Ballaleshwar Mandir बल्लाळेश्वर हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली या गावी आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा Ballaleshwar Mandir बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एक असा गणपती आहे की, जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा अतिशय प्रिय भक्त होता.
या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. मंदिराची मूळ मूर्ती स्वयंभू असून तिच्या डोळ्यांमध्ये व बेंबीमध्ये हिरे जडवलेले आहेत. एका दगडी सिंहासनावर Ballaleshwar Mandir बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. गणपतीला उपरणे आणि अंगरखा असे वस्त्र अर्पण केली जातात. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीच्याजवळ रिद्धी सिद्धी चामरे धरलेले आहेत. मूर्तीची उंची साधारणतः तीन फूट आहे. बल्लाळेश्वरचे हे मंदिर पूर्ण दगडाचे असून दगड शिष्याच्या रसाने जोडलेले आहेत. आवारात मोठी घंटा आणि सभामंडप आहे. मंदिरात पुढील गाभाऱ्यात दोन पायात मोदक धरून बसलेल्या उंदराची मूर्ती आहे. बल्लाळेश्वर मंदिराची ही खासियत आहे की, इथे गणपतीला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो.
कथेनुसार, कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा मुलगा होता. बल्लाळ हा गणपतीचा खूप मोठा भक्त होता. तो भक्तीमध्ये एवढा वेडा होता की, त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लावले होते. ते सर्व जवळच्या जंगलात जाऊन गणपतीची पूजा करत असत. हे बघून त्याच्या मित्रांच्या घरातील लोक अस्वस्थ झाले व त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. वडील रागाच्या भरात जंगलात गेले. त्यांनी हातात चाबूक घेतला. ते बघून सर्व मित्र पळून गेले. बल्लाळ एकटा भक्तीमध्ये लीन झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याला खूप मारले व एका झाडाला बांधून, तेथे त्याला सोडून आले आणि निघताना त्याला बोलून आले की, आता बोलव तुझ्या गणेशाला तुला सोडवण्यासाठी तेव्हा, गणपती तिथे एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन बल्लाळला सोडवतात व म्हणतात मी आता तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला जे पाहिजे ते माग. बल्लाळ म्हणाला तुम्ही भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जागी वास्तव्य करा अशी माझी इच्छा आहे. ही भूमी श्री गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी. श्री गणेश म्हणतात तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक नावाने ओळखला जाईल. आणि इथेच वास्तव्य करील आणि त्याच्या इच्छेनुसार पाषाण रुपी मूर्तीत येथे राहिले. येथे पूर्वी लाकडी मंदिर होते. नाना फडणवीस यांनी ते लाकडी मंदिर दगडी मंदिरात रूपांतरित केले.
पुढे वाचा –
Pruthviche Avaran : पृथ्वीचे आवरण | https://mpsc.pro/pruthviche-avaran/ |
Bhukamp : भूअंतर्गत हालचाली-भूकंप | https://mpsc.pro/bhukamp/ |
Pruthvichi Gati : पृथ्वीची गती व त्याचे परिणाम | https://mpsc.pro/pruthvichi-gati/ |
Surya : सूर्य | https://mpsc.pro/surya/ |
Suryagrahan : सूर्यग्रहण | https://mpsc.pro/suryagrahan/ |
या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. गणेश जयंती माघ प्रतिपदा ते माघ पंचमी पर्यंत हे उत्सव साजरे केले जातात. चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दहीकाला असे नैवेद्य गणपतीला अर्पण केले जातात. पाच दिवस गणपतीची पालखी निघते आणि विविध भजन- कीर्तनाचे कार्यक्रम केले जातात