Akshvrutte Rekhavrutte
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
पृथ्वी स्वतःभोवती फिरताना तिच्या वरील दोन बिंदू आपल्याच जागी स्वतःभोवती फिरतात. त्यापैकी एक बिंदू नेहमीच आकाशातील ध्रुवताऱ्यासमोर असतो त्या बिंदूला उत्तर ध्रुव असे म्हणतात. उत्तर ध्रुवाच्या विरुद्ध बाजूला दक्षिण ध्रुव आहे.
उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना पृथ्वीच्या मध्यातून सरळ जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस “पृथ्वीचा आस” असे म्हणतात. या आसाभोवती पृथ्वी फिरते.
१)रेखावृत्ते
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला रेखावृत्ते असे म्हणतात.
मूळ रेखावृत्त – लंडन जवळील ग्रीनिच शहराजवळून जाणाऱ्या काल्पनिक रेखावृत्तास मूळ रेखावृत्त, शून्य रेखावृत्त असे म्हणतात. रेखावृत्तावरून जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली आहे म्हणून त्यास ग्रीनिच रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस 180 व पश्चिमेस 180 अशी एकूण रेखावृत्तांची संख्या 360 आहे
मुळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात.
मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील भागास पूर्व गोलार्ध व पश्चिमेकडील भागास पश्चिम गोलार्ध असे म्हणतात.
रेखावृत्तामुळे एखाद्या ठिकाणांच्या वेळेबाबत अंदाज करता येतो. प्रत्येकी अंतरावरील रेखावृत्तामधील स्थानिक वेळेत 4 मिनिट फरक असतो.
2)अक्षवृत्ते
अक्षवृत्ते म्हणजे विषुववृत्ताला समांतर असलेल्या वर्तुळावर आडव्या काल्पनिक रेषा होय. अक्षवृत्तामूळे एखाद्या ठिकाणच्या हवामानाबाबत अंदाज करता येतो.
विषुववृत्तापासून प्रत्येकी अंतरावर उत्तर ध्रुवापर्यंत 90 व दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्ते मानली जातात, म्हणजेच विषुववृत्तासह एकूण अक्षवृत्तांची संख्या 181 आहे.
विषुववृत्त, कर्कवृत्त, आर्क्टिक वृत्त, मकरवृत्त, अंटार्क्टिक वृत्त ही वृत्ते म्हणजेच अक्षवृत्ते आहेत.
विषुववृत्त
दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावरील व पृथ्वीच्या मध्यातून गेलेली काल्पनिक रेषा म्हणजेच विषुववृत्त होय. विषुववृत्त हे 0° अक्षवृत्त आहे. विषुववृत्ताची लांबी 40075 किलोमीटर आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीचा भाग उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील दक्षिण भाग दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो. विषुववृत्ताला पृथ्वीचा परीघ असेही म्हणतात.
कर्कवृत्त – विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षवृत्त.
मकरवृत्त – विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षवृत्त.
आर्क्टिक वृत्त – विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षवृत्त.
अंटार्क्टिक वृत्त – विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षवृत्त.
आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्त म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा होय.
पूर्वेकडे आशियाकडून अमेरिकेकडे प्रवास करताना 180° रेखावृत्त ओलांडल्यास, तेथे मागचा वार आहे असे मानावे लागते.
पश्चिमेकडे अमेरिकेकडून आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडकडे प्रवास करताना 180° रेखावृत्त ओलांडल्यास, तेथे पुढचा वार मानतात.
दोन रेखावृत्त दरम्यानचे अंतर हे विविध अक्षवृत्तावर बदलत जाते–
विषुववृत्तावर 111 किलोमीटर.
कर्कवृत्त व मकरवृत्तावर 102 किलोमीटर.
आर्क्टिक वृत्तावर 44 किलोमीटर आहे.
उत्तर व दक्षिण ध्रुवावर 0 किलोमीटर आहे.
स्थानिक वेळ
पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. या काळात पृथ्वीवरील 36° रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
आपण जेथे राहतो तेथे सूर्य डोक्यावर आला म्हणजे दुपारचे बारा वाजले ही आपली स्थानिक वेळ म्हणजे सूर्याचा आधार घेऊन ठरवतो.
मुंबई 73° पूर्व रेखावृत्तावर आहे.
दिल्ली 77° पूर्व रेखावृत्तावर आहे.
म्हणून सर्व ठिकाणी स्थानिक वेळा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे निरनिराळ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळा भिन्नभिन्न असतात. एका रेखावृत्तास सूर्यासमोरून जाण्यास 4 मिनिटे लागतात.
भारतीय प्रमाण वेळ
आपल्या देशात व्यवहारासाठी 82°30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेप्रमाणे घड्याळी लावल्या जातात. कारण देशातील इतर स्थानिक वेळ आणि यात फक्त 1 तासापेक्षा जास्त फरक नाही. म्हणून या ठिकाणी भारतीय प्रमाण वेळ(अलाहाबाद 82°30) असे मानतात.