kokanatil nadya:कोकणातील नद्या
कोकणाचा प्रदेश हा अरुंद आहे. कोकण किनारपट्टीच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, तर पूर्व बाजूला पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे.kokanatil nadya
कोकणचा प्रदेश अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये आहे.
सह्याद्री पर्वताचा उतार हा कोकणात किनारपट्टीच्या बाजूला अतिशय तीव्र उतार आहे.
म्हणजेच कोकण किनारपट्टीच्या बाजूला असलेली सह्याद्री पर्वतरांग ही भिंती सारखी उभी आहे.
त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगे कडून अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या नद्या या जलद गतीने वाहतात व खोल नसतात अतिशय उथळ असतात.
कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व मुंबई उपनगर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
कोकणातील सर्व नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात व अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यातील लांबी कमी असल्यामुळे कोकणातील सर्व नद्या या लांबीने कमी असतात. कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
कोकणातील नद्या kokanatil nadyaजेव्हा अरबी समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा त्या ठिकाणी खाडी तयार करतात
खाडी म्हणजे काय?
नदी वाहत जाऊन ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणाला नदीचे मुख असे म्हणतात. जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राचे पाणी नदीच्या मध्ये शिरते समुद्राचे पाणी नदीच्या आत मध्ये जिथपर्यंत शिरते त्या भागाला खाडी असे म्हणतात.
आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने कोकणातील नद्या पाहुयात व कोणती खाडी तयार करतात ते पाहूयात.
पालघर जिल्हा
दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा या पालघर जिल्ह्यातील नद्या आहेत.
कोकणातील सर्वात उत्तरेकडची नदी दमणगंगा नदी आहे. दमनगंगा नदी ही गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून वाहते.
दमणगंगा नदी ही कोकणाची उत्तरेकडील प्राकृतिक सीमा तयार करते.
दमणगंगा नदी हि महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यामध्ये वाहत जाते दिव-दमन व दादरा व नगर हवेली या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते.
वैतरणा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो.
वैतरणा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळताना दातिवरेची खाडी तयार करते.
सूर्या, पिंजाळ, तानसा या वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत.
मुंबई शहर व मुंबई उपनगर
दहिसर, ओशिवरा, पोईसर, मिठी या मुंबई शहर व मुंबई उपनगर यातील नद्या आहेत.
या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळताना खाड्या तयार करतात.
दहिसर नदी मनोरीची खाडी तयार करते.
ओशिवरा नदी मालाडची खाडी तयार करते.
पोईसर नदी मालाडच्या खाडीत जाऊन मिळते.
मिठी नदी माहीमची खाडी तयार करते.
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यात भातसा, काळू, मुरबाडी व उल्हास या नद्या आहेत.
उल्हास नदीचा उगम रायगड जिल्ह्यात राजमाची टेकड्या या ठिकाणी होतो. उल्हास नदी अरबी समुद्राला जाऊन मिळताना दोन वितरिका तयार करते व ती दोन वितरकांमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा नदी ही वसईची खाडी व
ठाण्याची खाडी तयार करते.
भातसा, काळू, मुरबाडी या उल्हास नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत.
रायगड जिल्हा
पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री या रायगड जिल्ह्यातील नद्या आहेत.
पाताळगंगा नदी ही धरमतरची खाडी तयार करते.भोगावती व आंबा या पातळगंगा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
कुंडलिका नदी रोहोची खाडी तयार करते.
काळ नदी राजापूरची खाडी तयार करते.
सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. सावित्री नदी ही रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. सावित्री नदी बाणकोटची खाडी तयार करते.
गोड, गांधार या सावित्री नदीच्या उपनद्या आहेत
रत्नागिरी जिल्हा
भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या आहेत.
भारजा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळताना केळशीची खाडी तयार करते.
जोग नदीचा उगम दापोली मध्ये होतो. जोग नदी कोणत्याही प्रकारची खाडी तयार करत नाही ती एक छोटी नदी आहे.
वशिष्ठी नदी दाभोळची खाडी तयार करते. जगबुडी नदी हि वशिष्ठी नदीची उपनदी आहे.
शास्त्री नदीचा उगम कुंभार्लीघाटात होतो. शास्त्री नदी जयगडची खाडी तयार करते. बाव नदी हि शास्त्री नदीची उपनदी आहे.
काजळी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळताना भाट्येची खाडी तयार करते.
मुचकुंदी नदी पूर्णगडची खाडी तयार करते.
काजवी नदी जैतापूरची खाडी तयार करते.
शुक नदी विजयदुर्गची खाडी तयार करते.
शुक नदी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.
सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल या नदी आहेत.
देवगड नदी देवगडची खाडी तयार करते.
आचरा नदी अरबी समुद्राला जाताना जाऊन मिळताना आचरा खाडी तयार करते.
गड नदी कलावती खाडी तयार करते.
कर्ली नदी कर्लीची खाडी तयार करते.
तेरेखोल नदी तेरेखोलची खाडी तयार करते.
Post Comment