळत होता.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पीत होता, गात होती, खेळत होता ही क्रियापदे एखादी क्रिया ही मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच ती क्रिया त्यावेळेस अपूर्ण होती म्हणजे पूर्ण झालेली नव्हती असे दर्शवतात म्हणून ती अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची उदाहरणे आहेत.
पूर्ण भूतकाळ :
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहनने पाणी पिले होते.
नेहाने गाणे गायले होते.
लखन ने खोखो खेळला होता.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पाणी पिले होते, गायले होते, खेळला होता ही क्रिया दर्शवणारी क्रियापदे असे दर्शवतात की मागील काळातील क्रिया होऊन गेली होती किंवा संपलेली होती असा आपणास बोध होतो म्हणून ती पूर्ण भूतकाळाची उदाहरणे आहेत.
रिती किंवा चालू पूर्ण भूतकाळ:
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने नेहमी घडत आलेली असून, ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रिती किंवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पीत असे.
नेहा गाणी गात असे.
लखन खो-खो खेळत असे.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पीत असे, गात असे, खेळत असे ही क्रियापदे असे दर्शवतात की क्रियाही भूतकाळात नेहमी घडत आलेली आहे आणि ती क्रिया पूर्ण देखील झालेली आहे.
३)भविष्यकाळ: (Present tense)
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो ,तेव्हा त्यास भविष्यकाळ असे म्हणतात.
उदा.
गणेश पेरू खाईल.
मी अभ्यास करील.
स्वरा पाणी पीईल.
भविष्यकाळाचे एकूण चार प्रकार पडतात.
- साधा भविष्यकाळ
- अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ
- पूर्ण भविष्यकाळ
- रिती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ
साधा भविष्यकाळ:
एखादी क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो ,तेव्हा त्यास साधा भविष्यकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पिईल.
नेहा गाणी गाईल.
लखन खोखो खेळेल.
वरील उदाहरणांमध्ये पिईल, गाईल , खेळेल ही क्रियापदे भविष्यात क्रिया घडणार आहे असे दाखवतात, म्हणून ही साधा भविष्यकाळाची उदाहरणे आहेत.
अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ:
एखादी क्रिया ही भविष्यकाळात चालू असेल असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पीत असेल.
नेहा गाणी गात असेल.
लखन खोखो खेळत असेल.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पीत असेल, गात असेल, खेळत असेल या क्रियापदावरून भविष्यात क्रिया चालू असेल ,असा बोध होतो म्हणून ही अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाची उदाहरणे आहेत.
पूर्ण भविष्यकाळ:
एखादी क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण असलेली दर्शवते, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहनने पाणी पिले असेल.
नेहाने गाणे गायले असेल.
लखन ने खोखो खेळला असेल.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पिले असेल ,गायले असेल, खेळला असेल या क्रियापदाच्या रूपावरून असा बोध होतो की ही क्रिया भविष्यकाळात ही क्रिया पूर्ण झालेली असेल, म्हणून ही पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणे आहेत.
रिती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ:
एखादी क्रिया ही भविष्यकाळात नेहमी घडणार असेल, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रिती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.
उदा.
रोहन पाणी पीत जाईल.
नेहा गाणी गात जाईल.
लखन खोखो खेळत जाईल.
वरील तीनही उदाहरणांमध्ये पीत जाईल. गात जाईल, खेळत जाईल या क्रियापदाच्या रूपावरून असा बोध होतो की, या क्रिया भविष्यकाळात नेहमी घडणार आहेत ,म्हणून ही उदाहरणे रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाची आहेत.