Hingoli Jilha : हिंगोली जिल्हा

Hingoli Jilha हिंगोली जिल्हा छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून Hingoli Jilha हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.

मुख्यालय – हिंगोली

महानगरपालिका – नाही

क्षेत्रफळ – 4526 चौकीमी

स्थान व विस्तार – हिंगोलीच्या पूर्वेस यवतमाळ व नांदेड जिल्हा, दक्षिणेस नांदेड व परभणी जिल्हे, नैऋत्य व पश्चिमेस परभणी जिल्हा, आग्नेयस नांदेड जिल्हा, वायव्येस बुलढाणा, उत्तरेस वाशिम जिल्हा.

तालुके(5) – हिंगोली, वसमत, औंढा-नागनाथ, सेनगाव, कळमनुरी.

नद्या – कयाधु ही प्रमुख नदी. पैनगंगा, पूर्णा, आसना या इतर नद्या.

नदीकाठावरील ठिकाण – हिंगोली (कयाधू), नरसी (कयाधू)

धरण – पूर्णा नदीवर येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे, पैनगंगा नदीवर ईसापुर धरण, सावळी प्रकल्प.

डोंगररांगा – अजिंठा, हिंगोली डोंगर.

लेणी – नरसी, हिंगोली, औंढा-नागनाथ, चौढी

वने – पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात काटेरी व पानझडी वने आढळतात.

मृदा – जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी काळी मृदा आढळते.

पिके – गहू, हरभरा, कापूस, ज्वारी इत्यादी प्रमुख पिके आहेत.

  • भारतातील पहिली लिगो (LIGO)  प्रयोगशाळा हिंगोली येथे आहे.
  • गुरुत्वीय अभ्यासासाठी निवडलेल्या पहिल्या लिगो (LIGO-India)  प्रकल्पासाठी केंद्र शासनाने 2600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (7 एप्रिल 2023 मध्ये)
  • हिंगोली शहर कयाधू नदीवर वसलेले आहे. ते व्यापारी केंद्र आहे. येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे. हिंगोली येथे जनावराचा मोठा दवाखाना आहे
  • राज्यात कडधान्याच्या पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा हिंगोली आहे.
  • औंढा-नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
  • सेनगाव तालुक्यात खैरी घुमट येथे नवनाथ मंदिर आहे.
  • औंढा-नागनाथ तालुक्यात शिरड-शहापूर येथे प्रसिद्ध जैन मंदिरे आहेत.
  • हिंगोली तालुक्यात नरसी हे संत नामदेवाचे जन्मस्थान आहे व येथे नरसिंह मंदिर आहे.
  • औंढा-नागनाथ येथे संत विसोबा खेचर यांची समाधी आहे.
  • कळमनुरी तालुक्यात भाटेगाव येथे मत्स्य बीज केंद्र आहे.
  • वसमत येथे प्लायवूडचा कारखाना आहे.
  • पैनगंगा ही नदी हिंगोली, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात सीमा बनवते.
  • हिंगोली जिल्ह्याला “संत नामदेवाचा जिल्हा” म्हणून संबोधले जाते.
  • वसमत येथे प्लायवूडचा कारखाना आहे येथे हात मागावरील व यंत्र मागावरील कपडाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते
  • येलदरी या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.

Leave a comment