Pruthviche Avaran : पृथ्वीचे आवरण

Pruthviche Avaran:

  • शिलावरण (Lithosphere)
  • जलावरण (Hydrosphere)
  • वातावरण (Atmosphere)
  • जीवावरण (Biosphere)

शिलावरण (Lithosphere)

पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भाग म्हणजे शिलावरण होय.

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतचा भाग हा शिलावरणाचा भाग असतो.

शिलावरणात पर्वत, पठार, डोंगर, मैदाने इत्यादी भूरूपांचा समावेश होतो. शिलावरण हे खडकांनी बनलेले असते.

अग्नीज खडक, स्तरीत खडक, रूपांतरित खडक असे खडकांचे तीन प्रकार आहेत.

जमिनीच्या सलग व मोठ्या भागास “खंड” असे म्हणतात.

आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका ही सात खांडे आहेत. या खंडांच्या दरम्यान महासागर आहेत.

जलावरण (Hydrosphere) :

पृथ्वीवरचा जलभाग म्हणजेच जलावरण होय.

महासागर, सागर, सरोवर, तलाव, नद्या हे सर्व जलावरणाचे भाग आहेत.

पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास “महासागर” असे म्हणतात.

पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर व आर्क्टिक महासागर असे चार महासागर आहेत.

आकाराने लहान खाऱ्या पाण्याचे साठे म्हणजेच “समुद्र” होय. उदाहरण – अरबी समुद्र, कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र, अरल समुद्र.

तीनही बाजूंनी जमीन असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या जयालाशयास “उपसागर” असे म्हणतात. उदाहरण- बंगालचा उपसागर.

जमिनीत घुसलेल्या सागराचा अरुंद भाग म्हणजे “आखात” होय. उदाहरण-खंबातचे आखात.

खाडी आखातापेक्षा लहान व अरुंद असते समुद्राची जमिनीतील घुसलेल्या अरुंदपट्टा म्हणजे “खाडी” होय.

दोन जलाशयांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे “सामुद्रधुनी” होय. उदाहरण- पाल्कची सामुद्रधुनी.

वातावरण (Atmosphere):

पृथ्वी भोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात.

वातावरण हे वायू, बाष्प, धुलिकणापासून बनलेले असते. वातावरणातून सर्व सजीवांना प्राणवायू मिळतो.

भूपृष्ठालगत वातावरण दाट असते व जास्त उंचीवर जावे तसे तसे हवा विरळ होत जाते.

ओझोन वायू सूर्याच्या अतिनील किरणापासून जीवसृष्टीचे रक्षण करतो त्यामुळे जीवसृष्टीचे रक्षण होते.

वातावरणात हवेचे तापमान उंचीनुसार बदलते.

जीवावरण (Biosphere) :

पृथ्वीच्या तिन्ही आवरणात आढळणारी जीवसृष्टी म्हणजेच जीवावरण होय.

जीवावरणात वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. सजीवांना प्राणवायु, उष्णता, पाणी, अन्न लागते.

भूपृष्ठाजवळ सजीवांची संख्या जास्त आहे. जमिनीखाली आणि जलाशयात एका ठराविक खोलीपर्यंत जीवावरण आढळते.

सजीवांना जगण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन, उष्णता, पाणी व अन्न जेथे उपलब्ध असतात तेथे जीवसृष्टी उदयाला येते.

Leave a comment