Surya : सूर्य

  • Surya-सूर्य हा एक तारा आहे. सूर्याची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली असावी.

Surya- तारा – आकाशातील स्वयंप्रकाशित व उष्ण तेजस्वी गोलस तारे असे  म्हणतात.

  • सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा असून तो स्वत:भोवती फिरतो.
  • सूर्य सतत जळत राहतो. सूर्य दर सेकंदाला 4 कोटी टन हायड्रोजन वापरतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे.
  • सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात.
  •  सूर्य पृथ्वीवरील उष्णता, प्रकाश आणि पर्यायाने जीवसृष्टी यांचा प्रत्यक्ष स्रोत आहे. 
  • सूर्य हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.
  • सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ 15 कोटी किलोमीटर किंवा 9 कोटी 30 लाख मैल इतके आहे.
  • सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोहोचायला 8.3 मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश संश्लेषण नावाची एक जैव रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे.
  • सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, कार्बन, निऑन, कॅल्शियम, क्रोमियम, इत्यादी घटकांपासून बनला आहे. यापैकी हायड्रोजनचे प्रमाण 74% आणि हेलियम चे प्रमाण 24% आहे.
  • सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे.

Leave a comment