Suryagrahan : सूर्यग्रहण

अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं.

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण-Suryagrahan होते. चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या भागावर पडते तेथून सूर्यग्रहण दिसते. सर्व सूर्यग्रहणे अमावस्येला होतात, मात्र प्रत्येक अमावस्येला सुर्यग्रहण होत नाही. एका वर्षात किमान दोन वेळा ते कमाल पाच वेळा सूर्यग्रहण होते.

चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून सूर्य ग्रहणाचे तीन प्रकार पडतात.

1)खंडग्रास सूर्यग्रहण

2)खग्रास सूर्यग्रहण

3)कंकणाकृती सूर्यग्रहण

1)खंडग्रास सूर्यग्रहण

खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो.

खंडग्रास सूर्यग्रहणात चंद्राच्या पृथ्वीवरील उपछायेमुळे सूर्याचा केवळ थोडाच भाग झाकला जातो. चंद्राच्या उपछायेच्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.

2)खग्रास सूर्यग्रहण

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणात चंद्राच्या पृथ्वीवरील प्रछायेमुळे संपूर्ण सूर्य झाकला जातो. चंद्र सूर्यापेक्षा अगदी पृथ्वीपेक्षाही खूप लहान आहे पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाराने एकसारखे दिसतात आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्रा  बिम्ब सूर्य बिम्बाला पूर्णपणे झाकू शकतं.

खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद (440 सेकंद) असतो. . चंद्राच्या प्रछायेच्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसते.

3)कंकणाकृती सूर्यग्रहण

पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदू जवळ असतो. अशावेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो. यादरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो. पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही तर, एखादं कंकणासारखी म्हणजे बांगडी सारखी सूर्याची कडी दिसून येते. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात.

पण हे ग्रहण केवळ 10 ते 20 सेकंद इतकेच अल्पकाळ टिकते.

विधान:

चंद्र जेव्हा एखाद्या तारा किंवा ग्रहासमोरून जातो तेव्हा ती खगोलीय वस्तू तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे लुप्त होते यास विधान म्हणतात. खग्रास सूर्यग्रहण हे विधान चे उदाहरण आहे

अधिक्रमण:

पृथ्वी व सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतग्रह आल्यास ते अधिक्रमण होय अधिक्रमण हे सूर्यग्रहणाप्रमाणेच असते.

Leave a comment