भारतीय राज्यघटनेत (संविधानात) उपपंतप्रधान पदाची Voice Priminister कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. राजकीय सोय म्हणून हे पद निर्माण केले जाऊ शकते.
तरीही भारत देशात उपपंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, चौधरी देवीलाल, लाल कृष्ण आडवाणी यांनी उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले.
भारताचे उपपंतप्रधान हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. जे जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.
सातवे आणि शेवटचे उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी होते. ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2002 ते 2004 या कालावधीत गृहमंत्री शिवाय हे पद स्वीकारले होते.
सध्याच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान नाही.
उपपंतप्रधान यांच्या स्थितीचा उपयोग गटबंधन सरकारच्या अंतर्गत किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राजकीय स्थिरता आणि ताकद आणण्यासाठी वापरला जातो जेव्हा आदेशाची एक योग्य शृंखला आवश्यक असते.
उपपंतप्रधान | पक्ष | कालावधी |
सरदार वल्लभभाई पटेल | राष्ट्रीय काँग्रेस | 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 |
मोरारजी देसाई | राष्ट्रीय काँग्रेस | 21 मार्च 1967 ते 6 डिसेंबर 1969 |
चौधरी चरण सिंग | जनता पार्टी | 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 |
जगजीवन राम | जनता पार्टी | 24 मार्च 1977 ते 22 ऑगस्ट 1979 |
यशवंतराव चव्हाण | राष्ट्रीय काँग्रेस | 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 |
चौधरी देवीलाल | जनता दल | 2 डिसेंबर 1989 ते 21 जून 1991 |
लाल कृष्ण आडवाणी | भाजपा | 5 फेब्रुवारी 2002 ते 22 मे 2004 |