Latest news
Panchayatraj
rajyashastra
पंचायतराज
सामाज्ञ ज्ञान
About census 2027, Census 2027, Census 2027 information, Census information, Current affairs, Digital census, Digital census information, General knowledge, Janaganana ayukt 2027, tags जनगणना 2027, जनगणना 2027 चा ब्रँड अँबेसिडर, जनगणना आयुक्त 2027, जनगणना ब्रीदवाक्य, जनगणना माहिती, जनगणनेचे आयुक्त, डिजिटल जनगणना, डिजिटल जनगणना 2027, भारतातील पहिली डिजिटल जनगणना, सुदर्शन पटनायक
mpsc-info
0 Comments
जनगणना 2027
- भारतातील पहिली डिजिटल जनगणना 2027 Census 2027मध्ये होणार आहे.
- ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.
1.या जनगणनेत प्रत्येक घरांची मोजणी(घर सूचीकरण) केले जाईल. (एप्रिल ते सप्टेंबर2026)
2.प्रत्यक्ष लोकसंख्या गणना प्रत्यक्ष घरोघरी जाऊनकेली जाईल (फेब्रुवारी2027).
- नागरिक मोबाईल ॲप द्वारे किंवा अधिकृत पोर्टलवर (digital census India) जाऊन स्वतःची माहिती भरू शकतात.
- प्रगणक थेट मोबाईल ॲप द्वारे माहिती नोंदवतील.
- कागदाचा वापर टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.Census 2027
- या जनगणनेस केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी 12 डिसेंबर 2025 मध्ये मिळाली.
- 2027 च्या जनगणनेचे आयुक्त हे मृत्युंजय कुमार नारायण आहेत.
- जनगणना 2027 चा ब्रँड ॲम्बेसिडर सुदर्शन पटनायक (वाळू शिल्पकार)आहे.
- 2027 च्या जनगणनेचे ब्रीद वाक्य हे “आमची जनगणना, आमचे भविष्य” हे आहे.
- हेच ब्रीदवाक्य 2011 च्या जनगणनेचे देखील होते.
- जनगणना ही गृहमंत्रालयामार्फत केली जाते.
- भारतात जनगणना ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या रजिस्टर जनरल आणि सेन्सेस कमिशनर कार्यालयामार्फत केली जाते.
- भारतात ब्रिटिश राजवट असताना 1872 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी जनगणना करायला सुरुवात केली.
- 1881 पासून भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते.
- स्वतंत्र भारतामध्ये पहिली जनगणना 1951 मध्ये झाली.
- भारत सरकारने 2027 च्या जनगणनेसाठी 1855 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.
- 2027 ची जनगणना ही 16वी जनगणना आहे.
- 2027 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे.
- देशातील पहिली डिजिटल जनगणना ही 2027 ची जनगणना आहे.
- 2027 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची पहिली जातीनिहाय जनगणना आहे. याआधी 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना झाली होती.
- जनगणना अधिनियम 1948 व जनगणना नियम 1990 या दोन कायद्यानुसार भारतामध्ये जनगणना केली जाते.
- 1 ते 15 मे 2026 दरम्यान स्व-गणना आहे.
- जनगणना 2027 ची संदर्भ तारीख 1 मार्च 2027.
- स्वतःची माहिती स्वतःच ऑनलाईन भरता येईल ही सुविधा प्रथमच या जनगणनेत मिळणार आहे.
- स्वगणना पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- जनगणना 2027 दरम्यान एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.
- याआधी शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. आता 2027 मध्ये होणार आहे तब्बल सोळा वर्षांनी.
- कोरोनामुळे 2021 ची जनगणना पुढे ढकलली होती.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे चार डिजिटल साधनांचे सॉफ्ट लॉन्च केले.
1.हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रियेटर (HLBC) वेब ॲप
2.HLO मोबाईल ॲप्लिकेशन
3. स्वगणना (Self Enumeration)
4. CMMS (Census Management and Monitoring System) पोर्टल
HLBC वेब
- हे वेब मॅप आधारित ॲप असून चार्ज अधिकारी यांना उपग्रह प्रतिमांच्या मदतीने घरांची यादी (ब्लॉक) तयार करता येतो.
- यामुळे देशभरात भौगोलिक कव्हरेजचे मानकीकरण सुनिश्चित होते
HLO मोबाईल ॲप्लिकेशन
- हे एक सुरक्षित ऑनलाईन मोबाईल ॲप आहे.
- याच्या मदतीने प्रगनक घरांची माहिती गोळा करून अपलोड करू शकतात.
- हे 16 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
SE पोर्टल
- नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- नोंदणी केल्यानंतर SE ID दिली जाईल. ही ID प्रगणकाशी शेअर करून माहितीची पडताळणी करता येईल.
CMMS पोर्टल
- हे एक केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
- जनगणनेचे नियोजन अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी वापरले जाईल.
- राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर रियल टाईम प्रगतीचा आढावा घेता येईल.
Tag
About census 2027 Census 2027 Census 2027 information Census information Current affairs Digital census Digital census information General knowledge Janaganana ayukt 2027 tags जनगणना 2027 जनगणना 2027 चा ब्रँड अँबेसिडर जनगणना आयुक्त 2027 जनगणना ब्रीदवाक्य जनगणना माहिती जनगणनेचे आयुक्त डिजिटल जनगणना डिजिटल जनगणना 2027 भारतातील पहिली डिजिटल जनगणना सुदर्शन पटनायक
Post Comment