Chandra

पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र होय.

चंद्राची त्रिज्या 1737.10 किलोमीटर आहे.

वस्तुमान पृथ्वीच्या 1.2% आहे.

पृथ्वीपासून सरासरी अंतर सुमारे 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे.

चंद्राचा अंदाजे व्यास 3476 किलोमीटर आहे.

चंद्राच्या सूर्यकडील बाजूचे तापमान c आहे. सूर्याच्या विरुद्ध बाजूचे तापमान – c आहे.

चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या  पट (एक सष्टांश पट) असल्याने आपण चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत सहा पट जास्त उडी मारू शकतो.

चंद्राचा परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे काळ व परिभ्रमण चंद्र पृथ्वीभोवतो फिरतो हा काळ सारखाच म्हणजे सुमारे 27 दिवस 7 तास 43 मिनिटे 11.3 सेकंद इतका असतो, त्यास नक्षत्र मास असे म्हणतात.

चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतींचा कालावधी सारखाच असल्याने आपणास चंद्राची सतत एकच बाजू दिसते.

चंद्रमास: चंद्राच्या एका कलेपासून दुसऱ्या कलेपर्यंतचा (अमावस्या ते अमावस्या) काळ 29 दिवस 12 तास 44 मिनिटे 2.8 सेकंद इतका असतो. त्यास चंद्रमास असे म्हणतात. चंद्रमासाचा उपयोग पंचांगात कालमापनासाठी केला जातो.

चंद्राच्या परिभ्रमण गतीचे परिणाम – चंद्रकला दृष्टीस पडते. चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती व ओहोटी येते व पृथ्वीवरील भरतीच्या वेळा बदलतात. चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो चंद्र प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास केवळ 1.3 सेकंद लागतात.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते. अमावसेच्या  दिवशी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र असतो.

वद्यपक्ष (कृष्णपक्ष)- पौर्णिमेनंतर अमावसेपर्यंतच्या पंधरा दिवसाच्या काळास वद्यपक्ष असे म्हणतात.

शुद्ध पक्ष (शुक्लपक्ष)- अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसाच्या काळात शुद्ध पक्ष असे म्हणतात.

चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी इतक्या मापाचा कोण करते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत.

 

चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे तेथील आकाश काळेकुट्ट दिसते व कोणत्याही वस्तूची छाया दाट पडते. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो.

चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्ष फिरतो. चंद्राला मिळणाऱ्या एकूण प्रकाशापैकी केवळ 7 टक्के प्रकाश परावर्तित होतो याला सौम्य चांदणी असे म्हणतात.

चंद्राचा केवळ 59% पृष्ठभागच पृथ्वीवरून नेहमी दिसतो त्याच्या विरुद्ध दिशेचा भाग पृथ्वी समोर कधीच येत नाही.

चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती असे म्हणतात.

चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीत चंद्राची अपभू स्थिती असे म्हणतात.

शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये  कोण होतो, म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राचा अर्धाच भाग प्रकाशीत दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *