Manjara nadi : मांजरा नदीप्रणाली
- मांजरा नदीला Manjara nadiमंजिरी नदी किंवा वांजरा नदी या नावाने देखील ओळखले जाते.
- मांजरा नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. महाराष्ट्रमध्ये मांजरा नदीची लांबी 616 किलोमीटर आहे.
- मांजरा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तीन राज्यातून वाहते.
- मांजरा नदी महाराष्ट्रातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यातून वाहते.
- मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत होतो.
- मांजरा नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा, केज, अंबाजोगाई या तालुक्यातून पुढे धाराशिव जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सीमेवरून प्रवास करून कासारखेड येथे लातूर जिल्ह्यात प्रवेश करते.
- मांजरा नदी लातूर जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते व नंतर निलंगा तालुक्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करते.
- कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यातून वाहते नंतर बिदरच्या पूर्वेस मांजरा नदी तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
- मांजरा नदी तेलंगणा राज्यात प्रामुख्याने संगारेड्डी, मेदक, कामारेड्डी, निझामाबाद या जिल्ह्यातून वाहते.
- मांजरा नदीचा सुरुवातीचा प्रवास आग्नेय दिशेने असतो व नंतर तेलंगणा राज्यातील संघरेड्डीपेट या ठिकाणी मांजरा नदी एकदम वळण घेते व वायव्य दिशेने प्रवास करते.
- नंतर ही नदी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत येऊन नांदेड जिल्हा व तेलंगाना राज्याच्या सीमेवरून वरून वाहते व कुंडलवाडी गावाजवळ दक्षिणेकडून गोदावरी नदीस मिळते.
मांजरा नदीच्या डाव्या बाजूच्या उपनद्या
केज, लिंबा, रेना, चौसाळा, घरणी, लेंडी, मन्याड
- केज, रेना, लिंबा, चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराळ प्रदेशात उगम पावतात व बीड जिल्ह्यातच मांजरा नदीला जाऊन मिळतात.
- घरणी नदीचा उगम लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात वडवळ या ठिकाणी होतो.
- घरणी नदी ही लातूर जिल्ह्यातील नदी आहे.
- घरणी नदीवर लातूर जिल्ह्यात घरणी धरण आहे. घरणी नदी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मांजरा नदीला येऊन मिळते.
- लेंडी नदीचा उगम लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात होतो.
- लेंडी नदी उदगीर व नांदेड जिल्ह्यातून वाहते.
- लेंडी नदी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात शेळगाव या ठिकाणी महाराष्ट्र व तेलंगाना सीमेवर मांजरा नदीस मिळते.
- मन्याड नदीचा उगम लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात होतो.
- मन्याड नदी ही लातूर व नांदेड जिल्ह्यातून वाहते.
- मन्याड नदी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मांजरा नदीला येऊन मिळते.
मांजरा नदीच्या उजव्या बाजूच्या उपनद्या
- तवरजा, तेरणा, कारंजा
- तवरजा नदीचा उगम लातूर जिल्ह्यात मुरुड गावाजवळ होतो.
- तवरजा नदीवर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात तवरजा धरण आहे.
- लातूर-औसा सीमेवर शिवनी या ठिकाणी तवरजा नदी मांजरा नदीला जाऊन मिळते.
- तेरणा नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात होतो.
- तेरणा ही मांजरा नदीची मोठी व प्रमुख उपनदी आहे.
- तेरणा नदी धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यातून वाहते.
- तेरणा नदीवर तेरणा धरण धाराशिव जिल्ह्यात माकणी या ठिकाणी आहे. या धरणाला माकणी धरण म्हणून ओळखले जाते.
- तेर हे गाव तेरणा नदी काठावर आहे तेर या ठिकाणी संत गोरोबाकाकाचे मंदिर आहे.
- ती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहत येऊन मांजरेस मिळते.
- कारंजा नदीचा उगम तेलंगणा राज्यामध्ये होतो व ती पुढे वाहत जाऊन कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यात मांजरा नदीला जाऊन मिळते.
- मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे उसाचे पीक घेतले जाते.तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते.
मांजरा नदीवरील धरणे
- मांजरा नदीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धनेगाव येथे मांजरा धरण आहे.
- तेलंगणा राज्यात संगारेड्डी जिल्ह्यात मांजरा नदीवर सिंगूर धरण आहे.
- तेलंगणा राज्यात निजामाबाद या जिल्ह्यात मांजरा नदीवर निजामसागर हा प्रकल्प आहे.
- लातूर व कळंब हे शहर मांजर नदीकाठी वसलेले आहे.
- मांजरा नदीवरील बॅरेज
लासरा, बोरगाव, अंजनपुर, वंजारखेड, वांगदरी, कारसा, पोहरेगाव, नागझरी, साई, खुगपूर, शिवानी, घरणी, डोंगरगाव, होसुर, भुसनी हे बॅरेज बांधलेले आहेत..



Post Comment