भारतीय संविधानातील भाग-6, प्रकरण-3 कलम 168 ते 212 मध्ये घटक राज्यांचे कायदेमंडळ Rajyache Kaydemandal याची तरतूद आहे.
राज्य सरकारच्या कायदेमंडळाला राज्याचे विधानमंडळ(विधिमंडळ) असे म्हटले जाते.
कलम 168 नुसार घटक राज्यांच्या कायदेमंडळात राज्यपाल, विधानसभा आणि अस्तित्वात असल्यास विधान परिषद यांचा समावेश होतो.
घटक राज्यांची दोन सभागृहे आहेत. विधानसभा व विधान परिषद.
विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. तर, विधान परिषद हे वरिष्ठ आणि दुतीय सभागृह आहे.
कलम 169 नुसार घटक राज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेस असतो.
विधिमंडळ किंवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे.