Buldhana Jilha : बुलढाणा जिल्हा

Buldhana Jilha बुलढाणा हा विदर्भातील व महाराष्ट्रातील जिल्हेप्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. Buldhana Jilha बुलढाण्याचे  जुने नाव भिल्लठाणा असे होते.

मुख्यालय – बुलढाणा.

महानगरपालिका – नाही.

क्षेत्रफळ – ९६४० चौकिमी.

महसूल विभाग पाच

स्थान व विस्तार – बुलढाण्याच्या पूर्वेस अकोला, पश्चिमस जालना व जळगाव, आग्नेयस वाशिम जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्यस जालना, उत्तरेस मध्य प्रदेश (नेमाड जिल्हा).

तालुके(13) – बुलढाणा, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव-राजा, सिंदखेड-राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मातोळा, खामगाव, संग्रामपूर, शेगाव, लोणार.

नद्या – पूर्णा, पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. बेंबळा, निपाणी, पांडव, बोर्डी, नळगंगा, बानगंगा, खडकपूर्णा या नद्या.

नदीकाठावरील ठिकाण – मलकापूर (नळगंगा), खामगाव (वाघरा)

धरण  – नळगंगाधर (नळगंगा नदीवर ता. मोताळा)

अभयारण्य – अंबाबरवा (ता.खामगाव), ज्ञानगंगा, लोणार (ता.लोणार)

जलविद्युत केंद्र  – जिगाव/जयगाव

तलाव – लोणार (उल्कापातामुळे निर्माण झाले) याला “विराज तीर्थ” असे म्हणतात.

पठार – बुलढाणा पठार

थंड हवेचे ठिकाण – अंबाझरी/अंबाबरवा, भिंगार.

लेणी – मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, गारडगाव.

वने – जिल्ह्यात विविध प्रकारची वने आढळतात.

पिके – कापूस गहू सोयाबीन ज्वारी सूर्यफूल इत्याद

मृदा – या जिल्ह्यात काळी व रेगुर मृदा आढळते. वाळू व चुनामिश्रित मोरांड जातीची माती मिळते.

  • सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव आहे. सिंदखेड राजा येथे लखोजी राजे यांची समाधी व राजवाडा आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे.
  • शेगाव येथे गजानन महाराजांची समाधी आहे. शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिर आहे.
  • बुलाढाणा जिल्ह्यात राणीबाग वनउद्यान व लोणार क्रेटर वनउद्यान आहे.
  • शेगाव हे “विदर्भाचे पंढरपूर” किंवा “विदर्भ पंढरी” म्हणून ओळखले जाते.
  • शेगाव येथे आनंद सागर प्रकल्प आहे.
  • नांदुरा येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाची उंच(108 फूट) हनुमान मूर्ती आहे.
  • सैलानी बाबा दर्गा चिखली येथे आहे.
  • रेणुका माता मंदिर चिखली येथे आहे.
  • धम्मगिरी बुलढाणा येथे आहे.
  • बुलढाणा हा “गजानन महाराजांचा जिल्हा” म्हणून ओळखला जातो.
  • देऊळगाव राजा येथे प्रसिद्ध बालाजी मंदिर आहे. हे मंदिर विदर्भातील सर्वात संपन्न देवस्थान आहे.
  • लोणार सरोवर येथे दैत्य सुदनाचे मंदिर आहे.
  • जामोद येथे जैन मंदिर आहे.
  • मेहकर येथे नरसिंह, बालाजी, विष्णू यांची मंदिरे आहेत.
  • खामगाव येथे कुष्ठरोग निवारण केंद्र व बुद्ध विहार आहे.
  • बुलढाणा जिल्ह्याला “विदर्भाचे प्रवेशद्वार” असे म्हणतात.
  • बुलढाणा हे महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ आहे.
  • जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीड येथे आहे. हा विदर्भातील पहिला साखर कारखाना आहे.
  • खामगाव ही बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत आहे.
  • खामगाव येथे सर्प संग्रहालय आहे.
  • सिंदखेडराजा येथील घोंगड्या बनवण्याचा व्यवसाय प्रसिद्ध आहे.
  • सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा हा प्रदेश एक भाग होता. भिल्लाचे वस्ती स्थान म्हणजे भिल्लठाणा या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे बुलढाणा नाव अस्तित्वात आले.
  • हजारो वर्षांपूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
  • बुलढाणा हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगांत वसलेले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Leave a comment