Geographical and political history of India
Geographical and political history of India : 15 ऑगस्ट 1947 ला भारत भारताला स्वातंत्र मिळाले व इंग्रजी साम्राज्याखाली जखडलेला भारत मुक्त झाला. 26 जानेवारी 1950 ला भारत हे जगातील सर्वात मोठे सार्वभौम लोकशाही गणराज्य राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले.
भारताचा विस्तार हा खूप मोठा आहे, त्यामुळे भारताची प्राकृतिक रचना, हवामान, नदी प्रणाली, नैसर्गिक वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन, खनिज संपत्ती, मृदा यामध्ये विविधता आढळते.
भारताची मुख्य भूमी उत्तरेला “काश्मीर” पासून दक्षिणेला “कन्याकुमारी” पर्यंत तसेच पूर्वेला “अरुणाचल प्रदेश” पासून पश्चिमेला “गुजरात” राज्यापर्यंत विस्तारलेली आहे.
भारत राजकीय दृष्ट्या स्वतंत्र देश असला तरी भौगोलिक दृष्ट्या तो भारतीय उपखंडाचा भाग आहे.
पुढे वाचा सामान्य ज्ञान online सराव परीक्षा
भारतीय उपखंड
भारत हे आशिया खंडाच्या दक्षिण भागातील प्रमुख राष्ट्र आहे. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे किरथर, सुलेमानच्या पूर्वेकडे काराकोरम व राखीनियोमानोच्या पश्चिमेकडील भाग आशिया खंडापासून तुटल्यासारखा दिसतो, म्हणून त्या भागाला “उपखंड” असे म्हणतात. उपखंडाचा सर्वाधिक भाग भारत भूमीने व्यापलेला आहे म्हणून त्यास “भारतीय उपखंड” असे म्हणतात.
भारतीय उपखंडात भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांचा समावेश होतो.
भारतीय उपखंड हे पूर्व गोलार्धात साधारणतः मध्यवर्ती आहे.
भारताचे स्थान
पृथ्वीगोलाचे निरीक्षण केल्यास भारतीय मुख्य भूमी व सर्व बेटे विषुवृत्ताच्या उत्तर भागात आहेत म्हणजेच भारत उत्तर गोलार्धात आहे. भारताचे स्थान आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
भारताचे स्थान उत्तर-पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. देशातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम या आठ राज्यातून कर्कवृत्त जाते.
भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त म्हणजेच २३ ३०’ उत्तर अक्षवृत्त गेले आहे. कर्कवृत्ता लगतचा भारताचा भूभाग विस्तृत आहे.
भारताचा अक्षवृतीय विस्तार 8 4′ उत्तर अक्षवृत्त आणि 37 6′ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.
भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व रेखावृत्त ते ९७ २५’ पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान आहे.
ग्रेट निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. ते ६ ४५’ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबादजवळून गेलेले 82 30′ पूर्व रेखावृत्त हे भारताचे प्रमाण रेखावृत्त आहे.या रेखावृत्ताव्रून भारतीय प्रमाणवेळ ठरवली आहे.
भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात आहे. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
भारताचा विस्तार व क्षेत्रफळ-
भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा क्रमांक लागतो. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौ.की.मी. आहे.
जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42 टक्के क्षेत्र भारताच्या वाट्याला आले असून जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5 टक्के लोकसंख्या भारतात राहतात.
पुढे आणखी वाचा MPSC Pre exam 2024 syllabus : अभ्यासक्रम
जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असलेली पहिली सात राष्ट्र- जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशियाचा प्रथम क्रमांक लागतो. रशिया, कॅनडा, चीन, यू.एस.ए., ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत.
भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार 2933 कि.मी. आहे (गुजरातचे पश्चिम टोक (घुअरमोटा)ते अरूणाचल प्रदेशचे पुएव टोक (किबिथू) ).
भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार 3214 कि.मी. आहे(काश्मीरचे उत्तर टोक (द्फ्दार)ते मुख्य भूमीचे दक्षिण टोक (कन्याकुमारी)).
भारताच्या राजकीय सीमारेषा-
भारताला भू-सीमा व जल सीमा दोन्ही लाभले आहेत.
भारताला शेजारील सात देशांच्या सीमारेषा भेटल्या आहेत.
भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार या सात देशांच्या सीमारेषा भेटल्या आहेत.
भारताच्या वायव्येस “पाकिस्तान”, “अफगाणिस्तान”.
भारताच्या उत्तरेस “चीन” “नेपाळ” “भूतान”.
भारताच्या पूर्वेस “म्यानमार” “बांगलादेश”.
बांगलादेशाची भारताला सर्वाधिक लांबीची सीमारेषा भेटली आहे 4053 कि.मी.
अफगाणिस्तान देशाची सर्वात कमी सीमा रेषा आहे 80 कि.मी.
भूटान 605 कि.मी.
चीन 3380 कि.मी.
म्यानमार 1463 कि.मी.
अफगाणिस्तान 80 कि.मी.
भारताच्या नैसर्गिक व जलसिमा-
भारताच्या दक्षिणेस “हिंदू महासागर” भारताच्या पूर्वेस “बंगालचा उपसागर” भारताच्या पश्चिमेस “अरबी समुद्र” भारताच्या उत्तरेला “हिमालय पर्वतरांगा” आहेत.
भारताची एकूण भू-सीमा 15200 किलोमीटर आहे.
भारताला बेटासह लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी 7517.6 किलोमीटर आहे.
भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा 6100 किलोमीटर आहे.
भारताच्या सीमारेषा-
भारतीय उपखंडास हिमालय पर्वत, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या नैसर्गिक सीमा लाभल्या आहेत. दक्षिण भारताचा भाग तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला असल्यामुळे त्या भूमीस “भारतीय द्वीपकल्प” असे म्हणतात.
आग्नेयेस इंडोनेशिया व नैऋत्येला मालदीव ही राष्ट्र आहेत.
भारत आणि श्रीलंका दरम्यान मन्नारचे आखात व पाल्कची समुद्रधुनी आहे त्यामुळे भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका वेगळे झाले आहे. ते थोडे खाली सरकले आहे. भारत व श्रीलंका या दोन देशा दरम्यान ’रामसेतू’ (अडमचा पूल) आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे.
भारताचे राजकीय विभाग-
भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या दृष्टीने भारतात भाषांवर प्रांतरचनेनुसार जी राज्य अस्तित्वात आलेली आहेत त्यांची संख्या सध्या २८ आहे.
भारतात एकूण २८ घटक राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश (संघराज्य) आहेत. भारताची राजधानी दिल्ली असून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे.
अलीकडेच म्हणजे २ जून 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधील काही भाग वेगळा करून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहेत. सध्या तरी त्या राज्याची राजधानी आंध्रप्रदेश ची राजधानी आहे हैदराबाद हीच आहे.
भारतातील सर्व राज्यांच्या विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य आहे, तर गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.