Natural Division Of India : भारताचे प्राकृतिक विभाग

Natural Division Of India

भौगोलिक निर्मिती नुसार भारताचे ५ प्राकृतिक विभाग आहेत.

  1. उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा
  2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
  3. भारतीय पठारी प्रदेश (द्वीपकल्पीय पठारी प्रदेश)
  4. किनारपट्टीचा प्रदेश
  5. भारतीय बेटे

१.उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा

या पर्वतरांगा भारताच्या उत्तरेला असून त्यांची लांबी 2400 कि.मी. असून रुंदी 150 ते 400 कि.मी. आहे.

भारताच्या उत्तर सीमेवर जगातील सर्वोच्च हिमालय पर्वतरांगा विस्तारलेल्या आहेत.

भारतातील हिमालयाचा विस्तार जम्मू कश्मीर पासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे.

हिमालय हा अर्वाचीत घडीचा “वली” पर्वत आहे.

हिमालय हा जगातील सर्वात उंच भूस्वरूपी उठावाचा प्रदेश आहे.

पाकिस्तानच्या पूर्व सीमेपासून ते म्यानमारच्या पश्चिम सीमेपर्यंत पर्यंत हिमालयाच पर्वतरांगा विस्तारल्या आहे.

हिमालयाची निर्मिती-

हिमालय पर्वतरांगाचा पूर्ण प्रदेश ६० कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्राचा तळ होता. ७ कोटी वर्षांपूर्वी हा तळ वर उचलला जाऊन हिमालय पर्वताच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली.

भूपृष्ठीय क्षितिज समांतर हालचालीमुळे दाब पडून तो गाळ उंचावला यातूनच हिमालय अर्वाचीत वली पर्वताची निर्मिती झाली. हिमालयामुळे भारतीय उपखंड व तिबेटचे पठार विभागले गेले आहेत.

हिमालयीन पर्वतरांगा-

साधारणपणे दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे भारताकडून तिबेटकडे हिमालयाच्या पूर्व पश्चिम चार रांगा परस्परांना समांतर अशा आढळतात.

१)शिवालिक टेकड्या

२)लघु हिमालय (लेसर हिमालयाज,  हिमाचल रांग)

३)बृहद हिमालय (ग्रेटर हिमालयाज, हिमाद्री)

४)हिमालया पलीकडील पर्वतरांगा

पुढे हे हि वाचा MPSC Pre exam 2024 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी https://mpsc.pro/mpsc-pre-exam-2024/सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४

शिवालिक टेकड्या-

पाकिस्तानातील पोतवार पठारापासून ते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांना शिवालिक टेकड्या असे म्हणतात.

यांची उंची 1000 ते 1500 मीटर असून त्या १५ ते 20 किलोमीटर रुंद आहेत.

शिवालिक टेकड्या हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील रांग आहे. या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या दर्याना “डूर” म्हणतात.

उदाहरण- डेहराडून, कोटलीडून, पाटलीडून इ. 

शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी नद्यांनी साठवलेल्या गाळांचे “जलोढ पंखे” आढळतात.

लघु हिमालय (लेसर हिमालयाज)-

शिवालिक टेकड्यांच्या उत्तरेस लघु हिमालयीन रांगा पसरलेल्या आहेत. या शिवालिक टेकड्यापेक्षा प्राचीन रांगा आहेत, यांची सरासरी उंची 3000 मीटर असून रुंदी सुमारे 60 ते 80 किलोमीटर आहे.

बृहद हिमालय (ग्रेटर हिमालयाज)-

हिमालयाच्या अतिउत्तरेकडील सर्वोच्च पर्वतरांगेला बृहद हिमालय असे म्हणतात. या रांगांची सरासरी उंची 6000 मीटर पर्यंत आहे तर रुंदी 120 ते 200 किलोमीटर आहे.

हिमालय प्रदेशात उंच हिमाच्छादित शिखरे, तीव्र उताराच्या टेकड्या, डोंगररांगा, खोल दऱ्या व त्यातून वाहणाऱ्या नद्या ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

हिमाद्री हे अनेक हिमनद्यांचे उगमस्थान आहे.

हिमालय पर्वत प्रदेशाची अधिक माहिती त्यांचे पूर्व पश्चिम भाग केल्यास स्पष्ट होते. त्यात काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय व पूर्व हिमालय असे विभाग आहेत.

काश्मीर हिमालय(ट्रान्स हिमालयाज)-

पुढे हे हि वाचा:-राजश्री शाहू महाराज

काश्मीर हिमालयात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे शिवालिक टेकड्या, पिरपंजाल, झांस्कर, लडाख व काराकोरम या पर्वतरांगा एकमेकांना समांतर पसरले आहेत.

तुर्की भाषेत काराकोरम म्हणजे “काळा पर्वत”.

काराकोरम रांगेत के-२ किंवा “गॉडविन ऑस्टिन” हे भारतातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे.

पंजाब हिमालय

पंजाब हिमालय सतलज नदीच्या वायवव्येस पसरलेल्या आहेत.

कुमाऊँ हिमालय

उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ भागात असलेल्या हिमालयास कुमाऊँ हिमालय असे म्हणतात.

हिमालयात गंगा, यमुना या प्रमुख नद्या उगम पावतात. नंदादेवी (7817 मी.) हे कुमाऊँ हिमालयातील सर्वात अधिक उंचीचे शिखर आहे. हिमालयाच्या पूर्वेस नेपाळ हिमालय आहे.

कुमाऊ हिमालयातील सर्वोच्च शिखरे नंदादेवी (7817 मी.), कामेत (7756 मी.), त्रिशूल (7140 मी.), बद्रीनाथ (7138 मी.), केदारनाथ (6968 मी.) गंगोत्री (6510 मी.).

नेपाळ हिमालय (मध्य हिमालय)

नेपाळ हिमालय काली ते तिस्ता नद्या दरम्यान आहे(कुमाऊँच्या उत्तरेस). नेपाळ हिमालयातील सर्वोच्च शिखरे माउंट एवरेस्ट (8884 मी.) कांचनगंगा (८५९८ मी.) ल्होत्से (8501 मी.) मकालू (8481 मी.) धवलगिरी (8172 मी.) चो ओयु (8153 मी.) अन्नपूर्णा (8078 मी.).

पूर्व किंवा आसाम हिमालय

पूर्व हिमालय तीस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी दरम्यान पसरला आहे.

म्यानमार सीमेजवळ पूर्व हिमालयाची दक्षिणेकडील रांग अनेक टेकड्यांच्या स्वरूपात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर व मिझोराम या पूर्वेकडील राज्यात उत्तर दक्षिण पसरलेली आहे तिला “पूर्वाचल” असे म्हणतात.

या टेकड्यात सर्वात उत्तरेकडे अरुणाचल मध्ये पत्कोई टेकड्या तर अति दक्षिणेकडे मिझोराम मध्ये लुशाई टेकड्या या दोन मध्ये नागा व मणिपूर टेकड्या आहेत.

अरुणाचल प्रदेश राज्य व भूतान हा देश पूर्व हिमायात आहेत. पूर्व हिमालयातील शिखरे नामचा बरवा (7756 मी.) कुलाकांग्री (७५३८ मी.) चोमोल्हारीरी (७३२७ मी.)

ग्यालू पेरी (7294 मी.) व नामचा बरवा यांना “sister peaks” म्हणतात.

हिमालया पडी पलीकडील पर्वतरांगा-

या सर्वात प्राचीन हिमालय रांगा आहेत. काराकोरम, लडाख व कैलास पर्वतरांगा प्रदेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात असल्यामुळे त्याचे अतिउंचावरील “शीत वाळवंट” असे वर्णन केले आहे.

कैलास रांगा भारताबाहेर तिबेटच्या क्षेत्रात असून यातील कैलास शिखर व मानसरोवर ही प्रमुख यात्रा स्थळे आहेत.

उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश तथा हिमालयीन पर्वत प्रदेश हा जगातील सहा जागृत भूकंपप्रवण क्षेत्रापैकी एक आहे.

२.उत्तर भारतीय मैदानी प्रदेश:

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांनी देशाचा सुमारे 33% भूभाग व्यापला असून देशातील सुमारे 40 टक्के लोकसंख्या येथे सामावली आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा विस्तार पश्चिमेकडे राजस्थान पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे क्षेत्रफळ 677,638 चौ.की.मी. आहे.

गंगेचे मैदान (उत्तर भारतीय मैदानी प्रदेश)हे भारतीय संस्कृतीचे माहेरघर आहे.

भूशास्त्रीय निर्मितीनुसार सर्वात शेवटी निर्माण झालेला प्रदेश आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे प्रथम भारतीय पठारी प्रदेश त्यानंतर हिमालयीन पर्वतरांगा नंतर निर्माण झालेले आहे. भारतीय पठार व हिमालय पर्वतरांगा यामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.

हिमालय पर्वत रांगा निर्मितीच्या काळात त्यांच्या दक्षिणेस निर्माण झालेल्या भू-द्रोणीत हिमालय रांगा व भारतीय पठारावरून वाहत येणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन केले त्यातूनच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली.

उत्तर भारतीय मैदानात सुमारे 500 ते 4000 मीटर खोलीपर्यंत गळाचे संचयन झाले आहे. एक समान मैदान म्हणून उत्तर भारतीय मैदान प्रसिद्ध आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना अनुक्रमे भाभर,तराईचा प्रदेश, भांगर व त्यानंतर खादराचा प्रदेश लागतो.

भाभर प्रदेश – नद्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी दगड, गोटे, खडे व वाळूचे संचयन होऊन मैदान तयार झाले त्यास “भाभर“ असे म्हणतात.

राईचे मैदान – भाभरच्या दक्षिणेस बारीक बाळाच्या निक्षेपणामुळे तयार झालेल्या प्रदेशाला तराईचा प्रदेश असे म्हणतात.

तराईचा प्रदेश हा उत्तर प्रदेश व बिहार राज्यात विस्तारला आहे.

भांगर – तराईच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील जुन्या गाळाच्या  मैदानास भंगार असे म्हणतात. उत्तर भारतीय मैदानाचा हा सर्वात मोठा भाग आहे. बांगर मधील गाळाच्या कणांना “कांकर” म्हणतात.

खादर – नवीन गाळाच्या प्रदेशाला खादर असे म्हणतात. हे भांगरच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील नवीन गाळाचे मैदान आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 भाग पडतात. राजस्थान मैदान, पश्चिम मैदान व गंगेचे मैदान.

राजस्थान मैदान-

भारतीय महावाळवंट भारताचा वायव्य भाग यामध्ये मोडतो. 1949 पूर्वी राजस्थान हे राज्य “राजपुताना” या नावाने ओळखले जात होते.

सिंधू संस्कृतीतील विविध पुरावे येथे उत्खननात सापडले आहेत. येथील वाळू “फेल्ड्स्पार” खनिजापासून बनली असून चुनखडक, जिप्सम व मीठ ही खनिजे येथे सापडतात.

राजस्थानातील भारतीय महावाळवंट हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे वाळवंट असून त्याला थर वाळवंट किंवा मरूस्थळ असे म्हणतात. याचा विस्तार कच्छच्या रना पासून पंजाबच्या पर्यंत असून पश्चिम राजस्थान मधील 8 जिल्ह्यांमध्ये तो पसरला आहे.

देशातील पश्चिमेकडील स्थानामुळे व वाऱ्यांना अडवणाऱ्या पर्वतरांगाच्या अभावामुळे या भागात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. पूर्वी या ठिकाणी विरळ वस्तीची आवरण असावे मानवाने वस्ती केल्यानंतर येथील प्रदेशात शेती व गुरेचराईमुळे वनस्पतीचे आवरण कमी होत गेले व वाऱ्याच्या प्रभावी कार्यामुळे हा प्रदेश वाळवंट बनलेला असावा.

गंगा, यमुना नदीच्या निक्षेपणामुळे उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यात समतोल व सुपीकाळाचे मैदान तयार झाले आहे.

पश्चिम मैदान-

यामध्ये हरियाणा व पंजाब राज्यातील मैदानी प्रदेशांचा समावेश होतो. रावी, बियास, सतलज या नद्यांमुळे हा भाग सुपीक बनला आहे, मात्र पावसाळ्यात शिवालिक रंगातून चोस हे हंगामी नदी प्रवाह या मैदानावर पूर्व पूरस्थितीत निर्माण करतात.

पंजाब-हरियाणाचा मैदानी प्रदेश हा भारताच्या धान्याचे कोठार आहे. पंजाब- हरियाणा मैदानी प्रदेश एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी गहू या पिकाखाली 38% तर तांदळाखाली 14 टक्के क्षेत्र आहे.

देशात दर हेक्टरी कापूस उत्पादनात पंजाब हे राज्य प्रथम आहे.

पंजाब-हरियाणा मैदानी प्रदेशात अंबाला व महेंद्रगड येथे चुनखडकाचे साठे सर्वाधिक आहेत.

गंगेचे मैदान-

गंगेच्या मैदानात बिहार व पश्चिम बंगालमधील गंगेचा त्रिभुज प्रदेश व आसाम मधील ब्रह्मपुत्राचे मैदान यांचा समावेश होतो.

गंगेच्या मैदानाचे पुन्हा १)मध्य मैदान २)पूर्व मैदान व ३)त्रिभुज प्रदेश असे तीन भाग पडतात.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तथा गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारताच्या एकूण क्षेत्रापैकी 9 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

गंगेच्या मैदानात संत वाहणाऱ्या नद्यांमुळे नालाकृती सरोवरे तयार झाली आहेत. अनेक नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनलेले गंगेचे मैदान हे जगातील सर्वात विस्तृत व सलग काळाचे क्षेत्र आहे.

गंगेचा त्रिभुज प्रदेश हा “सुंदरबन” किंवा “गंगा ब्रह्मपुत्रेचा” त्रिभुज प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे.

सुंदरी पक्षांची संख्या अधिक असल्याने हा त्रिभुज प्रदेश “सुंदरबन” या नावाने ओळखला जातो.

गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश असून तो बहुतांशी बांगलादेश आणि भारतातील पश्चिम बंगाल राज्यात पसरला आहे.

हुगळी नदीपासून मेघना नदीपर्यंत पसरलेल्या गंगा त्रिभुज प्रदेशाची बंगालच्या उपसागरातील लांबी 350 किलोमीटर इतकी आहे.

त्रिकोणी आकाराच्या गंगेच्या त्रिभुज प्रदेशास पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश म्हणतात.

गंगेचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात सुपीक प्रदेश असल्याने त्यास “हरित त्रिभुज प्रदेश” असेही म्हणतात.

असंख्य वितरिका, पानथळी, सरोवरे व जलोटा पूर मैदानी ही गंगा त्रिभुज प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत.

सुंदरबन – बंगालच्या उपसागराजवळ स्वच्छ पाणथळ भागातील जगातील सर्वात मोठे कच्छ वृक्ष (खारफुटी) क्षेत्र आहे. सुंदरबनातील सुमारे २०४०० चौरस किलोमीटर क्षेत्र कच्छ वृक्षांनी व्यापलेले आहे. सुंदरी, बांबू, गर्जन हे सुंदरबनातील अन्य वृक्ष आहेत.

आसाम खोरे (आसामचा मैदानी प्रदेश)- पूर्व हिमालयात भारताच्या ईशान्येकडील हा प्राकृतिक विभाग ब्रह्मपुत्राचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. या विभागात संपूर्ण आसाम राज्याचा समावेश होतो. ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यांमुळे बनलेल्या जलोढ निक्षेपामुळे आसाम खोऱ्याची निर्मिती झाली. आसाम खोऱ्यात खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, चुनखडक व फ्रेंड्स पार्क यांची विपुलता आहे. आसाम खोरे हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.

३.भारतीय पठारी प्रदेश (द्वीपकल्पीय प्रदेश)

भूशास्त्रीय जडण घडणेनुसार द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा भारताचा सर्वप्रथम निर्माण झालेला म्हणजेच सर्वात प्राचीन भूभाग असून भूवैज्ञानिक घडामोडीचे केंद्रस्थान आहे.

द्वीपकल्प (peninsula) हा शब्द pene (जवळजवळ) व insula (द्वीप) या दोन लॅटिन शब्दांपासून बनला असून जवळजवळ “द्वीपसारखी असणारी भूमी” असा त्याचा अर्थ होतो.

द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाने भारताचा एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 38 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

भारतीय पठाराच्या वायव्येस अरवली पर्वत ईशान्येस राजमहल टेकड्या व दक्षिणेस निलगिरी पर्वतरांगा आहेत. पूर्वेस पूर्व घाट व पश्चिमेस पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांगा आहेत.

भारतीय पठाराने भारताचा सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे भारतीय पठाराची सरासरी उंची 300 ते 2000 मीटर आहे.

भारतीय पठार अग्निज व रूपांतरित खडकाचे बनलेले असून ते त्रिकोणी आकाराचे आहे.

भारतीय पठाराचे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.

उत्तर भारतीय पठार-

नदी खोरे डोंगररांगा यामुळे विभागल्या गेलेल्या या पठाराच्या विभागांना पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड, छोटा नागपूर अशी नावे आहेत.

उत्तर भारतीय पठाराचा विस्तार पश्चिमेस अरवली पर्वतापासून पूर्वेस कैमुर व राजमहल टेकड्यांपर्यंत आहे. यामध्ये अरवली पर्वत, विंध्य पर्वत, मायकल रांगा व उतारावरील पठारे यांचा समावेश होतो.

कैमुर टेकड्या या विंध्य पर्वतरांगाच्या उपरांगा आहेत. या रंगातून उगम पावणाऱ्या चंबल, बेटवा या नद्या यमुनेस तर शोण नदी गंगेस मिळते. जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ठ पर्वत म्हणून ओळखला जाणारा अरवली पर्वत या पठाराचे वैशिष्ट्य आहे.

अरवलीतील सर्वात उंच शिखर- गुरुशिखर (१७२२ मी.) आहे. अरवलीतील थंड हवेचे ठिकाण माउंट आबू आहे.

उत्तरेकडे पूर्व – पश्चिम पसरलेल्या विंध्यरांगा व नर्मदा-तापी नदी खोरे आहेत. विंध्य पर्वताकडून दक्षिणेकडे नर्मदा नदीचे खोरे,नंतर सातपुडा पर्वत व त्यांच्या दक्षिणेस तापी खोरे आहे.

सातपुड्यातील सर्वोच्च शिखर धुपगढ १३५० मीटर आहे.

सातपुड्यातील थंड हवेची ठिकाणे पंचमढी व तोरणमाळ ही आहे.

दक्षिण भारतीय पठार (दख्खनचे पठार)

दक्षिण भारतीय पठाराला दख्खनचे पठार असेही म्हणतात.

दख्खनच्या पठाराची सरासरी उंची 610 मीटर आहे.

नर्मदा नदीच्या दक्षिणेस उलट्या त्रिकोणी आकारात वसलेल्या दख्खनच्या पठाराचा पाया उत्तरेस व शिरोबिंदू दक्षिणेस आहे.

दख्खनच्या पठाराच्या उत्तर पायथ्याशी पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे सातपुडा, महादेव व मायकल पर्वतरांगा आहेत.

प्रादेशिक स्थानानुसार दख्खनच्या पठाराचे चार भाग पडतात.

महाराष्ट्र पठार

कर्नाटक पठार

तेलंगण पठार

ईशान्य पठार

महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठार हे बेसाल्ट या अग्निष खडकापासून बनलेले असून क्षितिज समांतर खडकांच्या थरामुळे या पठाराची पायऱ्या सारखी रचना झाली आहे त्यामुळे त्यास “डेक्कन ट्रॅप” असे म्हणतात.

  • महाराष्ट्र पठाराचा विस्तार पश्चिमेस अरबी समुद्र व त्या समांतर उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्री रांगा पर्यंत पसरलेला आहे.

सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कळसुबाई 1646 मीटर आहे.

सह्याद्रीपासून पूर्वेस सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव या डोंगररांगा पसरला असून त्यांच्या दरम्यान गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी आहेत. महाराष्ट्र पठाराच्या पूर्व भागात वर्धा-वैनगंगा खोरे आहे.

कर्नाटक पठार (मैदान) –

दक्षिणेकडील कर्नाटक-तेलंगणा पठाराने दख्खन पठाराचा सर्वाधिक भाग व्यापला आहे. कर्नाटक पठारास मैदान म्हणून ओळखले जाते याची सरासरी उंची 400 मीटर आहे.

कर्नाटक पठाराचा विस्तार पश्चिमेस पश्चिम पठार, पूर्वस पूर्व घाट, दक्षिणेस निलगिरी पर्वत व उत्तरेस महाराष्ट्र पठारा दरम्यान आहे. हे पठार अति प्राचीन असून अग्नीज्य व रूपांतरित खडकांचे बनलेले आहे.

कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी या कर्नाटक पठारावरून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.

तेलंगण पठार

तेलंगणा राज्यात या पठाराच्या दक्षिण भागात ग्रॅनाईट या अच्छीद्र खडकामुळे व भूपृष्ठाच्या उंचसखलपणामुळे मोठ्या प्रमाणावर तलावाची निर्मिती झाली आहे.

तेलंगणा पठार हे तेलंगणा राज्यात असून हे पठार प्राचीन अग्नीचे खडकांनी बनले आहे.

या पठाराच्या उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे तर दक्षिणेकडील प्रदेश ग्रॅनाइट अशा अच्छीद्र खडकामुळे बनलेला आहे.

ईशान्य पठार-

यामध्ये बाघेलखंड, छोटा नागपूर पठार व गर्ह्जात टेकड्या यांचा समावेश होतो. छोटा नागपूर पठार हा खनिज संपन्न प्रदेश आहे. मलयगिरी शिखर याच भागात आहे. दामोदर, सुवर्णरेखा, महानदी व इंद्रावती या नद्यांचा उगम येथे होतो.

पश्चिम घाट(सह्याद्री)      

पश्चिम घाट हे दक्षिण भारतीय पठाराची पश्चिम सीमा आहे.

पश्चिम घाट हा पूर्व घाट अपेक्षा उंच आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची 900 ते 1600 मीटर आहे. पश्चिम घाटाची दक्षिण उत्तर लांबी 1600 किलोमीटर आहे.

पश्चिम घाट भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रालगत दक्षिण उत्तर दिशेला पसरलेला आहे तर उत्तरेस तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस केरळ राज्यापर्यंत पश्चिम घाटाचा विस्तार आहे. पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पातील नद्यांचा जलविभाजक आहे.

पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पातील नद्यांचा विभाजक आहे.

गोवा व कर्नाटक राज्यातील सह्याद्री रांगांस मध्य सह्याद्री असे म्हणतात. या भागात केमेनगुंडी व कुद्रेमुख ही शिखरे आहेत.

महाराष्ट्रात महाबळेश्वर, गुजरातमध्ये सापुतारा, तामिळनाडूमध्ये कोडाईकॅनल व केरळ मधील मुन्नार ही थंड हवेची पप्रसिद्ध ठिकाणे आहेत.

पूर्व घाट:

ईशान्येस छोटा नागपूर पठार व दक्षिणेस निलगिरी पर्वतापर्यंत पूर्व घाटाचा विस्तार आहे.

पूर्व घाटाची सरासरी उंची 615 मीटर आहे. पूर्व घाटाची लांबी 1300 किलोमीटर आहे.

उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील पर्वताचा क्रम 1)निमगिरी 2)नल्लामल्ला 3)पालकोंडा 4)अन्नाईमुडी

पूर्व घाटाचे समुद्राला मिळणाऱ्या नद्यामुळे क्षरण झाल्याने ही रांग तुटक बनली आहे. कमी उंचीच्या तुटक विलग टेकड्या हे पूर्व घाटाचे वैशिष्ट्य आहे.

पूर्व घाटात महेंद्रगिरी, अन्नाकोंडा व सिक्रांमगटा ही शिखरे आहेत.

महानदी व गोदावरी या नद्या दरम्यान महेंद्रगिरी पर्वतरांग आहे.

पूर्व घाट हा पश्चिम घाटाप्रमाणे भिंतीकडा नसून स्वतंत्र पर्वत प्रणाली आहे.

पश्चिम घाट व पूर्व घाट हे दक्षिणेकडे बिलीगिरी डोंगररांगात एकत्र आले आहेत.

बिलिगिरी रांगात बिलीगिरी, निलगिरी व आग्नेय घाटाचा समावेश होतो.

पूर्व घाटात मलईगिरी ११७५ मीटर उंच शिखर आहे.

पूर्व घाटात दक्षिण तामिळनाडूमध्ये सिरूमलाई व कारंथामलाई हे कमी उंचीचे डोंगर आहेत.

कृष्णा, पेंनेरू नद्या दरम्यान नल्लामाल्ला डोंगररांगा आहे.

पूर्व घाटाच्या आग्नेयेस  शिवराय टेकड्या व जावडी टेकड्या आहेत.

4.किनारपट्टीचा प्रदेश:

भारतात 9 राज्यांना मिळून 6100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पश्चिम किनाऱ्यावर गुजरात (सर्वात लांब किनारा) महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांचा समावेश होतो. तर पूर्व किनाऱ्यावर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल यांच्या राज्यांचा समावेश होतो.

भारतात चार केंद्रशासित प्रदेशांना किनारा लाभला आहे. लक्षद्वीप, अंदमान व निकोबार, दादरा-नगर हवेली आणि दिव-दमन, पुदुचेरी.

भारतीय पठारी प्रदेशाच्या पूर्वेस व पठारी प्रदेशाच्या पश्चिमेस अरुंद किनारी मैदान तयार झाली आहेत.

किनारी मैदानी प्रदेशाचे दोन प्रकार पडतात पश्चिम किनारी मैदान व पूर्व किनारी मैदान

पश्चिम किनारी मैदानी प्रदेश

पश्चिम किनारी मैदानाचा विस्तार कच्छच्या रणापासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेला असून तो भाग अरुंद आहे.

पूर्व किनाऱ्याच्या तुलनेत पश्चिम किनारा काहीसा दंतुर व सागरी भाग खोल आहे. पश्चिमेस तीव्र कडा असलेल्या पश्चिम घाट किनाऱ्याला जवळपास समांतर आहे. पश्चिम घाटातून कमी लांबीच्या अति वेगाने वाहणाऱ्या अनेक नद्या मैदानाला ठिकठिकाणी खंडित करून जातात.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांचा प्रदेश अरबी समुद्राला सलग असून हाच प्रदेश पश्चिम किनारी मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.

पश्चिम किनारपट्टी चे तीन भाग आहेत गुजरात किनारा, कोकण किनारा, व मलबार किनारा.

गुजरात किनाऱ्यावर कच्छचे आखात व खंबा त्याचे आखात या दोन मोठ्या आखातांचा समावेश होतो.

पश्चिम किनारी मैदानास महाराष्ट्रात कोकण, कर्नाटकात कानडा आणि केरळमध्ये मलबार असे म्हणतात.

मलबारच्या भागात खाजण सरोवर आहेत. त्यांना स्थानिक भाषेत कायल म्हणतात.

खाजणांची निर्मिती व कायल मलबार किनाऱ्याची वैशिष्ट्ये आहेत. केरळमधील बेंबनाड हे सर्वात मोठे कायल आहे.

पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरे कांडला (गुजरात), ओखा (गुजरात) भावनगर (गुजरात), न्हावाशेवा (महाराष्ट्र) ,मुंबई (महाराष्ट्र), मुरगाव (गोवा), मंगळूर (कर्नाटक), कालिकत (कोझिकोडे, केरळ), कोची (केरळ)

पूर्व किनारी मैदान

पूर्व किनारी मैदानी प्रदेश उत्तरेला सुवर्णरेखा नदीखोऱ्यापासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरला आहे.

पूर्व किनारी प्रदेशात ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल  व तामिळनाडू या राज्याच्या किनारी प्रदेशाचा समावेश होतो.

पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानी प्रदेशापेक्षा अधिक रुंद व विस्तारित आहे तसेच तो अधिक समतोल आहे.

पूर्व किनारी मैदानात महानदी, गोदावरी, कृष्णा, पेनुर व कावेरी या नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे. या किनाऱ्याजवळ समुद्री भाग उथळ आहे. त्यामुळे त्यांच्यापासून वाळूचे दांडे व पुळण तयार झाले आहे.

पूर्व किनारी प्रदेशात चिल्का (ओडिशा), कोलेरू (आंध्रप्रदेश), पुलिकत (आंध्र प्रदेश) ही प्रसिद्ध सरोवरे आहेत.

तामिळनाडूच्या किनाऱ्याला कोरोमंडल असे म्हणतात.

कन्याकुमारी आणि रामेश्वरम द्वीपाच्या मधला किनारा हा मानारच्या आखाताला लागून आहे. मानारचे आखात मोत्याच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे.

तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात कावेरीचा त्रिभुज प्रदेश आहे.

तामिळनाडू किनाऱ्यालगत मानारच्या आखातात प्रवाळ भिंत्ती आढळतात.

पश्चिम किनाऱ्याच्या तुलनेत पूर्व किनाऱ्यावर भूखंड मंच जास्त रुंद असल्यामुळे पूर्व किनाऱ्यावर मासेमारी सर्वाधिक चालते.

गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांचे त्रिभुज प्रदेश हे पूर्व किनारी मैदानाचे वैशिष्ट्ये आहे.

पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरे तुतीकोरीन (तामिळनाडू), चेन्नई (तामिळनाडू), काकीनाडा (आंध्र प्रदेश), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), पॅराद्वीप (ओडिशा), हल्दीया (पश्चिम बंगाल), कोलकाता (पश्चिम बंगाल).

5.भारतीय बेटे:

भारताच्या मुख्य भूमीपासून बेटे वेगळी झालेली असली तरी ती भारताच्या प्राकृतिक रचनेचा भाग असून चारी बाजूंनी वेढलेल्या पाण्यामुळे बेटांना एक वेगळ्या प्रकारचे प्राकृतिक स्वरूप मिळाले आहे, त्यामुळे या बेटांचा वेगळा विभाग तयार होतो.

समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांचे दोन प्रकार पडतात.

  1. अरबी समुद्रातील बेटे
  2. बंगालच्या उपसागरातील बेटे

अरबी समुद्रातील बेटे

अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखराभोवती प्रवाळांच्या संचयनामुळे बेटांची निर्मिती झाली आहे म्हणून त्यांना प्रवाळ बेटे असे म्हणतात.

लक्षद्वीप, मिनीकॉय व अमिनीदेवी ही बेटे प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत.

लक्षद्वीप बेटे-

लक्षद्वीप बेटांचा गट अरबी समुद्रातील बेटांचा मुख्य भाग आहे. लक्षद्वीप बेट समूहात मिनीकॉय, कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो.

लक्षद्वीप याचा शब्दशः अर्थ एक लाख बेटे असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील या द्वीप समूहात केवळ 36 बेटांचा व शैलभित्तीचा समूह आढळतो.

उत्तरेला लक्षद्वीप बेट, दक्षिणेला मिनीकॉय बेट, मध्यभागात कवारती बेट अशा तीन बेटांचा समूह आहे.

मिनीकाय हे सर्वात मोठे बेट असून याचे क्षेत्रफळ 453 चौकीमी आहे. उत्तरेला अमिनी द्वीप तर दक्षिणेला कानानोर द्वीप समूह आहे.

लक्षद्वीप ची राजधानी कवारती आहे.

लक्ष्मी बेटांचे क्षेत्रफळ 32 चौकीमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.

लक्षद्वीप मधील एकमेव विमानतळ “अगाती विमानतळ” हा मुख्य भूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे.

लक्षद्वीप परिसरात स्कुबा ड्रायव्हिंग, विंडसर्फिंग, वॉटरस्किंग इत्यादी जलक्रीडांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षणस्थान बनला आहे.

कॅनेनोर व अमिनिदिवी  ही बेटे लक्षद्वीप बेटांचे भाग आहेत.

बंगालच्या उपसागरातील बेटे-

बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार ही प्रमुख बेटे आहेत.

प्राकृतिक दृष्ट्या ही बेटे बंगालच्या उपसागरात बुडालेल्या पर्वताची शिखरे आहेत त्यांची समुद्रसपाटीपासून जास्तीत जास्त उंची 750 मीटर आहे.

अंदमान व निकोबार बेट समूह जगातील सर्वात मोठा बेट समूह आहे.

अंदमान व निकोबार बेटे-

अंदमान-निकोबार बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी निर्मित असून या समूहातील 38 बेटांवर मानव वस्ती आहे.

अंदमान-निकोबार ची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापट्टणम व कोलकत्ता या शहरांना जोडलेले आहे.

अंदमान निकोबार मध्ये लक्षद्वीप च्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोट ब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटापुरतेच मर्यादित आहे कारण या बेटसमूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे.

अंदमान बेट समूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.

कलकत्ता पासून अंदमान निकोबार बेट 1250 किलोमीटर अंतरावर आहे तर चेन्नईपासून 1185 किलोमीटर अंतरावर आहे.

कार निकोबार, लिटल निकोबार, ग्रेट निकोबार, लिटल अंदमान, पोट ब्लेअर, पोर्ट अंदमान, नार्कोडम बेट, रिसर्च द्वीप समूह इत्यादी प्रमुख बेटे आहेत.

पोर्ट ब्लेअर हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. वि. दा. सावरकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेस 2018 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अंदमान मधील तीन बेटांचे नामकरण केले आहे. रॉस आयलँड-नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप ,निल बेटे-शहीद द्वीप बेटे, हँवलाँक-स्वराज द्विप.

23 जानेवारी 2023 मध्ये अंदमान निकोबार समूहातील 21 सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्र विजेत्यांचे नाव दिले आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त नामकरण केले आहे.

लेदरबॅक समुद्री कासव हे जगातील सर्वात मोठे कासव ग्रेट निकोबार येथे सापडते.

भारतातील अन्य बेटे-

भारतात समुद्रातील सुमारे 1382 बेटे आहेत.

बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर “अवसादी बेटे” आहेत.

कोकण व मलबार किनाऱ्यालगत छोटी बेटे आढळतात. कच्छच्या आखातात झालरी सदृश्य प्रवाळांच्या शैल भितींच्या स्वरूपातील बेटे आहेत.

पूर्व किनाऱ्यावर गंगा नदीच्या मुखाशी “न्यूमूर बेट” आहे तसेच चिल्का सरोवरात निक्षेपण बेटे आढळतात.

पश्चिम किनाऱ्यावर नर्मदा नदीच्या मुखाशी “आलिया बेट” निक्षेपणामुळे तयार झाले आहे.

गुजरातच्या किनाऱ्यावर “दिव बेट” आहे. कच्छच्या रणात लहान मोठी बेटे असून त्यातील बेला, खादीर व पछम ही मोठी बेटे आहेत. पश्चिम किनाऱ्यावर “मुंबई” आणि पूर्व किनाऱ्यावर “श्रीहरीकोटा” ही बेटे सध्या मुख्य भूमीचा भाग बनली आहेत.

ब्रह्मपुत्रा नदी पात्रात जगातील सर्वात मोठे “माजुली” नावाचे नदीय भेट आहे.

Leave a comment