Nira nadi : नीरा नदी

  • Nira nadi नीरा नदीNira nadi ही भीमा नदीची उजव्या बाजूची उपनदी आहे.
  • नीरा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.Nira nadi
  • नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात शिरगाव या ठिकाणी असलेल्या निराबावी नावाच्या पांडवकालीन कुंडातून होतो.
  • नीरा नदीची एकूण लांबी 209 किलोमीटर आहे.
  • निरा नदी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून वाहते.  
  • नीरा नदी उगमानंतर पूर्वेकडे पुणे व सातारा या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व पुढे ही पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.  
  • पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका यांच्या सीमेवरून वाहते.Nira nadi
  • पुणे जिल्ह्यात नीरा नदी भोर, पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्यातून वाहते.
  • नीरा नदी सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण या तालुक्यातून वाहते.
  • सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातून वाहते.
  • वेळवंडी, गुंजवणी, कऱ्हा या नीरा नदीच्या उपनद्या आहेत.
  • नीरा नदीवर “नीरा देवधर धरण” भोर तालुक्यात आहे.
  • वेळवंडी नदी ही नीरा नदीची Nira nadi डाव्या बाजूची उपनदी आहे.
  • वेळवंडी नदी ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून वाहते.
  • वेळवंडी नदीला येळवंडी किंवा येळवंती नदी म्हणून देखील ओळखले जाते.
  • या नदीवर वळवंड व भाटघर ही दोन धरणे आहेत.
  • वळवंड धरणाला वाळवण धरण असेही म्हणतात.
  • वेळवंडी नदीवर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर धरण आहे. या धरणातील जलाशयाला “येसाजीकंकसागर” जलाशय म्हणून ओळखले जाते.
  • वेळवंडी नदी भाटघरजवळ नीरा नदीला येऊन मिळते.
  • गुंजवणी नदीचा उगम वेल्हे तालुक्यात राजगड,तोरणा किल्ला परिसरात होतो.
  • गुंजवणी नदी भोर तालुक्यात केंजळजवळ नीरा नदीला येऊन मिळते.
  • गुंजवणी नदीवर वेल्हे तालुक्यात गुंजवणी धरण आहे.
  • सातारा जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिरवळ जवळ “वीर धरण” आहे.
  • कऱ्हा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात होतो.
  • कऱ्हा नदी काठावर सासवड, बारामती हे ठिकाणे आहेत.
  • कऱ्हा नदी काठावर जेजुरी व मोरगाव ही धार्मिक ठिकाणे देखील आहेत.
  • कऱ्हा नदीवर जेजुरीजवळ नाझरे येथे “मल्हारसागर” धरण बांधले आहे.
  • कऱ्हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर बारामती जवळ सोनगाव या ठिकाणी नीरा नदीला येऊन मिळते.
  • पुढे नीरा नदी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका यांच्या सीमेवर निरा नरसिंगपूर या ठिकाणी उजव्या बाजूने भीमा नदीला येऊन मिळते.

Post Comment

You May Have Missed