Maharashtra pradeshik vibhad : महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग  

2. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग:

  • पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये पुणे या प्रशासकीय विभागातील 5 व नाशिक प्रशासकीय विभागातील 2 जिल्ह्यांचा समावेश होतो.
  • जिल्हे(7): पुणे विभाग- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक विभाग- नाशिक, अहिल्यानगर.
  • तालुके : 87
  • क्षेत्रफळ : 89,853 चौकिमी.
  • पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे.

3. मराठवाडा प्रादेशिक विभाग :

  • मराठवाडा या प्रादेशिक विभागास “गोदावरी खोरे” या नावाने देखील ओळखले जाते. मराठवाडा या प्रादेशिक विभागांमध्ये छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो.
  • जिल्हे(8): छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.
  • तालुके: 76
  • क्षेत्रफळ: 64,813 चौकिमी.
  • मराठवाडा हा प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4. खानदेश प्रादेशिक विभाग :

  • खानदेश या प्रादेशिक विभागाला “तापी खोरे” या नावाने देखील ओळखले जाते. या प्रादेशिक विभागांमध्ये नाशिक विभागातील 3 जिल्ह्यांचा समावेश होतो.
  • जिल्हे(3): धुळे, नंदुरबार, जळगाव.
  • तालुके: 25
  • क्षेत्रफळ: 24,915 चौकिमी
  • खानदेश हा प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे.
  • खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी तालुके व जिल्हे आहेत.

5. विदर्भ प्रादेशिक विभाग :

  • विदर्भ या प्रादेशिक विभागाला “वऱ्हाड प्रांत” या नावाने देखील ओळखले जाते. विदर्भ या प्रादेशिक विभागांमध्ये अमरावती प्रशासकीय विभागातील 5 जिल्हे व नागपूर प्रशासकीय विभागातील 6 जिल्हे यांचा समावेश होतो.
  • जिल्हे(11): अमरावती विभाग- अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर विभाग- नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
  • तालुके: 120
  • क्षेत्रफळ: 94,404 चौकिमी.
  • विदर्भ हा प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे.
  • विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे व तालुके आहेत.

Maharashtra pradeshik vibhad

Post Comment

You May Have Missed