maharashtratil dongararanga : महाराष्ट्रातील डोंगररांगा:

1. सातमाळाअजिंठा डोंगररांग

  • सातमाळा-अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी प्रमुख उपरांग आहे.  
  • सह्याद्री मधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून पूर्वेकडे छ.संभाजीनगर, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, नांदेड व  यवतमाळ जिल्हयापर्यंत याचा विस्तार आहे.
  • नाशिक जिल्ह्यात या डोंगररांगेला सातमाळा डोंगररांग म्हणून ओळखतात तर पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्हापासून या डोंगररांगेला अजिंठा डोंगररांग असे म्हणतात.
  • नाशिक जिल्ह्यातील अंकाई-टंकाई या ठिकाणापासून या डोंगररांगेला अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखले जाते.
  • अंकाई-टंकाईच्या पश्चिमेला सातमाळा आणि पूर्वेला अजिंठा डोंगररांग पसरलेली आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यात सातमाळा अजिंठा ही डोंगररांग दोन शाखेमध्ये विभागली जाते.
  • एक शाखा अकोला व यवतमाळ जिल्ह्यातून जाते. या शाखेला पुसदची डोंगररांग म्हणून ओळखले जाते.
  • दुसरी शाखा वाशिम, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जाते. यांना निर्मळ डोंगररांगा किंवा हिंगोली व मुदखेडच्या टेकड्या म्हणून ओळखले जाते.
  • सातमाळाअजिंठा डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिमवाहिनी व दक्षिणेकडील गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत.
  • नाशिक जिल्ह्यात धोडप (1472मी.) हे सातमाळा-अजिंठा डोंगररांगेतील सर्वात उंच शिखर आहे.
  • नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.
  • सातमाळा अजिंठा डोंगररांगेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  वेरूळ व अजिंठा लेण्या, दौलताबादचा किल्ला आहे.
  • अजिंठा डोंगररांगेत जालना जिल्ह्यात जांबुवंत टेकडी आहे.
  • नांदेड जिल्ह्यात निर्मल डोंगर व मुदखेड टेकड्या आहेत.
  • सातमाळा अजिंठा डोंगररांगेत गाळणा डोंगररांग धुळे जिल्ह्यात आहे.
  • हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीचे डोंगर आहेत.
  • यवतमाळ मध्ये पुसद टेकड्या आहेत.
  • सातमाळा डोंगररांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे. तर या डोंगररांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे.

2. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा :

  • हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक प्रमुख उपरांग आहे.
  • हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही आहील्यानगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगडापासून सुरू होऊन आग्नेय दिशेला बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर व नांदेड जिल्ह्यात पसरलेली आहे.
  • अहिल्यानगर जिल्ह्यात या डोंगररांगेस हरिश्चंद्र डोंगररांग असे म्हणतात. तर बीड जिल्ह्यात ही डोंगररांग बालाघाट या नावाने ओळखली जाते.
  • हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही पुढे महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात पसरलेली आहे.
  • या डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी व दक्षिणेकडील पूर्ववाहिनी भीमा नदी या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.
  • हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही गोदावरी व भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून कार्य करते.
  • हरिश्चंद्र या डोंगररांगेच्या दक्षिण दिशेला अहमदनगर पठार आहे.
  • बालाघाट डोंगररांगेच्या पश्चिमेला बालाघाट पठार आहे. तर मांजरा नदीच्या खोऱ्यात मांजरा पठार आहे.
  • हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेत हरिश्चंद्रगड हा प्रसिद्ध किल्ला आहे
  • हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेत अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात हरिश्चंद्रगडावर तारामती(Taramati Peak) हे सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर 1429 मीटर उंच आहे.
  • हरिश्चंद्रगडावर बाजूला रोहिदास शिखर उंची 1412 मीटर व बालेकिल्ला शिखर उंची 1390 मीटर आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (उंची 1646 मीटर) हे याच डोंगररांगेत आहे.
  • हरिश्चंद्रगड परिसरातच आजोबा डोंगर आहे.
  • हरिश्चंद्र-बालाघाट याच डोंगररांगेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे आहे.

3. शंभूमहादेव डोंगररांग:

  • शंभू महादेव डोंगररांग हि सह्याद्री पर्वताची एक उपरांग आहे.
  • पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पासून शंभू-महादेव डोंगररांगेची सुरुवात होते व पुढे ती सातारा, सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करते.
  • या डोंगररांगेवर वसलेल्या शिखर शिंगणापूर येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगररांगेला शंभूमहादेव डोंगररांग असे म्हणतात.
  • या डोंगररांगेने उत्तरेकडे असणारी पूर्ववाहिनी भीमा व दक्षिणेकडे असणारी पूर्ववाहिनी कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केली आहेत.
  • सातारा जिल्ह्यात शंभूमहादेव डोंगररांगेच्या काही उपरांगा आहेत.
  • पूर्वेला सीतामाई डोंगर आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी बामनोली डोंगररांग आहे. दक्षिणेला आगाशीवा डोंगर आहेत व पश्चिमेला यवतेश्वर डोंगर आहेत.
  • सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे शंभूमहादेव डोंगररांगेत आहेत.
  • शंभू महादेव डोंगर रांगेच्या पश्चिम दिशेला सपाट माथ्याचे प्रदेश आहेत जसे की वाईजवळ पाचगणी व महाबळेश्वर.
  • पाचगणीला महाराष्ट्राचे “टेबल लँड” या नावाने देखील ओळखले जाते.
  • शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला सांगली जिल्ह्यात खानापूरचे पठार आहे व त्यापुढे जतचे पठार आहे
  • शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे.
  • शंभू महादेव डोंगररांगेच्या मध्यभागात औंधचे पठार आहे.
  • शंभू महादेव डोंगररांगेच्या पश्चिमेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत.

4. सातपुडा पर्वतरांगा:

सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे.

  • महाराष्ट्र पठाराच्या उत्तर सीमेवरून पूर्व-पश्चिम समांतर पसरलेली डोंगररांग म्हणजे सातपुडा पर्वत होय.
  • या पर्वतात एकामागे एक अशा सात डोंगररांगा किंवा सातपुडे 600 मीटर उंचीपर्यंत चढत जातात व उत्तरेस नर्मदा नदीकडे एकदम खाली उतरताना समांतर दिसतात. त्यावरून त्यास सातपुडा असे म्हणतात.
  • सातपुडा पर्वताचा दक्षिणेकडे उतार तीव्र आणि उत्तरेकडे उतार मंद आहे.
  • सातपुडा पर्वत हा ठोकळ्याचा पर्वत म्हणजे ब्लॉक माउंटेन आहे.
  • सातपुडा पर्वताची एकूण लांबी 900 किलोमीटर आहे व रुंदी 160 किलोमीटर आहे.
  • सातपुडा पर्वताचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे.
  • महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांग ही सलग नाही ती थोडीशी तुटक आहे.
  • पश्चिमेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जाते.
  • पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते.
  • सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा-
  • तोरणमाळ डोंगररांग
  • नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेस तोरणमाळ डोंगररांग म्हणून ओळखले जाते.
  • तोरणमाळ डोंगररांग नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागापासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून पश्चिम-पूर्व 100 किलोमीटर लांब पसरलेली आहे.
  • या डोंगररागाने उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नदी नर्मदा व दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी तापी नदी या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे.
  • या डोंगररांगेवरील अस्तंबा डोंगर हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची 1325 मीटर इतकी आहे.
  • सातपुडा पर्वत रांगेत धुपगड हे सर्वात उंच शिखर आहे. धुपगडची एकूण उंची 1350 मीटर आहे.
  • धुपगड हे मध्यप्रदेश राज्यात आहे.
  • या डोंगररांगेवर नंदुरबार जिल्ह्यातील “तोरणमाळ” तोरणाच्या फुलांवरून आलेले नाव व थंड हवेचे ठिकाण आहे व जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे.
  • गाविलगड टेकड्या-
  • अमरावती जिल्ह्यातील वायव्य भागातील धारणी, चिखलदरा या तालुक्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा गाविलगडच्या टेकड्या या नावाने ओळखतात.
  • अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वताची पूर्व-पश्चिम लांबी 100 किलोमीटर इतकी आहे.
  • गाविलगड डोंगर तापी नदी व पूर्णा नदी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे.
  • गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर हे वैराट डोंगर असून त्याची उंची 1177 मीटर इतकी आहे.
  • या डोंगर रांगेवर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे.
  • अस्तंबा डोंगर 1325 मीटर (नंदुरबार), वैराट डोंगर 1177 मीटर (अमरावती) व चिखलदरा 1118 मीटर (अमरावती) हि सातपुडा पर्वतातील उंच शिखरे आहेत.
  • सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर-बऱ्हाणपूर दरम्यान “बऱ्हाणपूर खिंड” आहे.
  • तोरणमाळ पठार व गाविलगड टेकड्या यामध्ये बऱ्हाणपूर खिंड आहे.

Post Comment

You May Have Missed