Jalsinchan Prakalp
दामोदर खोरे योजना
दामोदर योजना हि अमेरिकेच्या “टेनेसी व्हॅली” या योजनेवर आधारित आहे.
1948 साली भारतात दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना झाली. दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे.
विभाजनपूर्व बिहार व पश्चिम बंगाल या राज्याचा हा संयुक्त प्रकल्प आहे.
या महायोजनेमुळे झारखंड व पश्चिम बंगाल राज्यातील दामोदर नदीच्या महापुराची समस्या मिटली असून “दामोदर म्हणजे तात्कालीन बिहारचे दु:खाश्रू” ही संकल्पना मागे पाडण्यास मदत झाली.
पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेल्या या प्रकल्पात खालील ठिकाणी धरणे बांधण्यात आली.
- झारखंड राज्यात : तिलैय्या, मैथुन, पंचेत, काणोर येथे धरणे बांधण्यात आली.
- पश्चिम बंगाल राज्यात दुर्गापूर येथे धरण बांधण्यात आले.
भाकरा–नांगल प्रकल्प
भाकरा-नांगल प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाची स्थापना 1947 साली सतलज नदीवर झाली. या प्रकल्पाचा उद्देश जलसिंचन व विद्युत निर्मितीसाठी आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान व हरियाणा या चार राज्यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पातील वीज पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंदिगड या राज्यांना पुरवली जाते.
नदीवर दोन टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात हिमाचल प्रदेशात भाकरा (जि. विलासपुर) येथे 226 मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. तर दुसरा टप्प्यात पंजाब राज्यात रो[पोरजवळील नानगल येथे 29 मीटर उंचीचे धरण बांधले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी “New Temple of Resurgent India” या शब्दात भाक्रा धरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
भाक्रा धरणाची वैशिष्ट्ये –
या धरणाच्या जलाशयाचे नाव गोविंद सागर असे आहे.
गोविंद सागर हा जलाशय देशातील तिसरा मोठा जलाशय आहे व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे हे धरण आहे. येथून नानगल धरणात पाणी सोडले जाते.
हिराकुड प्रकल्प
हिराकुड प्रकल्प हा ओडीसा राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उपयोग पूर नियंत्रण व जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो.
ओडिसा राज्यातील संबळपूर जवळ हिराकुड येथे महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण आहे.
हिराकूड प्रकल्पातील जलविद्युत रुरकेला(ओडीसा) येथील लोह-पोलाद प्रकल्पास पुरवली जाते. महानदी तीच्या मांद, तेल या उपनद्यांमुळे येणाऱ्या महापुराचे नियंत्रण पाणीपुरवठा हे उद्देश सफल झाले आहेत.
उकाई प्रकल्प
उकाई प्रकल्प हा गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. याचा उद्देश पूर नियंत्रण, जलसिंचन व विद्युत निर्मिती असा आहे. या योजनेअंतर्गत गुजरात मध्ये तापी नदीवर सुरत जिल्ह्यातउकाई व काक्रापारा ही दोन धरणे बांधली आहेत.
तुंगभद्रा प्रकल्प
विभाजन पूर्व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. याचा उद्देश जलसिंचन व विद्युत निर्मिती असा आहे.
रीहांद प्रकल्प
रीहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेशात पिप्रि (जि. सोनभद्र) येथे सोन नदीच्या रिहांद या उपनदीवर बांधण्यात आला आहे. रीहांद प्रकल्पातील जलाशयास गोविंद वल्लभ पंत सागर असे म्हणतात. क्षेत्रफळाने देशातील हा सर्वात मोठा कृत्रिम जलाशय आहे. याची क्षमता 300MW इतकी आहे.
चंबळ प्रकल्प
चंबळ प्रकल्प राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. हा प्रकल्प चंबळ नदीवर बांधण्यात आलेला आहे. याचा मुख्य उद्देश विद्युत निर्मिती असा आहे. चंबळ प्रकल्पात तीन धरणे बांधण्यात आलेली आहेत.
मध्य प्रदेश येथे चौरासीगड येथे धरण बांधले आहे. जलाशयाचे नाव गांधीसागर असे आहे.
राजस्थान मध्ये चुलीया येथे धरण बांधले आहे. जलाशयाचे नाव राणा प्रताप सागर व कोटा येथील धरणातील जलाशयाचे नाव जवाहर सागर असे आहे.
जायकवाडी प्रकल्प
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे गोदावरी नदीवरील हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील जलाशयाचे नाव नाथसागर असे आहे.
हे धरण प्रथम बीड जिल्ह्यातील जायकवाडी (जायकुची वाडी) येथे प्रस्तावित होते मात्र नंतर ते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण बांधले तरी मूळ जायकवाडी नाव कायम राहिले.
वीज निर्मिती व वीजनिर्मितीनंतर बाहेर आणलेले पाणी पुन्हा उपसा करून धरणात सोडणे अशी दुहेरी योजना असलेला जायकवाडी हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे.
धरण परिसरात म्हैसूर (कर्नाटक) येथील वृंदावन गार्डनच्या धरतीवर पैठण येथे “संत ज्ञानेश्वर उद्यान” विकसित केले आहे.
जायकवाडी प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी सिंदफना नदीवर माजलगाव येथे धरण बांधले आहे.
सरदार सरोवर प्रकल्प
सरदार सरोवर केवाडिया (जि. नर्मदा) गुजरात राज्य येथे नर्मदा नदीवरील विवादास्पद हा प्रकल्प आहे. सरदार सरोवर आणि नर्मदा सागर ही दोन मोठी धरणे यामध्ये आहेत.
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र या राज्याचा सरदार सरोवर हा प्रकल्प आहे.
कोसी प्रकल्प
किसी प्रकल्प भारतातील विभाजन पूर्व बिहार राज्य व नेपाळ यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्प अंतर्गत नेपाळमधील छतीया व हनुमाननगर येथे कोसी नदीवर दोन धरणे बांधण्यात आली आहेत.
पेरियार प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत केरळमधील पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून त्यातील पाणी पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई नदीत सोडण्यात आले आहे. तामिळनाडू मधील मदुराई व केरळ मधील यांना एर्नाकुलम या जिल्ह्यांना याचा फायदा झाला आहे.
इंदिरा सागर धरण
इंदिरासागर धरण नर्मदा नदीवर मध्य प्रदेशचा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. इंदिरासागर हा देशातील सर्वात मोठा जलाशय आहे.
इंदिरासागर धरण पुनासा (जि. खांडवा) मध्य प्रदेश राज्य येथे आहे.
रामगंगा प्रकल्प
उत्तराखंड राज्यामधील गढवाल येथे रामगंगा या गंगेच्या उपनदीवर व जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातील धरण आहे.
दिल्ली शहरास पेयजलाचा पुरवठा या धरणातून होतो.
तिहरी प्रकल्प
तिहरी प्रकल्प उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवरील हे धरण आहे. जगातील हे 12 वे उंच धरण आहे. भारतातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे हे धरण आहे. या प्रकल्पात रशियन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
इंदिरा गांधी कालवा (राजस्थान कालवा योजना)
राजस्थान व पंजाबची ही योजना आहे. यांतर्गत पंजाब मध्ये सतलज व बियास संगमाजवळ हरीके येथे धरण बांधण्यात आले. या कालव्यामुळे वायव्य राजस्थानच्या वाळवंटी भागाचे हरित शेतीत रुपांतर झाले.
कोलडाम धरण
कोलडाम धरण हे सतलज नदीवरील हिमाचल प्रदेशातील विलासपुर व मंडी जिल्ह्यातील हा जलविद्युत प्रकल्प आहे.
सायलेंट व्हॅली प्रकल्प
सायलेंट व्हॅली प्रकल्प हा केरळमधील कुंतीपूझा नदीवर आहे. हा प्रकल्प पर्यावरण दृष्ट्या विवादास्पद आहे.
कुकडी प्रकल्प
कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.
या अंतर्गत पुणे जिल्ह्यात कुकडी व तिच्या उपनद्या वर 5 धरणे बांधण्यात आली आहेत.
- कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात माणिक डोह धरण (शहाजीसागर जलाशय)
- कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात येडगाव धरण
- आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय)
- जुन्नर तालुक्यात मीना नदीवर वडज धरण
- आर नदीवर पिंपळगाव जोगा धरण
किशनगंगा प्रकल्प
किशनगंगा प्रकल्प हा काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात किशनगंगा (नीलम) नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे.
सौनी योजना
सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन योजना.
सौनी योजनेचा उद्देश-
सरदार सरोवरातून वाहून जाणाऱ्या जादाच्या पाण्याने नर्मदा खोऱ्यातील 115 कोरडी धरणे भरणे.
सलाल जलविद्युत प्रकल्प
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्हयात चिनाब नदीवरील हे धरण आहे.
खोलोंगछु जलविद्युत प्रकल्प
भारत व भूतान यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. भूतान मधील त्रिशियागत्से जिल्ह्यात खोलोंगछु नदीवर हा प्रकल्प आहे.
कामेंग जलऊर्जा प्रकल्प
हा प्रकल्प अरुणाचल राज्यात आहे. याचा उद्देश धरण सुरक्षितता तसेच धरणांच्या अनुषंगाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विवाद सोडवण्याचा आहे.
घटप्रभा प्रकल्प
कर्नाटक राज्यात बेळगाव व विजापूर जिल्ह्यात घटप्रभा नदीवर हा प्रकल्प आहे.
पेंच प्रकल्प
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याचा हा संयुक्त प्रकल्प आहे.
पेंच नदीवरील हा प्रकल्प छिंदवाडा – नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे.