Jwalamukhi : ज्वालामुखी-भूअंतर्गत हालचाली

Jwalamukhi : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या भू-गर्भातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात.

पृथ्वीच्या काही भु-अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीचा काही भाग वर उचलला जातो त्यातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो त्यालाच आपण  असे म्हणतो.

ज्वालामुखीच्या मुखाला “क्रेटर” असे म्हणतात.

ज्वालामुखीचे मुख अधिक मोठे होऊन त्यात पावसाचे पाणी साचून सरोवर तयार होते, त्याला कालडेरा किंवा महाकुंड असे म्हणतात.

ज्वालामुखीतून निघणारे पदार्थ –

1.वायु – कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्लोराइड, अमोनिया, मिथेन, नायट्रोजन इत्यादी वायू बाहेर पडतात.

2.बाष्प – बाष्पा मुळे ज्वालामुखी जवळ मेघ तयार होऊन भरपूर पर्जन्यवृष्टी होते.

3.अन्नीदलिक आणि खंडमय पदार्थ – राख, धूळ, खडक, खडकांचे तुकडे.

4.लावा – भू-गर्भातील मॅग्मा जेव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा, त्याला लावा असे म्हणतात.

ऍसिड लावा – ज्या लावारसात सिलीकाचे प्रमाण 70% पेक्षा जास्त असते. त्याला ऍसिड लावा असे म्हणतात. हा अतिशय घट्ट व रंगाने पिवळसर असतो. त्याचा उत्कलन बिंदू हा अतिशय उच्च असतो.

बेसिक लावा – ज्या लावारसात सिलिका चे प्रमाण 30 ते 40% असते, त्याला बेसिक लावा असे म्हणतात. हा  काळसर रंगाचा असतो. हा जास्त प्रवाही असतो व हे ज्वालामुखी शांत स्वरूपाचे असतात.

ज्वालामुखी उद्रेकाचे दोन प्रकार पडतात.

1)केंद्रीय ज्वालामुखी –

शिलारस नलिकेसारख्या भागातून भूपृष्ठावर येतो व बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराची ज्वालामुखी पर्वत तयार होतात.

केंद्रीय उद्रेकांमध्ये लावा(शिलारस), वाफ, वायु, दगड, धूळ इत्यादी प्रचंड प्रमाणात वेगाने बाहेर पडून स्फोट होतो.

या उद्रेकामुळे शंकाकार पर्वत व घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. उदाहरण आफ्रिकेतील किलीमांजारो, जपानमधील फ्युजियामा, इटलीतील व्हेसुव्हीएस व माउंट एटना हि  ज्वालामुखी या पर्वताची उदाहरणे आहेत.

इटलीमधील एटना हा जगातील सर्वाधिक क्रियाशील ज्वालामुखी 3000 वर्षाहून अधिक काळ जागृत आहे.

आइसलँडमधील सुरत्से हे बेट 1963 मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले.

2)भेगीय ज्वालामुखी

ज्वालामुखी उद्रेक होत असताना लावा एखादा नलिकेद्वारे बाहेर न येता अनेक भेगांमधून बाहेर येतो. बाहेर येणारे पदार्थ भेगांच्या दोन्हीही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. या उद्रेकापासून बेसाल्टची पठारे निर्माण होतात.

उदाहरण – दख्खन पठार (भारत), ब्राझील पठार (द. अमेरिका), सौदी अरेबिया पठार (पश्चिम आशिया).

ज्वालामुखी चे प्रकार

1.शांत/ मृत ज्वालामुखी

असे ज्वालामुखी ज्यांचा उद्रेक होऊन शेकडो वर्ष होऊन गेले आहेत.

उदाहरण – ओजस डेल सलाडो (दक्षिण अमेरिका), फ्युजियामा (जपान),क्रोकाटाओ (इंडोनेशिया), पुपो (मॅनमार).

2.निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी

या ज्वालामुखीमध्ये काही काळानंतर पुन्हा उद्रेक होतो.

एकेकाळी सतत उद्रेक होत असतात परंतु सध्या उद्रेक होणे थांबले आहे आणि पुन्हा अचानकपणे उद्रेक होण्याची शक्यता आहे.

उदाहरण -विसुवियस ( इटली), बैरण (भारत),नारकोंडम (भारत)

3.सक्रिय ज्वालामुखी

असा ज्वालामुखीच्यात सतत ज्वालामुखी उद्रेक होत असतो त्यास जागृत ज्वालामुखी असे म्हणतात.

उदाहरण –

स्ट्रम्बोली (इटली), एटना (ईटली), मोनालावो (हवाई बेट), माउंट कोटोपेक्सी (इक्वाडोर)(जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी )

जगातील ज्वालामुखी क्षेत्र-

१.प्रशांत महासागरीय पेटी

जगातील 80% ज्वालामुखी या प्रदेशात आढळतात.

अग्निकंकणमध्ये 353 ज्वालामुखी आढळतात.

2.मध्ये महाद्वीपीय पट्टा

या पट्ट्यात भूमध्य समुद्रात (स्ट्रम्बोली, विसुवियस, एटना), ककीशस पर्वतात एल्ब्रुस, आफ्रिकेत किलीमांजारो

3.अटलांटिक पेटी

लेसर अँटिलेस ,मेजर अँटिलेस (कॅरेबियन बेटसमूह), सेंट हेलेना

  • स्ट्रॉम्बोली – सिसिला बेटा मधील जागृत ज्वालामुखी आहे व मध्य समुद्रातील द्वीपग्रह म्हणतात.
  • कोटोपाक्सी – जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतात आहे.
  • ऑलिंपस – सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी मंगळ ग्रहावर आहे.
  • व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स –

अमेरिकेतील अलास्का राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखी प्रदेश आहे. 1912 मधील नाव्हारूप्ता व माउंट कटमाई ज्वालामुखी स्फोटामुळे या दरीची निर्मिती झाली.

  • बॅरेन – हा भारतातील एकमेव जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी आहे.
  • ऑस्ट्रेलिया महाखंडात एकही ज्वालामुखी नाही.

Leave a comment