महाराष्ट्राचा भूगोल
competitive exam, gram masul adhikari, koyana nadi, Koyana river, Koyana river information, Koyana river tributaries, maharashtatil nadiya, Maharashtra bhugol, Maharashtra geography, Maharashtra rivers, MPSC Exam, police bharti, reverse in Maharashtra, river information in Maharashtra, spardha pariksha, talathi bharti, UPSC exam, कृष्णा कोयना नदी संगम, कृष्णा नदीची उपनदी, कोयना नदीचा उगम, कोयना नदीची माहिती, कोयना नदीच्या उपनद्या, प्रीती संगम, भूगोल, महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्या, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, महाराष्ट्राच्या भूगोल, महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्रातील नद्यांची माहिती
mpsc-info
0 Comments
koyana nadi : कोयना नदी
- कोयना नदी koyana nadiकी महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे.
- कोयना नदीला “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी” म्हणून ओळखले जाते.
- कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे.
- कोयना नदी महाबळेश्वरजवळ सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावते.
- कोयना नदीची एकूण लांबी 128 किलोमीटर आहे.
- कोयना नदीचा उगम समुद्रसपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचीवर होतो.
- कोयना नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण व कराड तालुक्यातून वाहते.
- कोयना नदी koyana nadiउगमापासून उत्तर-दक्षिण वाहते व नंतर ती पाटण तालुक्यातील हेळवाकजवळ पूर्वेकडे वाहते.
- सोळशी, केरा, कांदाटी, मोरणा, वांग या कोयना नदीच्या उपनद्या आहेत.
- कोयना नदीच्या सर्व पाचही उपनद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात.
- जावळी तालुक्यातील बामनोली जवळ कोयना नदीला डाव्या बाजूने सोळशी नदी येऊन मिळते.
- तिथेच पुढे उजव्या बाजूने कांदाटी नदी येऊन मिळते.
- पाटण जवळून जाताना डावीकडून केरा तर पुढे उजवीकडून मोरणा व वांग या नद्या कोयना नदीला येऊन मिळतात.
- कोयना नदीवर पाटण तालुक्यात हेळवाकजवळ कोयनानगर येथे कोयना धरण आहे.
- कोयना धरणातील जलाशयाला “शिवसागर” जलाशय म्हणून ओळखले जाते.
- कोयना धरणातील जलाशयातून मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्मिती केली जाते.
- कोयना नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
- कोयना ही नदी पश्चिम महाराष्ट्रासाठी जलसिंचन आणि वीज निर्मितीचा मुख्य स्रोत आहे.
- कोयना नदीवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नदीला “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी” असे म्हटले जाते.
- कोयना धरणाच्या जवळच कोयना अभयारण्य आहे.
- पुढे कोयना नदी सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कृष्णा नदीला येऊन मिळते.
- ज्या ठिकाणी कोयना व कृष्णा नदीचा संगम होतो त्या ठिकाणाला “प्रीतिसंगम” या नावाने ओळखले जाते.
- प्रीतिसंगम या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे.
Tag
competitive exam gram masul adhikari koyana nadi Koyana river Koyana river information Koyana river tributaries maharashtatil nadiya Maharashtra bhugol Maharashtra geography Maharashtra rivers MPSC Exam police bharti reverse in Maharashtra river information in Maharashtra spardha pariksha talathi bharti UPSC exam कृष्णा कोयना नदी संगम कृष्णा नदीची उपनदी कोयना नदीचा उगम कोयना नदीची माहिती कोयना नदीच्या उपनद्या प्रीती संगम भूगोल महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राच्या भूगोल महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील नद्यांची माहिती


Post Comment