Krushna nadi:कृष्णा नदीप्रणाली

  • कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे उगम पावते.
  • कृष्णा नदी Krushna nadi ही पूर्व वाहिनी नदी आहे.
  • कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे व महाराष्ट्रातील एकूण लांबी 282 किलोमीटर आहे.
  • कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ 2,59,000 चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ 28,700 चौरस किलोमीटर आहे.
  • कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते.
  • कृष्णा नदी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते.
  • कृष्णा नदी खोऱ्यात वाई, सातारा, सांगली, कराड, मिरज, कोल्हापूर ही प्रमुख शहर आहेत.
  • कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते व   पुढे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
  • कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग आहे. या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत.
  • कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग आहे व कृष्णा नदीच्या दक्षिणेला सह्याद्री पर्वत आहे.
  • कृष्णा नदी शंभू महादेव डोंगररांग व सह्याद्री पर्वत यादरम्यान वाहते.
  • महाराष्ट्रमध्ये कृष्णा नदीला “अप्पर कृष्णा” म्हणून ओळखले जाते.
  • कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात मिळताना तीन प्रवाहात विभागली जाते याला “कृष्णा डेल्टा” म्हणतात. या ठिकाणी भात शेती केली जाते.

कृष्णा नदीच्या डाव्या बाजूकडील उपनद्या-Krushna nadi

येरळा, भीमा, मुशी, पल्लेरू ,मुनेरू  

कृष्णा नदीच्या उजव्या बाजूकडील उपनद्या

वेण्णा, कोयना(सोळशी), वारणा, पंचगंगा (कासारी, गुप्त सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती), दूधगंगा (वेदगंगा), घटप्रभा (हिरण्यकेशी, ताम्रपर्णी),मलाप्रभा, तुंगभद्रा(तुंग, भद्रा)

  • तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उजवीकडील सर्वात मोठी उपनदी आहे.
  • भीमा नदी ही कृष्णा नदीची डावीकडील सर्वात मोठी उपनदी आहे.
  • भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे.

कृष्णा नदी खोऱ्यातील उगमस्थाने:

नदीउगमस्थान
कृष्णामहाबळेश्वर, सातारा
वेण्णामहाबळेश्वर, सातारा
कोयनामहाबळेश्वर, सातारा
येरळामस्कोबा डोंगर, खटाव, सातारा
वारणाप्रचीतगड, सातारा 
पंचगंगाप्रयागसंगम, करवीर, कोल्हापूर
दूधगंगासह्याद्री पर्वत, भोलाकरवाडी, सिंधुदुर्ग
वेदगंगाभटवाडी,कोल्हापूर  
घटप्रभापश्चिम घाट, सावंतवाडी, सिंधुदुर्ग 
मलप्रभापश्चिम घाट,बेळगावी, कर्नाटक
भीमाभीमाशंकर, पुणे
तुंगभद्राकुडलीगाव,शिमोगा, कर्नाटक
मुशीअनंतगिरी डोंगर, विकाराबाद,  तेलंगणा
पल्लेरूतेलंगणा
मुनेरूवारंगल, तेलंगणा

कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळ:

नद्या संगमस्थळजिल्हा
कृष्णा+वेण्णामाहुलीसातारा
कृष्णा+कोयना(प्रीतीसंगम)कराडसातारा
कृष्णा+येरळाब्रम्हनाळसांगली
कृष्णा+वारणाहरिपूरसांगली
कृष्णा+पंचगंगानरसोबाचीवाडीकोल्हापूर
कृष्णा+दूधगंगायेडूरबेळगाव,कर्नाटक
कृष्णा+घटप्रभाचीक्कसंगमबागलकोट,कर्नाटक
कृष्णा+मलप्रभाकुडाळ संगमबागलकोट,कर्नाटक
कृष्णा+भीमाकुरगुड्डीरायचूर, कर्नाटक
कृष्णा+तुंगभद्रासंगमेश्वरम  कर्नुल जिल्हा (आंध्रप्रदेश)
कृष्णा+मुशीवडपल्लीनालगोंडा,तेलंगणा
कृष्णा+पल्लेरूविजयवाडा आंध्रप्रदेश
कृष्णा+मुनेरूविजयवाडाआंध्रप्रदेश

कृष्णा नदी खोऱ्यातील धरणे:

धरणनदीठिकाण
धोम धरणकृष्णासातारा
कण्हेर धरणवेण्णासातारा
कोयना धरणकोयनासातारा
येरळवाडी प्रकल्पयेरळासातारा
उजनी(यशवंतसागर)भीमासोलापूर
चांदोलीवारणाकोल्हापूर,सांगली
राधानगरीभोगावतीकोल्हापूर
काळम्मावाडी धरणदूधगंगा  कोल्हापूर
हिडकलघटप्रभाहिडकल,बेळगावी, कर्नाटक
अलमट्टी (लालबहादूर शास्त्री जलाशय)कृष्णाकर्नाटक
रेणुकासागरमलप्रभानवलतीर्थ, बेळगावी, कर्नाटक
बसावासागर(नारायणपूर)कृष्णायादगीर, कर्नाटक
उजनीभीमासोलापूर
तुंगभद्रातुंगभद्राविजयनगर,कर्नाटक
श्रीशैलमकृष्णाआंध्रप्रदेश,तेलंगाना सीमा
नागार्जुनसागरकृष्णाआंध्रप्रदेश,तेलंगाना सीमा
प्रकाशम बरेजकृष्णाविजयवाडा, आंध्रप्रदेश

कृष्णा नदी खोऱ्यातील नदी काठावरील ठिकाणे

नदीकाठावरील ठिकाण
भोगावतीदाजीपूर,राधानगरी  
कृष्णामहाबळेश्वर, वाई, माहुली,  कराड, मिरज, सांगली, औदुंबर, बागलकोट, श्रीशैलम, नृसिंहवाडी, अमरावती,विजयवाडा
तुंगभद्राहम्पी, मंत्रालयम, कर्नुल
मुशीहैदराबाद
येरळावडूज
पंचगंगाकोल्हापूर, इचलकरंजी
दूधगंगाकागल  
घटप्रभाबागलकोट

Post Comment

You May Have Missed