Maharashtratil Godawari nadi : महाराष्ट्रातील गोदावरी नदी

  • गोदावरी Godawari nadi ही पूर्ववाहिनी नदी आहे.
  • गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी व लांब नदी आहे.  
  • गोदावरी नदीला वृद्धगंगा किंवा दक्षिणगंगा या नावाने देखील ओळखले जाते.
  • गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो.
  • गोदावरी नदीचा उगम झाल्यानंतर ही नदी पूर्वेकडे 1465 किलोमीटर प्रवास करते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
  • गोदावरी नदीची Godawari nadi महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे.
  • गोदावरी नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ  3,13,389 चौरस किलोमीटर आहे. तर गोदावरी नदी खोऱ्याचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 1,53,739 चौरस किलोमीटर आहे.
  • गोदावरी नदीने महाराष्ट्राचे 49.5% क्षेत्र व्यापले आहे.
  • गोदावरी ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेश या तीन राज्यातून वाहते.
  • गोदावरी नदी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून वाहते नाशिक, अहिल्यानगर, छ.संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, गडचिरोली.
  • नांदेड जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते व तेलंगाना राज्यात वाहताना ती गडचिरोली जिल्ह्यातून वाहते.
  • गोदावरी नदी ही सातमाळा अजिंठा डोंगररांगा व हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमधून वाहते.
  • तापी व गोदावरी नद्यांचे खोरे सातमाळा अजिंठा डोंगररांगेने वेगळे केले आहेत.
  • गोदावरी व भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने वेगळे केले आहे.

गोदावरीच्या डावीकडील उपनद्या –Godawari nadi

कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा(दुधना, गिरजा,खेळणा),कडाम, प्राणहिता(वर्धा, पैनगंगा, वैनगंगा), इंद्रावती, शबरी

गोदावरी नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्यांपैकी प्राणहिता हे सर्वात मोठे उपनदी खोरे आहे.

गोदावरीच्या उजवीकडील उपनद्या

दारणा, प्रवरा(मुळा,आढळा,म्हाळुंगी), सिंदफणा(बिंदुसरा), मांजरा(तावरजा, तेरणा, लेंडी, मन्याड),हरिद्रा, मनेर, किन्नेरसानी

मांजरा नदी ही उजव्या तीरावरील सर्वात लांब नदी आहे.

गोदावरी खोऱ्यातील नद्यांची उगमस्थाने

नदीउगमस्थान
गोदावरीब्रह्मगिरी,त्र्यंबकेश्वर नाशिक
दारणाकळसुबाई डोंगररांग, इगतपुरी, नाशिक
कादवावनी डोंगर, नाशिक
प्रवरारतनगड,अकोले, अहिल्यानगर
मुळारतनगड(हरिश्चंद्रगड) अहिल्यानगर
शिवनाबोलठाणगाव (अजिंठा डोंगर) छ.संभाजीनगर
खामदौलताबाद, छ.संभाजीनगर
दक्षिण पूर्णागौताळा प्रदेश (अजिंठा डोंगर)  छ.संभाजीनगर
गिरजाखुलताबाद(वेरूळ टेकड्या) छ.संभाजीनगर
बिंदुसरामांजरसुंबा (बालाघाट) बीड
सिंदफणापाटोदा(चिंचोली टेकड्या) बीड
मांजराबालाघाट डोंगर बीड

नदी काठावरील शहर

नदी काठावरील ठिकाण
गोदावरीत्रंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबे, प्रवरासंगम, पैठण, आपेगाव, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद
प्रवरानेवासा, संगमनेर, अकोले
सिंदफणामाजलगाव, शिरूर
दक्षिण पूर्णासिल्लोड
मांजरालातूर, कळंब
कादवानिफाड,दिंडोरी
बिंदुसरा  बीड
खेळणाभोकरदन
खामछ.संभाजीनगर

गोदावरी नदीवरील महत्त्वाचे प्रकल्प व धरणे

धरणेनदी ठिकाण
गंगापूर(पहिले मातीचे धरण)गोदावरीनाशिक
नांदूर मधमेश्वरकादवानिफाड,नाशिक
करंजवणकादवादिंडोरी,नाशिक
पालखेडकादवादिंडोरी,नाशिक
भंडारदरा (विल्सन डॅम)प्रवराअकोले,आहिल्यानगर
निळवंडेप्रवराअकोले,अहिल्यानगर
मुळामुळाराहुरी,अहिल्यानगर
जायकवाडी (नाथसागर)गोदावरीपैठण
अंबाडीशिवनाछ.संभाजीनगर
शिवनाशिवनाछ.संभाजीनगर
गीरजागिरजाखुलताबाद,छ.संभाजीनगर
सिद्धेश्वरपूर्णापरभणी
मांजरामांजराबीड
माजलगावसिंदफणाबीड
सिंदफणासिंदफणाबीड
बिंदुसराबिंदुसरापाली,बीड
वाणवाणबीड
विष्णुपुरीगोदावरीनांदेड
बाभळी बंधारागोदावरीनांदेड
दारणादारणानाशिक
येलदरीपूर्णजिंतूर,परभणी
कापराकापरापरभणी
कुंडलिकाकुंडलिकाबीड

गोदावरी नदी काठावरील तीर्थक्षेत्रे

ठिकाणतीर्थक्षेत्रे
त्र्यंबकेश्वरत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
नाशिकदर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो
पुणतांबाचांगदेव महाराजांची समाधी
पैठणसंत एकनाथ महाराजांची समाधी
राक्षसभवन, बीडशनिदेव मंदिर
नांदेडसचखंड गुरुद्वार

गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळ –

नद्यासंगमस्थळ
गोदावरी-कादवानांदूर मधमेश्वर, नाशिक
गोदावरी-दारणासायखेडा, नाशिक
गोदावरी-प्रवराटोके, अहिल्यानगर
गोदावरी-खामजोगेश्वरी, छ.संभाजीनगर
प्रवरा-मुळापाचेगाव, अहिल्यानगर
गोदावरी-प्राणहितानगरम सिरोंचा, गडचिरोली
गोदावरी-इंद्रावतीसोमनूर, गडचिरोली
गोदावरी-सिंदफणामंजरथ, बीड
गोदावरी-दक्षिण पूर्णा  कोटेश्वर, परभणी
गोदावरी-मांजराकुंडलवाडी, नांदेड  
गोदावरी-शिवनाघारेगाव, छ.संभाजीनगर
वर्धा-वैनगंगाचापाराळा

Post Comment

You May Have Missed