Pruthviche Antarang : पृथ्वीचे अंतरंग

Pruthviche Antarang : पृथ्वीचे अंतरंग तीन भागात भागलेले आहेत. भूकवच, प्रावरण, गाभा.

1)भूकवच:

पृथ्वीच्या बाहेरील घनखडकांनी बनलेला कठीण खडकांनी बनलेल आवरण म्हणजेच भूकवच होय. भूकवचाचा सरासरी विस्तार 30 ते 35 किलोमीटर आहे. समुद्राच्या तळाशी हा 8 किलोमीटर आहे. हिमालयीन पर्वतक्षेत्रामध्ये याचा विस्तार 70 किलोमीटर आहे. भूखंडावर याचा विस्तार 40 किलोमीटर पर्यंत आहे.

भूकवचाचे दोन भाग पडतात

1.खंडीय कवच (सियाल) 

2.महासागरीय कवच (सायमा)

सियाल

सियाल हा भूकवचावरचा भाग आहे

सियाल हा थर हलका आहे

प्रामुख्याने भूखंड सियाल पासून बनलेले आहेत

सियाल हे प्रामुख्याने ग्रॅनाईट या अग्निजन्य खडकापासून बनलेले असून त्यामध्ये सिलिका व ॲल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक आहे

सायमा

सायमा हा थर सियाल पेक्षा जड असतो म्हणून तो सियाल च्या खाली आहे. महासागरांचे तळ हे सायमा या भूकवचाच्या थराचे बनलेले आहेत या थराला “सीमा” असे देखील म्हणतातहा थर प्रामुख्याने सिलिका व मॅग्नेशियम यापासून बनलेला आहे

मोहो विलगता

भूकवच व प्रावरण यांना विलग करणारा भूकवचाच्या पातळ थर म्हणजेच मोहो विलगता होय

2 प्रावरण

प्रावरणाचा विस्तार 2900 किलोमीटर आहे. प्रावरणाने पृथ्वीचा 80 टक्के भाग व्यापला आहे. लोह व मॅग्नेशियम पासून प्रावरण बनलेला आहे. शिलारसाची निर्मिती प्रावरण या थरात होते. तो ज्वालामुखी दरम्यान बाहेर येतो. येथे भूकंप केंद्र एकवटलेली असतात. प्रावरणातील भूअंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठावर पर्वत, द्रोणी, भूकंप, ज्वालामुखी यांची निर्मिती होते.

गटेनबर्ग विलगता

प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारा पृथ्वीच्या अंतरंगाचा पातळ थर म्हणजे गटेनबर्ग विलगता.

3 गाभा

गाभ्याचा विचार विस्तार 3471 किलोमीटर आहे. यामध्ये लोह व निकेल ही मूलद्रव्य आढळतात, त्यामुळे यास निफे असे म्हणतात.

गाभा याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात

अंतर्गाभा

प्रचंड दाबाखाली असलेला अंतर्गाभा घनरूप असून येथे घनता सर्वाधिक 13.3 असते. डेन्मार्कचे भूकंप तज्ञ इंगेलेहमान यांनी 1935 साली अंतर्गभ्याचा शोध लावला.

बाह्य गाभा

संशोधकांच्या मते बाह्य गाभ्याचे स्वरूप द्रव किंवा अर्ध द्रव प्रकारचे आहे. त्यामुळे भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभ्यातून प्रवास करू शकत नाहीत. त्या येथे शोषल्या जातात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी गाभ्यातून प्रवास करतात

पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जसजसे गाभ्याकडे जावे तसे तसे दर 32 मीटर ला एक डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढते

भूपृष्ठापासून गाभा कडे जात असताना आढळणाऱ्या पदार्थांची घनता वाढते.

भूकंपाच्या प्राथमिक लहरी कोणत्याही थरातून जाऊ शकतात. परंतु, दुय्यम लहरी द्रवरूप थरातून जाऊ शकत नाहीत म्हणून, बाह्य गाभ्यातून जाताना त्या दिशा बदलतात.

Leave a comment