Pruthvichi Gati परिवलन व परिभ्रमण या पृथ्वीच्या दोन प्रमुख गती आहेत.
1)परिवलन:
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस परिवलन असे म्हणतात.
पृथ्वी एका तासात स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या चार मिनिटात स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते.
परिवलनाचे परिणाम –
पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती होते. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होऊन तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे रात्र होते.पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू राहते.
पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांनादिशा प्राप्त होते.
2)परिभ्रमण:
सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या या गतीस परिभ्रमण असे म्हणतात.
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार आहे. पृथ्वीच्या परिभ्रमण गतीस तिची “वार्षिक गती” असे म्हणतात.
पृथ्वीची उपसूर्य स्थिती – परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते, ही पृथ्वीची उपसूर्य स्थिती असते. यावेळी पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्याकडे असते.
पृथ्वीची अपसूर्य स्थिती – परिभ्रमणा दरम्यान पृथ्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यात सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, ही पृथ्वीची अपसूर्य स्थिती होय. यावेळी पृथ्वीच्या आसाचे उत्तर टोक सूर्याकडे असते.
परिभ्रमणाचे परिणाम –
परिभ्रमणाचे खालील परिणाम आढळतात.
- 1.सूर्याचे भासमान भ्रमण
- 2.दिवस रात्रीची असमानता
- 3.ऋतूंची निर्मिती
- 4.तापमानांचे कटिबंध
1)सूर्याचे भासमान भ्रमण –
पृथ्वीचे परिभ्रमण व तिच्या आसाचे कलणे यामुळे सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेरीकडे सरकल्याचा भास होतो, हेच सूर्याचे भासमान भ्रमण होय. 21 जुने रोजी सूर्य दक्षिणेकडे व 22 डिसेंबर रोजी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतो. या दिवसांना “अयन दिन” असे म्हणतात.
उत्तरायण
22 डिसेंबर नंतर पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कलतो. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकू लागल्याचे भासते याला उत्तरायण असे म्हणतात. उत्तरायण 22 डिसेंबर ते 21 जून या काळात असते. 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर असतो. या दिवशी उत्तरायण पूर्ण होते. उत्तर गोलार्धात या काळात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 21 जून या दिवसाला “उन्हाळा आयन दिन” असे म्हणतात
दक्षिणायन
21 जून नंतर सूर्यदक्षिणेकडे सरकू लागल्याचे भासते व दक्षिणायन सुरू होते. 21 जून ते 22 डिसेंबर या काळात दक्षिणायन चालते. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (अक्षवृत्त) असतो. या दिवशी दक्षिणायन पूर्ण होते. दक्षिण गोलार्धात या काळात उन्हाळा तर उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. २२ डिसेंबर या दिवसाला “हिवाळा आयन दिन” असे म्हणतात.
2)दिवस रात्रीची असमानता –
परिभ्रमण काळात पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे दिवस रात्रीची असमानता निर्माण होते. 22 मार्च व 23 सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी 12 तासाचे असतात. त्या दिवसांना “विषुव दिन” म्हणतात. 21 जून या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्याकडे कलतो. म्हणून 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. 21 जून या दिवशी
उत्तर अक्षवृत्तावर (आर्क्टिक वृत्त) 24 तासांचा दिवस असतो. या काळात
अक्षवृत्तावर (उत्तर ध्रुव) सहा महिने दिवस (प्रकाश) असतो.
दक्षिण गोलार्धात या काळात नेमकी याच्या उलट स्थिती असते म्हणजे- 21 जून रोजी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. दक्षिण अक्षवृत्तावर (अंटार्क्तिक वृत्त )24 तासांची रात्र तर
द. अक्षवृत्तावर सहा महिने अंधार असतो.
3)ऋतूंची निर्मिती –
पृथ्वीचे लंबवर्तुळाकार परिभ्रमण व तिचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे ऋतूंची निर्मिती होते. परिभ्रमणामुळे जेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात याच काळात हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
4)तापमानाचे कटिबंध –
विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना उष्णता कमी कमी होत जाते व उष्णतेचे कटिबंध प्रत्ययास येतात.
उष्ण कटिबंध – सूर्याचे भासमान भ्रमण उत्तरेकडे कर्कवृत्तापर्यंत उ.) आणि दक्षिणेस मकरवृत्तापर्यंत (
) होते. या टप्प्यात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने तापमान अधिक असते. पर्यायाने
उ. ते
द. (कर्कवृत्त ते मकरवृत्त ) हा टप्पा उष्णकटिबंध म्हणून ओळखला जातो.
समशीतोष्ण कटिबंध – कर्कवृत्त व मकरवृत्तापलीकडे उ. ते
द. अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे उन्हाळ्यात तिरपी पडतात तेथे कमी उष्णता असते.
पर्यायाने दोन्ही गोलार्धात ते
उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या (कर्कवृत्त ते आर्क्टिक वृत्त आणि मकरवृत्त ते अंटार्टिक वृत्त) पट्ट्यास समशीतोष्ण कटिबंध असे म्हणतात.
शीत कटिबंध – (उत्तर व दक्षिण) अक्षवृत्ता पलीकडे दोन्ही ध्रुवापर्यंत उन्हाळ्यात अतिशय कमी उष्णता मिळते तर हिवाळ्यात तेथे सूर्यकिरणे पोहोचत नाहीत म्हणून दोन्ही गोलार्धातील
ते
अक्षवृत्तापर्यंतच्या पट्ट्यास शीत कटिबंध असे म्हणतात.
संपात स्थिती – परिभ्रमणादरम्यान 21 मार्च व 23 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्यकिरणे विश्ववृत्तावर लंबरूप पडतात. या दोन्ही दिवशी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. ही पृथ्वीची संपात स्थिती होय. या दिवशी पृथ्वीवर दिवस रात्र चा कालावधी समान असतो. संपात दिन म्हणजे विषुवदिन. या दिवशी सूर्य विषुवृत्तावर असतो.
21 मार्च ते 21 जून – उत्तर गोलार्धात वसंत ऋत्व असतो.
23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर – उत्तर गोलार्धात शरद ऋतू असतो.
21 मार्च – उत्तर गोलार्धात वसंत संपात असतो.
23 सप्टेंबर – उत्तर गोलार्धात शरद संपात असतो.
22 डिसेंबर ते २१ जून | उत्तरायण | उत्तर गोलार्धात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा |
21 जून ते 22 डिसेंबर | दक्षिणायन | उत्तर गोलार्धात हिवाळा दक्षिण गोलार्धात उन्हाळा |
21 जून व 22 डिसेंबर | अयन दिन | 21 जून दक्षिणायन 22 डिसेंबर उत्तरायण |
21/22 मार्च ते 23 सप्टेंबर | विषुव दिन | दिवस व रात्र समसमान (प्रत्येकी 12 तासांचे) |