Graha-grahamala-upgraha : ग्रह, ग्रहमाला व उपग्रह

Graha-grahamala-upgraha

ग्रह – Graha-grahamala-upgraha परप्रकाशित व ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या गोलास ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो.

बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह आतील सौरमंडळात असतात आणि बाह्य सौरमंडळात गुरु, शनि, नेपच्यून, युरेनस हे ग्रह असतात. या सर्व ग्रहामध्ये पृथ्वी हा असा ग्रह आहे जिथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

ग्रहमाला

सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रह, लघुग्रह व उपग्रहांची मिळून ग्रहमाला तयार होते.

बटुग्रह

2000 सन 2006 पर्यंत प्लुटो या ग्रहास सूर्यमालिकेत नव्या ग्रहाचे स्थान होते. परंतु आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परिभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार  प्लुटोचे परिभ्रमण ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले.

अंर्तग्रह

बुध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात.

बाह्यग्रह –

गुरु नंतरच्या इतर सर्व ग्रहांना बाह्य ग्रह असे म्हणतात.

लघुग्रह

लघुग्रह हे लहान, खडकाळ वस्तू आहेत. जे सूर्याभोवती फिरतात. बहुतेक लघुग्रह वेगवेगळ्या खडकांपासून बनलेले असतात, परंतु काहींमध्ये चिकणमाती किंवा धातू असतात, जसे की निकेल आणि लोह. लघुग्रहांचे आकार अनियमित असतात आणि ते ग्रहांसारखे गोल नसतात.

उपग्रह

ग्रहाभोवती फिरणाऱ्या गोलास उपग्रह असे म्हणतात.उपग्रहाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. नैसर्गिक व मानवनिर्मित.

चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा एक नैसर्गिक उपग्रह आहे.

मानवनिर्मित उपग्रह हे इतर ग्रहांची माहिती गोळा करण्यासाठी अवकाशात पाठवलेले कृत्रिम उपग्रह आहेत. भारताने अंतराळात पाठवलेला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट आहे.

सूर्यमाला

सूर्यमालेत बुध, गुरु, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनि, नेपच्यून, युरेनस इत्यादी गृह आहेत .

सर्वात कमी घनतेचा ग्रह – शनी

सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह- शनी

सर्वात वजनदार ग्रह – गुरु

आकाराने सर्वात लहान ग्रह – बुध

सर्वात उष्ण ग्रह – बुध

पृथ्वीभोवती फिरणारा एकमेव उपग्रह – चंद्र

सूर्याच्या जवळचा ग्रह – बुध

सर्वाधिक घनता असलेला ग्रह – पृथ्वी

सूर्यानंतर सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह – गुरु

सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह – बुध

सौरऊर्जा

सूर्याने उत्सर्जित केलेली ऊर्जा वातावरणातून भूपृष्ठावर फेकली जाते त्या सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे वारे, वादळे निर्माण होतात व पृष्ठाचे तापमान वाढते. बाष्पीभवन निर्माण होऊन जलचक्राची निर्मिती होते.

सौरडाग

सूर्याच्या पृष्ठभागाचे काही भाग अस्पष्ट तेजस्वी व काळपट दिसतात त्यांना  सौरडाग असे म्हटले जाते.

प्रकाशवर्ष

आकाशातील दीर्घिका व तारे यांच्यासारख्यांचे अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या एकाचा वापर करतात. हवेत प्रकाश किरण एका वर्षात जितके अंतर कापू शकतो तितक्या अंतरास प्रकाश वर्ष असे म्हणतात

एक प्रकाश वर्ष – 9.5*  किलोमीटर , 9 लाख 46 कोटी

प्रकाशाचा वेग – सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे.

ध्रुवतारा पृथ्वीपासून 300 प्रकाश वर्ष दूर आहे.

धूमकेतू

केव्हा केव्हा रात्री आकाशात पिसाऱ्यासारख्या दिसणाऱ्या वायूचा आणि धुळीच्या अनेक कणांनी बनलेल्या व शेपटी सारखा दिसणारा प्रकाशित गोलास धुमकेतु असे म्हणतात.

हॅलेचा धूमकेतू

1759 मध्ये हेले या शास्त्रज्ञाने धूमकेतूचा शोध लावला. त्याला  हॅलेचा धमकेतू या नावाने ओळखले जाऊ लागले.

पृथ्वीभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास 76 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून हॅलेचा धुमकेतू प्रति 76 वर्षांनी पहावयास मिळतो. अलीकडे जुलै 1986 मध्ये हॅलेचा धूमकेतू दिसला होता.

उल्का –

जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.

Leave a comment