Maharashtra prashaskiy vibhag : महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
प्रादेशिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे.Maharashtra prashaskiy vibhag
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. Maharashtra prashaskiy vibhag राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते.
1.कोकण प्रशासकीय विभाग
जिल्हे(4): बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी.
4.पुणे प्रशासकीय विभाग
जिल्हे(9): पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
3.औरंगाबाद प्रशासकीय विभाग
जिल्हे(5): औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद.
4.नागपूर प्रशासकीय विभाग
जिल्हे(8): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला.
त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. असे सगळे मिळून आज महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत.
1.छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
2.नाशिक प्रशासकीय विभाग
3.पुणे प्रशासकीय विभाग
4.नागपूर प्रशासकीय विभाग
5.अमरावती प्रशासकीय विभाग
6.कोकण प्रशासकीय विभाग
1.छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
- जिल्हे(8): बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली.
- तालुके: 76
- मुख्यालय: छत्रपती संभाजीनगर
- क्षेत्रफळ: 64,813 चौकिमी
- छत्रपती संभाजीनगर या विभागाने महाराष्ट्राचा एकूण 21.06% इतका भाग व्यापलेला आहे.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा विभाग आहे.
- छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये येतो.
- छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील बीड हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे तर हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा आहे.
2.नाशिक प्रशासकीय विभाग
- जिल्हे(5): अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार.
- तालुके: 54
- मुख्यालय: नाशिक
- क्षेत्रफळ: 57,493 चौकिमी.
- नाशिक या प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राचा एकूण 18.70% इतका भाग व्यापलेला आहे.
- नाशिक हा प्रशासकीय विभाग खानदेश या प्रादेशिक विभागात येतो.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर हा नाशिक विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर नंदुरबार हा सर्वात लहान जिल्हा आहे.
3.पुणे प्रशासकीय विभाग
- जिल्हे(5): पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.
- तालुके: 58
- मुख्यालय: पुणे
- क्षेत्रफळ: 57,275 चौकिमी
- पुणे प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राचा 18.60% इतका भाग व्यापला आहे.
- पुणे प्रशासकीय विभाग पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात येतो.
- पुणे या प्रशासकीय विभागातील पुणे हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे तर कोल्हापूर हा जिल्हा सर्वात लहान आहे.
4.नागपूर प्रशासकीय विभाग
- जिल्हे(6): गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा.
- तालुके: 64
- मुख्यालय: नागपूर
- क्षेत्रफळ: 51,377 चौकिमी.
- नागपूर या प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राचा 16.69% इतका भाग व्यापलेला आहे.
- नागपूर हा प्रशासकीय विभाग विदर्भ या प्रादेशिक विभागात येतो.
- नागपूर या प्रशासकीय विभागातील गडचिरोली हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे तर भंडारा हा जिल्हा सर्वात लहान आहे
5.अमरावती प्रशासकीय विभाग
- जिल्हे(5): यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम.
- तालुके: 56
- मुख्यालय: अमरावती
- क्षेत्रफळ: 43,027 चौकिमी.
- अमरावती या प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राचा 14.95% इतका भाग व्यापलेला आहे.
- अमरावती प्रशासकीय विभाग हा विदर्भ या प्रादेशिक विभागात येतो.
- अमरावती या प्रशासकीय विभागातील यवतमाळ हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे तर वाशीम हा जिल्हा सर्वात लहान आहे.
6.कोकण प्रशासकीय विभाग
- जिल्हे(7): रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर.
- तालुके: 50
- मुख्यालय: मुंबई
- क्षेत्रफळ: 30,७२८ चौकिमी.
- कोकण विभागाने महाराष्ट्राचा एकूण 10 टक्के भाग व्यापलेला आहे.
- कोकण हा प्रशासकीय विभाग कोकण या प्रादेशिक विभागात येतो.
- रत्नागिरी हा कोकण विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे.



Post Comment