Nandurbar Jilha नंदुरबार जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला Nandurbar Jilha नंदुरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून 1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. देव मोगरादेवी हे येथील आदिवासी बांधवांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
मुख्यालय – नंदुरबार
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 5955 चौकिमी
स्थान व विस्तार – नंदुरबारच्या नैऋत्येस व पश्चिमेस गुजरात राज्य, उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेस व आग्नेयेस धुळे जिल्हा आहे.
तालुके(6) – नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्रणी (धडगाव), अक्कलकुवा.
नद्या – तापी, नर्मदा या मुख्य नद्या आहेत. इतर नद्या गोमाई, रंगावली, उदाई.
संगमस्थळे – प्रकाशे (तापी-गोमाई), सारंगखेडा (तापी- अमरावती)
नदीकाठावरील ठिकाणे – प्रकाशे (तापी), सारंगखेडा(तापी), शहादा (गोमाई).
पिके – तांदूळ, तूर, ऊस, मिरची, केळी, कापूस.
धरणे – आंबेवारा, धनीबारा, वीरचक, वसलाई, विसरवाडी, खोलघर.
तलाव – टोकर, नर्मदासागर, शनीमंडळ, यशवंत तलाव (तोरणमाळ).
धबधबा – होराफळली, दहेलाचा, बिलगावाचा, वाल्लारी, निनाई, उमठी.
शिखर – अस्तंबा, तोरणमाळ.
पठार – तोरणमाळ पठार
लेणी – प्रकाशे
किल्ले – धडगाव(अक्राणी) तालुक्यातील किल्ल्याला “अक्राणीचा महल” म्हणतात.
अभयारण्य – शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य, तोरणमाळ वन्यजीव अभयारण्य.
गड/किल्ले – अक्राणी, मंदाने, चांदवड, कोंढवळ, जयनगर, तोरखेडा.
वने – जिल्ह्यात काटेरी पानझडे वने आढळतात.
वृक्ष – साल, साग, चंदन, पळस, बेल, तेंदू, निबं इत्यादी.
मृदा – जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात रेगूर मृदा आढळते. काही ठिकाणी जांभी मृदा आढळते.
- सातपुडा पर्वतरांगामुळे नंदुरबार हा जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश पासून वेगळा झाला आहे.
- या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
- एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
- अक्राणी तालुक्यात अस्तंबा शिखर आहे.
- सारंगखेडा येथे दत्त मंदिर आहे.
- नंदुरबार शहरास आंबेवारा व विचरक धरणे पाणी पुरवतात.
- नंदुरबार येथे बाल हुतात्मा शिरीष कुमार यांचे स्मारक आहे.
- शहादा तालुक्यात उनपदेव, आनवदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
- शहादा तालुक्यातील प्रकाशे येथील तापी-गोमाई संगमावरील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत. याला “खानदेशाची काशी” किंवा “दक्षिणची काशी” असे म्हणतात.
- अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे यशवंत तलाव, सीताखईची दरी व धबधबा आहे.
- अक्कलकुवा येथे होरापली धबधबा आहे.
- तळोद्यान जवळ हिडींबा जंगल आहे.
- तोरणमाळ हे थंड हवेचे व निसर्ग रम्य ठिकाण आहे.
- नंदुरबार ही नंद गवळी राजा यांची नगरी होती. येथे राज्याचा जनता दरबार भरत असे, त्याला नंद दरबार असे म्हणत. यावरूनच नंदुरबार असे नाव पडले असावे.
- अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे जैव संवर्धन क्षेत्र आहे.
- नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग NH-06 आहे.
- चकाला येथे पवनविद्युत प्रकल्प आहे.
- तोरणमाळ हे ठिकाण प्राचीन “मांडू” घराण्याच्या राजधानीचे ठिकाण आहे