Bhukamp : भूअंतर्गत हालचाली-भूकंप

Bhukamp: भूकंप केंद्र(भूकंपनाभी) – भू-गर्भात ज्या बिंदूपासून भूकंप लहरी उत्पन्न होतात त्याला भूकंप केंद्र म्हणतात.

अपिकेंद्र भूपृष्ठावरील असा भाग ज्यावर सर्वात पहिल्यांदा भूकंप तरंग पोहोचतात.

भूकंप झाल्यावर भूकंप लहरी उत्पन्न होतात. भूकंप तरंगाची नोंद भूकंपालेख यंत्राद्वारे केली जाते, त्यास सिस्मोमिटर(Seismometer) म्हणतात.

भूकंपाच्या आलेखास सिस्मोग्राफ(Seismograph) म्हणतात व भूकंप लहरी मोजण्याच्या एककास “रिश्चर” असे म्हणतात.

भूकंप निर्मितीची कारणे-

  • ज्वालामुखी उद्रेक
  • घड्याळ व प्रस्तरभंग
  • भूस्खलन
  • मानवनिर्मित

भूकंप तरंग किंवा भूकंप लहरीचे तीन प्रकार आहेत.

1)प्राथमिक लहरी

भूकंप झाल्यानंतर भूकंप केंद्रातून बाहेर पडणाऱ्या सुरुवातीच्या लहरींना प्राथमिक लहरी असे म्हणतात. प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी सरळ रेषेत प्रवास करतात. या लहरी सर्वात अधिक वेगवान असतात. यांचा सरासरी वेग 5 km/sec ते 12 km/sec आहे.

ध्वनीलहरीप्रमाणे कणांचे कंपन लहरीच्या संचरण दिशेने किंवा लहरीच्या दिशेने मागेपुढे होते.

या लहरी घन,द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करतात.

2)दुहेरी (दुय्यम) लहरी

प्राथमिक लहरी नंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी असे म्हणतात. दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरीच्या निम्मा असतो. या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात व त्या द्रव माध्यमात शोषल्या जातात. या लहरीतील कणांचे कंपन लहरीच्या दिशेने आरपार किंवा समलंब दिशेत होते. प्रावरणातून या लहरी प्रवास करत नाहीत. प्राथमिक लहरी पेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

3)भूपृष्ठीय लहरी

प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत (अपीकेंद्र) येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या दीर्घ लहरी असतात. यांचा वेग सर्वात कमी 3.2 km/sec असतो. या लहरी भूपृष्ठावर सर्वात शेवटी पोहोचतात. भूपृष्ठीय लहरी सागरांच्या लहरीप्रमाणे भूपृष्ठावरून प्रवाहित होतात. या लहरीमुळे महासागरात त्सुनामी तयार होतात. या लहरींचा वेग अतिशय कमी असतो, मात्र या लहरी सर्वाधिक विध्वंसक असतात. ज्यामुळे नैसर्गिक अपदा (Natural desaster) येते.

भूकंपाचे परिणाम-

  • जमिनीला तडे पडतात.
  • भूमिपात होऊन दरी कोसळतात.
  • काही वेळा भुजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणात- विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
  • काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
  • सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवीत व वित्तहानी होऊ शकते.
  • हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
  • इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.

जगातील भूकंपय क्षेत्र

1)प्रशांत महासागरीय पेटी

जगातील 65% भूकंप या पेटीत आढळतात. या पेटीत न्युझीलँड, इंडोनेशिया, चीन, जपान, रशिया, कॅलिफोर्निया, पेरू, चिली इत्यादी प्रदेश येतात. या पेटीला अग्नि कंकण म्हटले जाते.

जगात सर्वात जास्त भूकंप जपान मध्ये होतात, म्हणून त्यास भूकंपाचा देश असे म्हणतात.

2)अटलांटिक पेटी

अटलांटिक महासागरात अटलांटिक रिज जवळ अनेक बेटांचा समावेश होतो.

3)भूमध्ये सागरीपट्टा

4)हिमालय पर्वतीय पट्टा

यामध्ये भारतातील हिमालय पर्वतीय क्षेत्र भूकंप पट्ट्यात येते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यात भूकंपाचे धक्के जाणवतात.

भारतातील प्रमुख भूकंप

1967 – कोयना भूकंप (महाराष्ट्र) 6.6 रिश्टर.

1993 – लातूर, किल्लारी भूकंप (महाराष्ट्र)  6.2 रिश्टर.

1996 – जबलपूर भूकंप (मध्य प्रदेश)

26 जानेवारी 2001 – गुजरात मधील कच्च-भुज भूकंप 7.7 रिश्टर.

26 डिसेंबर 2004 – सुनामी लहरी.

18 सप्टेंबर 2011 –  सिक्कीम भूकंप.

30जून 2014 – माळीण (पुणे) या गावावर “माडमा” डोंगर कोसळून संपूर्ण गाव भुईसपाट.

6 फेब्रुवारी 2023 – तुर्की व सिरीया या देशात भूकंप 7.8 रिश्टर.

Leave a comment