Tapi nadi:महाराष्ट्रातील तापी नदीप्रणाली

  • तापी Tapi nadi ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे.
  • तापी नदीला खानदेशकन्या किंवा सूर्यकन्या या नावाने ओळखले जाते.
  • तापी नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातील महादेव डोंगररांगेत बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथे होतो.
  • तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील एकूण लांबी 208 किलोमीटर आहे.
  • तापी नदीचे एकूण क्षेत्रफळ 65,150 चौरस किलोमीटर आहे व महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ 31, 660 चौरस किलोमीटर आहे.
  • तापी नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या  तीन राज्यातून Tapi nadi वाहते.
  • तापी नदी महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्हयातून वाहते.
  • तापी नदी ही महाराष्ट्र राज्यात दोनदा प्रवेश करते.
  • तापी नदीचा उगम मध्यप्रदेशमध्ये मुलताई येथे झाल्यानंतर तापी नदी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून 49 किलोमीटरचा प्रवास करते व पुन्हा मध्यप्रदेश मध्ये प्रवेश करते आणि पुन्हा जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात बऱ्हाणपूर खिंडीजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते व नंतर ती महाराष्ट्रातून जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून 159 किलोमीटर वाहत गुजरात राज्यात जाते व सुरत शहराजवळ खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.
  • तापी नदी सातमाळा अजिंठा डोंगररांगा व सातपुडा पर्वत यांच्यामध्ये वाहते.
  • तापी नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे तर दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे.
  • पूर्णा नदी ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे.

तापी नदीच्या उजवीकडील उपनद्या -Tapi nadi

नागझिरी, सुकी, गुळ, अनेर, अरुणावती, गोमाई, वाकी.

तापी नदीच्या डावीकडील उपनद्या -Tapi nadi

खापरा,सिपना,गाडगी,डोलार,पूर्णा(वाण,शहानुर,चंद्रभागा,आरणा,नळगंगा,विश्वगंगा,ज्ञानगंगा,बोर्डी,मन,मोर्णा,काटेपुर्णा,उमा,पेंढी), वाघूर, गिरणा(अंजनी), बोरी, पांझरा, बुराई

तापी नदी खोऱ्यातील नद्यांची उगमस्थान

नदीउगमस्थान
पांझरापिंपळनेर, धुळे
वाघुरअजिंठा,छ.संभाजीनगर
बोरीगाळणगाव, धुळे
पूर्णामेळघाट, अमरावती
सुकीकाकरागाव, मध्यप्रदेश
गिरणासुरगाणा, नाशिक
अनेरलंगडाअंबा, सातपुडा पर्वतरांग
अरुणावतीमालोण, मध्यप्रदेश
गोमाईमोखणी, सातपुडा पर्वतरांग
बुराईकोंडाईबारी, नावापुर,नंदुरबार
गुळबुंड्यापाणी, जळगाव
तापीमुलताई, मध्यप्रदेश

तापी नदी खोऱ्यातील संगमस्थळे

नद्या संगमस्थळे
तापी-पूर्णाचांगदेव,मुक्ताईनगर,जळगाव
तापी-सुकीतांदळवाडी, जळगाव
तापी-वाघुरशेळगाव,जळगाव
तापी-गिरणारामेश्वर, जळगाव
तापी-बोरीबोहरा, जळगाव
तापी-अनेरपिळोदा, जळगाव
तापी-पांझरामुडावद, कपिलेश्वर मंदिर,धुळे
तापी-अरुणावतीउपरपिंड,शिरपूर, धुळे
तापी-बुराईसुलवाडे,शिंदखेडा,धुळे
तापी-गोमाई  प्रकाशा, शहादा,नंदुरबार

तापी नदी खोऱ्यातील धरणे

नदी धरण ठिकाण
तापीहातनूरभुसावळ,जळगाव
गिरणागिरणामालेगाव, नाशिक
गिरणाचनकापूरनाशिक
गिरणाजामदे प्रकल्पजळगाव
गिरणादहीगाव प्रकल्पजळगाव
अनेरअनेरचोपडा, जळगाव
अंजनीअंजनीएरंडोल. जळगाव
पांझरासय्यदनगरधुळे
वाघुरवाघुर प्रकल्पजळगाव
तापीउकाई प्रकल्पगुजरात
तापीकाक्रपारागुजरात
अरुणावतीकरवंदशिरपूर, धुळे
गोमाईसुसरीनंदुरबार
बुराईफोफरधुळे
काटेपुर्णामहानधरणअकोला
ज्ञानगंगा      ज्ञानगंगाखामगाव,बुलढाणा
नळगंगानळगंगाबुलढाणा

तापी खोऱ्यातील नद्या व काठावरील ठिकाणे

नदीकाठावरील ठिकाण
तापीभुसावळ, प्रकाशे, सारंगखेडा
गिरणाजळगाव, भडगाव, मालेगाव
कानसाक्री
बुराईशिंदखेडा
मन  बाळापुर
मोरणा  अकोला
बोरीअमळनेर
पांझराधुळे
अंजनीएरंडोल
गोमाईशहादा, प्रकाशा
अरुणावतीशिरपूर
शहानुरअंजनगाव
नळगंगामलकापूर
चंद्रभागाअचलपूर

Post Comment

You May Have Missed