Bharti Ohoti : भरती व ओहोटी

सागराच्या पाण्याच्या पातळीत दररोज होणारा नियमित चढ-उतार म्हणजेच भरती व ओहोटी-Bharti Ohoti होय.

Bharti Ohoti-भरती ओहोटीस कारणीभूत घटक –

1)चंद्र – सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण

2)पृथ्वीचे परिभ्रमण व चंद्राचे अप्रत्यक्ष सूर्याभोवती परिभ्रमण

3)पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रोत्सारीत प्रेरणा

भरती ओहोटीचे अस्तित्व व तिच्या वेळा या चंद्राच्या पृथ्वीसापेक्ष स्थितीशी संबंधित आहेत. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी येते.

एखाद्या ठिकाणी जेव्हा भरती येते तेव्हा त्या ठिकाणच्या प्रतिपादि बिंदूवर किंवा रेखावृत्तावर त्याचवेळी भरती येते.

ज्यावेळी 0° रेखावृत्तावर भरती असते, तेव्हा त्याच वेळी त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180°  रेखांश रेखावृत्तावर ही भरती असते.

ज्यावेळी 0°  व 180° अंश रेखावृत्तावर भरती असते त्यावेळी त्यांना काटकोन स्थितीत असणाऱ्या रेखावृत्तावर ओहोटी असते.

पृथ्वीवर जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते, त्याचवेळी त्या स्थानापासून 90° कोनातील पृथ्वीवरील स्थानावर ओहोटी येते.

दिवसातून साधारणतः दोन वेळा भरती येते.

दोन भरतींच्या वेळांमधील अंतर सुमारे 12 तास 25 मिनिटे इतके आहे.

उधाणाची भरती(Spring Tide) ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व तुलनेने मोठी असते.

अमावस्या व पौर्णिमेला सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच सरळ रेषेत असल्यामुळे त्यांच्या आकर्षण प्रेरणांची बेरीज होऊन शक्ती वाढते, परिणामी त्यावेळी उधानाची मोठी भरती येते.

भांगाची भरतीओहोटी    (Neap Tide) – भांगाची भरती ओहोटी अष्टमीच्या दिवशी येते या दिवशी चंद्र, सूर्य एकमेकांशी काटकोनात असतात. ही भरती – ओहोटी सर्वात लहान असते

भरती ओहोटीच्या कक्षा

  • भरती – ओहोटी वेळच्या पाणी पातळीतील फरक म्हणजे भरती – ओहोटीची कक्षा होय.
  • खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेंटीमीटर इतकी असते. द्वीपकल्पीय भागात दोन्ही किनाऱ्यावर ही कक्षा 100 ते 150 सेंटीमीटर असते.
  • भारतातील सर्वात मोठी भरती – ओहोटीची कक्षा गुजरात मधील पोरबंदर येथे सुमारे 1100 सेंटीमीटर इतकी आहे.
  • जगातील सर्वात मोठी भरती – ओहोटी कक्षा उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस असलेल्या फंडीच्या उपसागरात असून ती 1600 सेंटीमीटर इतकी आहे.
  • समुद्री लाटेच्या उंच भागास शीर्ष व खोलगट भागास द्रोणी म्हणतात.
  • लाटांबरोबर समुद्रातील पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वाहन होते.

Leave a comment