Suryamala – सूर्यमालेत सूर्य, आठ ग्रह, ग्रहांचे उपग्रह आणि मोठ्या संख्येने लहान धूमकेतू आणि लघुग्रह यांचा समावेश होतो.
पूर्वी प्लुटो हा सर्वात लहान ग्रह मानला जात होता. पण ऑगस्ट 2006 मध्ये प्लुटोला ग्रह म्हणून असलेली मान्यता काढण्यात आली. प्लुटो हा आता बटूग्रह मानला जातो.
आतील सौर मंडळामध्ये सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा समावेश होतो. गुरु , शनि, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्य सौरमंडळ तयार करतात. हे बाहेरील चार ग्रह आकाराने मोठे आहेत. म्हणून त्यांना महाकाय ग्रह म्हणतात.
सूर्य या तार्याचे स्थान सूर्यमालेचा प्रमुख असे असून इतर प्रत्येक ग्रह ग्रह त्याच्याभोवती आपापल्या गतीने स्वतःच्या कक्षेत फिरत असतात.
ग्रहांचा सूर्यापासून क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून असा आहे.
बुध व शुक्र हे ग्रह वगळता अन्य सर्व ग्रहांना उपग्रह आहेत.
1)बुध (Mercury):
सूर्याला सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.सूर्याच्या सर्वात जवळचा गृह असल्याने या गृहाचे तापमान दिवसा खूप जास्त असते व रात्री कमी असते.
सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा काळ 88 दिवस
परिवलन काल 59 दिवस
व्यास 4880 किलोमीटर
2)शुक्र:
सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी व संत गतीने चालणारा ग्रह आहे. शुक्र हा सर्वात तप्त व उष्ण ग्रह आहे. पृथ्वीला सर्वात जवळचा व पृथ्वीपेक्षा लहान ग्रह आहे. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो.
व्यास 12,400 किलोमीटर
परिवलन काळ २४७ दिवस
परिभ्रमण काळ 224 दिवस
शुक्राच्या तेजस्वितेमुळे काळोख्या रात्री त्याचे चांदणे प्रत्ययास येते. हा ग्रह आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो.शुक्रावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेले असल्याने त्याला ढगांच्या आड लपलेला शुक्र असेही म्हणतात. शुक्राला पहाट तारा असेही म्हणतात कारण सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्राला एकही उपग्रह नाही. चंद्राप्रमाणे शुक्राच्या देखील कला दिसतात 9 फेब्रुवारी 2022 मध्ये नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेने पार्कर सोलार ग्रुप संस्थेने अंतराळातून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली.
3)पृथ्वी:
जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील हा एकमेव ग्रह आहे. सूर्यापासून क्रमाने तिसरा ग्रह आहे. पृथ्वीला चंद्र हा एकमेव उपग्रह आहे.
हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. नायट्रोजन आणि ऑक्सिजन ने समृद्ध असलेले पृथ्वीचे वातावरण वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातीच्या अस्तित्वासाठी योग्य बनवते.
परिवलन काळ परिवलन काळ 23.56 तास
परिभ्रमण काळ 365 दिवस
4)मंगळ :
शुक्र प्रमाणेच मंगळ हा देखील पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे.
व्यास 6792 किलोमीटर आहे
मंगळ हा त्याच्या लालसर तांबूस रंगावरून सहज खात्या ओळखता येतो. मंगळावरील वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि बाष्प यांच्या अधिक प्रमाण असून तेथे प्राणवायूचा अभाव आहे.
परिभ्रमण काळ 687 दिवस आहे.
परिवलन काळ – 24.37 तास.
मंगळ ग्रह हा थंड ग्रह आहे आणि त्याची भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच आहेत. हे एकमेव कारण आहे की याने इतर कोणत्याही ग्रहाप्रमाणे खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ग्रहावर गोठलेल्या बर्फाच्या टेकड्या सुद्धा आहेत.
1996 मध्ये अमेरिकेने “पाथ-फाईंडर” हे यान मंगळावर पाठविले.
2013 भारताने “मंगळयान” प्रक्षेपित केले.
जुलै 2020 मध्ये संयुक्त अरब अमिराती(UAE),चीन व अमेरिका या तीन देशांनी मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी अवकाश याने पाठवली.
या ग्रहास दोन उपग्रह आहेत फोबोज(Phobos), डिमोज(Deimos) फोटोज
5)गुरु:
गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
व्यास 1,39,822 किलोमीटर आहे
परिभ्रमण काळ 11.862 वर्ष आहे
परिवलन काळ – 9.50 तास
गुरु हा पृथ्वीच्या तुलनेत 1397 पटीने मोठा आहे. गुरुच्या पृष्ठभागावर पांढरे पट्टे आढळतात. गुरु या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे.
गुरु या ग्रहाभोवती देखील शनी प्रमाणे कडी आढळून आली आहे. गुरु भोवती चार कडी आहेत. गुरु या ग्रहावर सातत्याने प्रचंड वादळे होतात म्हणून त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात.
गुरुचे उपग्रह 95 आहेत. त्यापैकी दुर्बिणीतून लो, युरोपा, गनिमीड व कॅलिसो हे चार उपग्रह आपण पाहू शकतो.
हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असून शनी पेक्षा आठ पटीने आकाराने अधिक आहे.
6)शनि –
गुरु नंतरचा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा शनि हा मोठा ग्रह आहे. व्यास 1,16,464 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या नऊ पट आहे. पिंगट निळा रंग ही शनीची महत्त्वाची खूण आहे.
परिभ्रमण काळ 29.4571 वर्ष
परिवलन काळ – 10.14 तास
शनी भोवती दुर्बिणीतून स्पष्टपणे दिसणारी सात कडी आढळतात.
शनी भोवतालच्या वातावरणातील दाट थरात अमोनिया, मिथेन, हायड्रोजन या वायूचे प्रमाण आढळते. सूर्यमालेत फक्त शनी ग्रहाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाहून 95 पट अधिक असूनही त्याची घनता कमी आहे त्यामुळे शनी ग्रह एखाद्या मोठ्या समुद्रात टाकल्यास तो सहज तरंगू शकेल.
शनी या ग्रहास 83 उपग्रह आहेत.
शनीचा सर्वात मोठा अनियमित चंद्र – टायटन. टायटन हा सूर्यमालेतील दुसरा मोठा उपग्रह आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार शनी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याची जयंती साजरी केली जाते व तो साडेसातीचा ग्रह मानला जातो.
7)युरेनस
हा “वासव” या नावाने देखील ओळखला जातो.
13 मार्च 1781 मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांनी युरेनस चा शोध लावला.
व्यास 50,724 किलोमीटर आहे.
युरेनस हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
परिभ्रमण काळ – 84 वर्ष
परिवलन काळ – 16.10 तास
ग्रहाचा आस खूपच कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. युरेनस चे 27 उपग्रह आहेत
युरेनसच्या दक्षिण ध्रुवावरील उन्हाळा तब्बल 82 वर्षाचा असतो. मिथेन वायूमुळे युरेनसचा रंग नीळा आहे.
युरेनसला 13 कडी आहेत. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो.
8)नेपच्यून:
जॉन गेल (जर्मनी)याने नेपच्यून या आठव्या ग्रहाचा शोध लावला.हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
व्यास – 49,244 किलोमीटर आहे.
परिवलन काळ – 16 तास
परिभ्रमन काळ – 164 1/2 वर्षे
नेपच्यूनला 14 उपग्रह आहेत.
नेपच्यूनला पाच कड्या आहेत. या ग्रहावरील एका ऋतूचा काळ 41 वर्ष आहे. नेपच्यूनला समुद्राचा देव म्हणतात.
स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो
प्यासीडॉन
अमेरिकन संशोधक जोसेफ ब्रँडी याने 1972 मध्ये या नव्या ग्रहाचा शोध लावला.
हा ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो त्यामुळे त्यास नववा ग्रह मानण्यास विरोध आहे