पूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभाग Wardha Jilha वर्धा हा जिल्हा येतो. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर आहे. Wardha Jilha वर्धा जिल्ह्याला “शिक्षणाची पंढरी” असे म्हणतात. विद्युतीकरणात आघाडीवर असलेला जिल्हा आहे.
मुख्यालय – वर्धा (पूर्वीचे पालकवाडी)
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 6310 चौकिमी
स्थान व विस्तार – वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेस, पूर्वेस, ईशान्येस नागपूर जिल्हा, आग्नेयस चंद्रपूर जिल्हा, दक्षिण व नैऋत्येस यवतमाळ, पश्चिमेस व वायव्येस अमरावती जिल्हा.
तालुके(8) – वर्धा, आष्टी, आर्वी, देवळी, कारंजा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर.
नद्या – वर्धा, पूर्णा, अमरावती, धाम. वर्धेचे उपनद्या बाकळी, यशोदा, वेण्णा.
नदीकाठावरील ठिकाणे – हिंगणघाट(वेण्णा), पुलगाव(वर्धा), पवनार(धोम), टाकरखेडा(वर्धा).
धरणे – सेलू तालुक्यात बोर नदीवर बोर धरण.
नियोजित प्रकल्प – अंजनसरा, कार.
पिके – ज्वारी, गहू, कापूस. जिल्ह्यात रब्बी व हंगामी पिके घेतात. कापूस हे प्रमुख पीक आहे. आर्वी ही कापसाची बाजारपेठ आहे.
व्याघ्र प्रकल्प – बोर व्याघ्र प्रकल्प
अभयारण्य – बोर, नवीन बोर
तलाव – महाकाली
पठार – तळेगाव पठार
लेणी – हिंगणघाट, पवनार.
गड/किल्ले – सोनेगाव, देवळी.
वने – वृक्ष : साग, तेंदू, ऐन, खैर बाभूळ इत्यादी.
मृदा – जिल्ह्यात काळी मृदा आढळते.
- वर्धा या शहराचे पूर्वीचे नाव पालकवाडी असे होते. पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास होऊन आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले आहे.
- आष्टी हे 1942 च्या आंदोलनात प्रकाशात आलेले प्रमुख ठिकाण आहे.
- हिंगणघाट येथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे.
- पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेले “परमधाम आश्रम” आहे.
- टाकरखेडा येथे संत लहानोजी महाराज यांची समाधी वर्धा नदीकाठी आहे.
- सेवाग्राम येथे महात्मा गांधींचा आश्रम आहे. महात्मा गांधी ज्या झोपडीत राहत होते ती, झोपडी “बापू-कुटी” आजही सेवाग्राम येथे पाहण्यास मिळते.
- सारंगपूर येथे तेलंगराय बाबांचे मंदिर व समाधी आहे.
- आर्वी येथे जैन धर्मियांचे काचेचे मंदिर आहे. आर्वी तालुक्याला “संतांची आर्वी” म्हणतात.
- वर्धा येथे बौद्ध धर्माचे “विश्वशांती स्तूप” आहे.
- वर्धा जिल्ह्याला “गांधीजींचा जिल्हा” असे म्हणतात.
- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ(1997) वर्धा येथे आहे.
- वर्धा येथे मगन संग्रहालय आहे.
- सेवाग्राम राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा येथे आहे.
- हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा येथे आहे.
- वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर गरमसूर आहे.
- “गौळावू गुरांचे माहेरघर” मानन्यात येणारा वर्धा जिल्हा आहे. आर्वी येथे शुद्ध जातीची गौळावू गाय मिळतात.
- संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा वर्धा आहे.
- भूगाव येथे पोलाद कारखाना आहे.
- हिंगणघाट येथे जैन मंदिर व मल्हारी मार्तंड मंदिर प्रसिद्ध आहे.
- केळझर येथे स्फोटक द्रवाचा कारखाना आहे.